Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एअरटेल क्लाउड वाढवण्यासाठी भारती एअरटेलने आयबीएमसोबत केली धोरणात्मक भागीदारीची घोषणा

एअरटेल मल्टिझोन रीजन्स भारतीय उद्योगसंस्थांना त्यांची प्रतिकारशक्ती (रेझिलियन्स) बळकट करण्यास, डेटा रेसिडेन्सीशी संबंधित आवश्यकतांचे पालन करण्यास आणि अत्यावश्यक वर्कलोड्स व अनुप्रयोग सतत कार्यरत ठेवण्यास मदत करते

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Oct 16, 2025 | 07:47 PM
एअरटेल क्लाउड वाढवण्यासाठी भारती एअरटेलने आयबीएमसोबत केली धोरणात्मक भागीदारीची घोषणा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

एअरटेल क्लाउड वाढवण्यासाठी भारती एअरटेलने आयबीएमसोबत केली धोरणात्मक भागीदारीची घोषणा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

Bharti Airtel Marathi News: नवी दिल्ली आणि मुंबई (भारत) आणि आर्मॉन्क, न्यूयॉर्क, ऑक्टोबर 15, 2025 – भारतातील अग्रगण्य दूरसंचार सेवा प्रदात्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलने त्यांच्या नुकत्याच सुरू केलेल्या एअरटेल क्लाउड ला अधिक सक्षम करण्यासाठी IBM (NYSE: IBM) सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे एअरटेल क्लाउडची टेल्को-ग्रेड विश्वसनीयता, उच्च दर्जाची सुरक्षा आणि डेटा रेसिडेन्सी ((स्थानिक डेटा संचयन)) आयबीएमच्या क्लाउड तंत्रज्ञान आणि विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी (AI) बनवलेल्या आधुनिक सॉफ्टवेअरसोबत जोडली जाईल.

एकत्रितपणे, एअरटेल आणि आयबीएम (IBM) या दोन्ही कंपन्यांचे उद्दिष्ट नियमनाधीन उद्योगांतील उद्योगसंस्थांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर्कलोड्स अधिक कार्यक्षमतेने वाढविण्यास सक्षम बनविणे आहे. ही भागीदारी ऑन-प्रिमाइस (स्थानिक सर्व्हर), क्लाउड, एकापेक्षा जास्त क्लाउड्स आणि एज (edge) इन्फ्रास्ट्रक्चर यांसह सर्व स्तरांवर अखंड इंटरऑपरेबिलिटी (परस्पर सुसंगतता) प्रदान करण्यास मदत करेल.

Zomato चा महसूल तिप्पट पण नफा घसरला, कंपनीचे शेअर कोसळले; गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा

या भागीदारीच्या माध्यमातून, एअरटेल क्लाउड ग्राहकांना आयबीएम पॉवर सिस्टम्स पोर्टफोलिओ सेवा स्वरूपात (सेवा म्हणून) वापरू शकतील, ज्यामध्ये नवीनतम पिढीचे आयबीएम पॉवर 11(IBM Power11) स्वयंचलित आणि AI-सक्षम सर्व्हर समाविष्ट असतील. हे सर्व्हर बँकिंग, आरोग्य, सरकारी आणि इतर नियंत्रित क्षेत्रांतील मिशन-क्रिटिकल (अत्यावश्यक) अनुप्रयोगांसाठी उपयुक्त ठरतील. पॉवर 11 हायब्रिड प्लॅटफॉर्म मध्ये आयबीएम पॉवर एआयएक्स, आयबीएम आय, लिनक्स आणि एसएपी क्लाउड ईआरपी यांसारख्या महत्त्वाच्या एंटरप्राइझ वर्कलोड्सनाही समर्थन देईल. याशिवाय, ही भागीदारी आयबीएम पॉवरवरील एसएपी ग्राहकांना त्यांच्या एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग रूपांतरणामध्ये सहाय्य करेल, ज्याद्वारे ते एसएपी क्लाउड ईआरपी ऑन आयबीएम पॉवर व्हर्च्युअल सर्व्हर मध्ये रूपांतर (transformation) सुलभ करण्यास मदत करेल.

गोपाल विट्टल, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, भारती एअरटेल, म्हणाले, “एअरटेल क्लाउड अत्यंत सुरक्षित आणि नियामक अनुरूप (कम्प्लायंट) राहील, अशा प्रकारे तयार करण्यात आले आहे. हे एक चपळ आणि लवचिक (रेझिलियंट) क्लाउड प्लॅटफॉर्म म्हणून उद्योगात नवे मापदंड निर्माण करत आहे. आज, आयबीएम (IBM) सोबतच्या या भागीदारीमुळे आम्ही आमच्या क्लाउड प्लॅटफॉर्ममध्ये अनेक महत्त्वपूर्ण क्षमता जोडत आहोत, ज्यामुळे आयबीएम पॉवर सिस्टम्स वरून स्थलांतराची आवश्यकता असलेल्या आणि AI-सक्षमतेसाठी अपेक्षित असलेल्या विविध उद्योगांच्या गरजा पूर्ण केल्या जातील. या भागीदारीद्वारे, आम्ही भारतातील आमच्या उपलब्धता क्षेत्रांची संख्या चारवरून दहापर्यंत वाढवत आहोत, आणि या सर्व झोन आमच्या स्वतःच्या पुढील पिढीतील शाश्वत डेटा सेंटर्समध्ये होस्ट केली जातील. तसेच, आम्ही एकत्रितपणे लवकरच मुंबई आणि चेन्नई येथे दोन नवीन मल्टिझोन रीजन्स (MZRs) स्थापन करणार आहोत.”

