Bridgestone India मोबिलिटी सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड्स 2025
ब्रिजस्टोन इंडियाने मोबिलिटी सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड्स (MSIA) 2025 च्या पाचव्या आवृत्तीतील विजेत्यांची घोषणा पुण्यात केली. या पुरस्कारांचा उद्देश म्हणजे भारतभरात मोबिलिटीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविणाऱ्या संस्था आणि उपक्रमांना सन्मान देणे. यंदा विजेत्यांना एकूण ₹40 लाखांचे बक्षीस प्रदान करण्यात आले.
या वर्षी हे पुरस्कार दोन श्रेणीत दिले गेले – पहिली ‘कमजोर समुदायांना सशक्त करणारे उपाय’ आणि दुसरी ‘रस्ते सुरक्षेत नवप्रवर्तन आणि उत्कृष्टता’. विजेत्यांचा सन्मान प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता आणि स्नेहलय संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी एका कार्यक्रमात केला. या प्रसंगी उद्योग, शिक्षण आणि शासन यांचे अनेक महत्वाचे लोक उपस्थित होते.
ब्रिजस्टोन आशिया पॅसिफिकचे समूह अध्यक्ष आणि ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक हिरोशी योशिजा म्हणाले, “समाजकल्याणासाठी मोबिलिटीला नवीन अर्थ देणाऱ्या या परिवर्तनकर्त्यांचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटतो. त्यांच्या कार्यातून सुरक्षित, समावेशक आणि सशक्त समुदाय निर्माण होतात.”
Zomato चा महसूल तिप्पट पण नफा घसरला, कंपनीचे शेअर कोसळले; गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा
प्रमुख विजेता: The Association of People with Disability (APD), बेंगळुरू – ‘Rehab on Wheels’ उपक्रमासाठी, ज्याद्वारे दुर्गम भागातील अपंग व्यक्तींना त्यांच्या घरीच पुनर्वसन सेवा दिल्या जातात.
उपविजेता: Impact Guru Foundation (IGF), दिल्ली – ‘Empower Her’ आणि ‘Mission I-M-Possible’ उपक्रमांमुळे 81 लाखांहून अधिक लोकांच्या जीवनात परिवर्तन.
ज्यूरी विशेष सन्मान: झारखंड विकास परिषद (JVP) – 160 हून अधिक गावांमध्ये महिला सशक्तीकरण आणि शाश्वत उपजीविकेला चालना.
प्रमुख विजेता: ALERT (Amenity Lifeline Emergency Response Team), चेन्नई – 4.5 लाख नागरिकांना जीवन वाचवणारे प्राथमिक प्रतिसाद प्रशिक्षण दिल्याबद्दल.
उपविजेता: SAFE India (Social Association for Everyone), भुवनेश्वर – #ZoneZero शाळा सुरक्षा प्रकल्प आणि RSDAS ड्रायव्हर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी.
ज्यूरी विशेष सन्मान: Safety Research Foundation (SRF), बेंगळुरू आणि महाराष्ट्र – ‘BRACE’ प्रकल्पाद्वारे शाळांच्या सुरक्षिततेत सुधारणा.
1996 मध्ये स्थापन झालेली ब्रिजस्टोन इंडिया प्रा. लि. ही जागतिक ब्रिजस्टोन कॉर्पोरेशन समूहाची एक प्रमुख कंपनी आहे. खेड़ा (मध्य प्रदेश) येथे 1998 मध्ये पहिला प्लांट सुरु झाला, तर चाकण (पुणे) येथील प्लांट 2013 मध्ये कार्यरत झाला. इंदूर प्लांटने 2023 मध्ये 10 कोटी टायर्स निर्मितीचा विक्रम केला. मागील 25 वर्षांत कंपनी OEM आणि रिप्लेसमेंट मार्केटमध्ये भारतातील अग्रगण्य टायर उत्पादकांपैकी एक बनली आहे.