Paraguay Crisis : 'आमचे पैसे परत द्या!' बँकिंग संकटामुळे पॅराग्वे देशात आणीबाणीसारखी परिस्थिती; राष्ट्रपतींना सोडावे लागले पद ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे (Paraguay) या देशात सध्या प्रचंड राजकीय आणि आर्थिक खळबळ उडाली आहे. देशातील सर्वात मोठ्या डिजिटल बँकांपैकी एक असलेली ‘उनो बँक’ (Ueno Bank) अचानक डबघाईला आल्याने ३० लाखांहून अधिक नागरिकांच्या ठेवी आणि बचत खाती गोठवण्यात आली आहेत. या भीषण बँकिंग संकटाची सर्व जबाबदारी स्वीकारत आणि जनतेच्या प्रचंड संतापाला सामोरे जात पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो पेन्या (Santiago Peña) यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतींच्या या तडकाफडकी निर्णयामुळे संपूर्ण दक्षिण अमेरिकेत राजकीय उलथापालथ झाली आहे.
पॅराग्वेच्या मध्यवर्ती बँकेने (Central Bank) दोन दिवसांपूर्वी ‘उनो बँक’ ताब्यात घेण्याची घोषणा केली. बँकेतील निधीची तीव्र टंचाई, बेकायदेशीर वाटप आणि वित्तीय नियमांचे उल्लंघन यामुळे मध्यवर्ती बँकेने हे कठोर पाऊल उचलले. मात्र, या कारवाईनंतर बँकेचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून सुमारे ३० लाख ग्राहकांना आपल्या हक्काच्या पैशांपर्यंत पोहोचता येत नाहीये.
या अडकलेल्या पैशांमध्ये केवळ व्यावसायिक किंवा श्रीमंतांचेच पैसे नाहीत, तर रोजचा खर्च भागवणारे सामान्य नागरिक, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्तीवेतनधारकांच्या (Pensioners) कष्टाच्या कमाईचा समावेश आहे. मध्यवर्ती बँकेने स्पष्ट केले आहे की, वित्तीय प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ठेवीदारांचे रक्षण करण्यासाठीच बँक ताब्यात घेण्यात आली आहे, परंतु तात्काळ पैसे न मिळाल्याने संपूर्ण देशात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संपूर्ण बँकिंग संकटाचे मुख्य केंद्रस्थान ठरले आहेत देशाचे पदच्युत अध्यक्ष सँटियागो पेन्या. पेन्या यांचे ‘उनो बँक’ चालवणाऱ्या पालक समूहामध्ये (Holding Company) समभाग (Shares) होते. जरी त्यांनी गेल्या वर्षी आपले शेअर्स विकल्याचा दावा केला असला, तरी त्यांच्या सत्ताकाळात या बँकेला अनेक बेकायदेशीर सवलती देण्यात आल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Midterms : कोण आहेत हरमीत ढिल्लन? ट्रम्प यांच्या निवडणुकीतील पराभवानंतर राजीनामा; अमेरिकेत राजकीय गदारोळ
विरोधी पक्षाच्या खासदारांनी असा गंभीर आरोप केला आहे की, राष्ट्रपतींच्या संरक्षणाखाली बँकेतून कोट्यवधी रुपयांचा निधी नियमबाह्य पद्धतीने वळवण्यात आला. ‘उनो बँके’तील अनियमिततेकडे मध्यवर्ती बँकेने वारंवार लक्ष वेधले होते, परंतु पेन्या यांनी या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी देशाच्या बँकिंग व्यवस्थेला धोक्यात आणल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
बँकेतील जमापुंजी अचानक अडकल्यामुळे संतापलेले हजारो नागरिक राजधानीच्या रस्त्यावर उतरले आहेत. गुरुवारी हजारो आंदोलकांनी संसदेबाहेर जमून “आमचे पैसे परत द्या!” अशा जोरदार घोषणा दिल्या. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा (Water Cannons) वापर केला.