रॉब थॉमस, वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी, आयबीएम (IBM), म्हणाले, “आजच्या काळात उद्योगसंस्थांना आधुनिकीकरणासोबत वाढत्या नियमनाधीन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संबंधी आवश्यकतांमध्ये संतुलन राखणे गरजेचे आहे. भारती एअरटेलसोबतच्या आमच्या या भागीदारीद्वारे, भारतभरातील ग्राहकांना आयबीएमच्या नाविन्यपूर्ण क्लाउड सेवांचा लाभ घेता येईल, ज्या त्यांच्या धोरणात्मक व्यवसाय प्राधान्यांना पूरक अशा वर्कलोड्ससाठी डिझाइन केल्या आहेत. आम्ही एकत्रितपणे एआय(AI) च्या युगात ग्राहकांना खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणण्यास मदत करू.”

आयबीएम च्या वॉट्सनएक्स आणि रेड हॅट ओपनशिफ्ट (AI) एआय या तंत्रज्ञानावर आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) इंफरन्सिंगसाठीच्या सॉफ्टवेअर स्टॅकच्या माध्यमातून, भारतातील ग्राहकांना हायब्रिड क्लाउड वातावरणांमध्ये एआय इंफरन्स चालविण्याची क्षमता मिळेल. ही क्षमता आयबीएमच्या एंटरप्राइज-ग्रेड क्लाउड प्लॅटफॉर्मसोबत एकत्रित आहे, ज्यामध्ये नाविन्यपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर ‘आयएएएस’ (IaaS) आणि ‘पीएएएस’ (PaaS) ऑफरिंग्स असलेला एंटरप्राइज-ग्रेड क्लाउड प्लॅटफॉर्म, तसेच उत्पादकता वाढवण्यासाठी मुख्य एंटरप्राइज कामांमध्ये (workflows) ‘जनरेटिव्ह एआयचा’ (generative AI) प्रभाव वाढवण्यासाठी डिझाइन केलेला आयबीएमचा ऑटोमेशन पोर्टफोलिओ उपलब्ध होईल. ग्राहकांना रेड हॅटच्या हायब्रिड क्लाउड सोल्यूशन्स — जसे रेड हॅट ओपनशिफ्ट व्हर्च्युअलायझेशन, रेड हॅट ओपनशिफ्ट आणि रेड हॅट एआय — यांचा वापर करता येईल. या क्षमतांव्यतिरिक्त, आयबीएमची हायब्रिड क्लाउड आर्किटेक्चर ग्राहकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि क्वांटम कॉम्प्युटिंगमधील भविष्यातील नवोन्मेष (इनोव्हेशन) सक्षम करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.

एअरटेल मल्टिझोन रीजन्स भारतीय उद्योगसंस्थांना त्यांची प्रतिकारशक्ती (रेझिलियन्स) बळकट करण्यास, डेटा रेसिडेन्सीशी संबंधित आवश्यकतांचे पालन करण्यास आणि अत्यावश्यक (मिशन-क्रिटिकल) वर्कलोड्स व अनुप्रयोग सतत कार्यरत ठेवण्यास मदत करतील. एअरटेल आणि आयबीएम (IBM) यांची ही भागीदारी भारतीय उद्योगसंस्थांना मोठ्या प्रमाणावर डिजिटल नवकल्पना (डिजिटल इनोव्हेशन) वेगाने साध्य करण्यास सक्षम करेल.

Share Market Closing: सेन्सेक्स 900 अंकांनी उंचावला, निफ्टीने ओलांडला 25,600 चा टप्पा; ‘या’ कारणांनी बाजारात प्रचंड तेजी

Web Title: Bharti airtel announces strategic partnership with ibm to grow airtel cloud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 07:47 PM

Topics:  

  • airtel
  • Business News
  • share market
  • Stock market

संबंधित बातम्या

Reliance Industries Stock Fall: रिलायन्सच्या शेअर्समध्ये घसरण, तब्बल इतक्या लाख कोटींचा बसला फटका
1

Reliance Industries Stock Fall: रिलायन्सच्या शेअर्समध्ये घसरण, तब्बल इतक्या लाख कोटींचा बसला फटका

Kotak Alts awards: कोटक ऑल्ट्स कॅटॅलिस्ट अवॉर्ड्स जाहीर! सर्वोत्तम आर्थिक पॉडकास्टर्ससाठी इतक्या लाखांचं बक्षीस
2

Kotak Alts awards: कोटक ऑल्ट्स कॅटॅलिस्ट अवॉर्ड्स जाहीर! सर्वोत्तम आर्थिक पॉडकास्टर्ससाठी इतक्या लाखांचं बक्षीस

Indian stock market closed: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचा परिणाम! १५ जानेवारीला शेअर बाजार सुरु राहणार की बंद? 
3

Indian stock market closed: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचा परिणाम! १५ जानेवारीला शेअर बाजार सुरु राहणार की बंद? 

India Electronics Exports: भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना मिळाली जागतिक पसंती; तब्बल निर्यात ‘इतक्या’ कोटींच्या दिशेने
4

India Electronics Exports: भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना मिळाली जागतिक पसंती; तब्बल निर्यात ‘इतक्या’ कोटींच्या दिशेने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.