Queridos compatriotas: Sé que estamos viviendo horas de preocupación e incertidumbre. Quiero hablarles con claridad y serenidad. Ante la continuidad del juicio político, me presentaré y ejerceré mi derecho a la defensa. Lo haré con argumentos y pruebas, con respeto a la Constitución y a las instituciones de la República. Aun cuando ya hayan adelantado su decisión, voy a ejercer ese derecho. No por una cuestión de orgullo personal, sino porque rendir cuentas y dar explicaciones también es una responsabilidad frente al pueblo paraguayo. Colaboraré plenamente con las instituciones competentes para que se esclarezca lo ocurrido, se determinen las responsabilidades y quienes hayan infringido la ley respondan ante la Justicia. Aportaré la información que me sea requerida. La ciudadanía merece conocer la verdad, sin encubrimientos y sin que nadie esté por encima de la ley. Pero quiero dejar algo muy claro: el pago a los ahorristas no puede quedar pendiente de lo que ocurra conmigo. La discusión sobre mi continuidad en el cargo no puede paralizar las soluciones que necesitan las familias afectadas. Mi prioridad fue impulsar, dentro de la ley y en coordinación con las instituciones responsables, las medidas necesarias para que los ahorristas recuperen sus ahorros. Esclarecer los hechos y resolver los pagos son obligaciones que deben avanzar al mismo tiempo. Una no puede ser excusa para postergar la otra. Les pido que preservemos la calma y la paz. El reclamo de la ciudadanía merece ser escuchado y atendido con respeto, información clara y acciones concretas. Mi suerte personal no está por encima del Paraguay. Cualquiera sea el resultado de este proceso, actuaré con responsabilidad y respeto a la Constitución. Mi compromiso es con la verdad, con las instituciones y, por sobre todo, con las familias paraguayas. Que Dios bendiga al Paraguay. — Santiago Peña (@SantiPenap) November 5, 2026
credit – social media and Twitter
अनेक नागरिकांच्या कौटुंबिक गरजा, वैद्यकीय उपचार आणि घरांचे हप्ते थकले आहेत. एका २१ वर्षांच्या विद्यार्थ्याने भावना व्यक्त करताना सांगितले की, “आमच्या कुटुंबाकडे आता रोजच्या आहारासाठीही पैसे शिल्लक उरलेले नाहीत. राष्ट्रपतींनी आमच्याशी विश्वासघात केला आहे.” तर एका महिला ग्राहकाने सांगितले की, घर खरेदीसाठी बँकेने कर्ज मंजूर केले पण पैसे हस्तांतरित न केल्यामुळे त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Los Angeles : ‘लज्जास्पद…’ लॉस एंजेलिसमधील पराभवांनंतर ट्रम्प संतापले; भारतीय वंशाच्या नित्या रमण यांचा ऐतिहासिक विजय
वाढत्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर संसदेतील खासदारांनी राष्ट्रपती सँटियागो पेन्या यांच्याविरोधात महाभियोगाची कारवाई सुरू करण्याचा एकमुखाने निर्णय घेतला. संकट तीव्र होत असताना पेन्या यांनी मध्यवर्ती बँकेचे प्रमुख कार्लोस कार्व्हाल्हो यांचा राजीनामा घेतला आणि नागरिकांना ५ दिवसांत पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. परंतु याने जनतेचा संताप शांत झाला नाही.
अखेर सँटियागो पेन्या यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश जारी करत आपल्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा केली. सध्या देशाचे उपराष्ट्रपती पेड्रो अलियाना (Pedro Alliana) हे राष्ट्रपतीपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार आहेत. दुसरीकडे, मध्यवर्ती बँकेने लहान ठेवीदारांचे पैसे टप्प्याटप्प्याने परत करण्याची प्रक्रिया सुरू केली असली, तरी संपूर्ण पैसे कधी मिळतील याबद्दल अजूनही अनिश्चितता कायम आहे.
Ans: पॅराग्वेतील 'उनो बँक' (Ueno Bank) डबघाईला आल्यानंतर ३० लाख नागरिकांचे पैसे अडकले आणि राष्ट्रपतींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला.
Ans: 'उनो बँक' मध्यवर्ती बँकेने ताब्यात घेतल्यानंतर सुमारे ३० लाख (3 Million) ग्राहकांचे पैसे आणि निवृत्तीवेतन खाती गोठवली गेली आहेत.
Ans: सँटियागो पेन्या यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पेड्रो अलियाना (Pedro Alliana) हे देशाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.






