Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dussehra 2026: दर घसरले, मुहूर्त साधला! पिंपरी-चिंचवडमध्ये सोन्याच्या खरेदीसाठी तुफान गर्दी

Dussehra: मोठ्या व लहान आकारातील डिझायनर मंगळसूत्रे, अँटिक नेकलेस, टेम्पल ज्वेलरी, पारंपरिक बांगड्या, पाटल्या, सरदार कडे आणि गंठण यांना पसंती मिळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 20, 2026 | 07:01 PM
दसऱ्याच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवडमध्ये सोने खरेदीचा ‘सुवर्णयोग'

दसऱ्याच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवडमध्ये सोने खरेदीचा ‘सुवर्णयोग'

Follow Us
Follow Us:
  • दसऱ्याच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवडमध्ये सोने खरेदीचा ‘सुवर्णयोग’
  • दर घटल्याने सराफा बाजारात तेजी
  • दर कमी झाल्याने खरेदीदारांना दिलासा; बुकिंगला वेग
पिंपरी/Dussehra: साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या विजयादशमीच्या (दसरा) पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील सराफा बाजारात प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरांमध्ये झालेली घसरण आणि आगामी लग्नसराईची चाहूल यामुळे ग्राहकांनी खरेदीसाठी सराफा दालनांमध्ये (PCMC) मोठी गर्दी केली आहे. परंपरेसोबतच सुरक्षित गुंतवणुकीचा भरवसा म्हणून सोन्याला मिळणारी पसंती कायम असून, दरातील घसरणीचा फायदा घेण्यासाठी आगाऊ बुकिंगलाही वेग आला आहे.

दर कमी झाल्याने खरेदीदारांना दिलासा; बुकिंगला वेग

गेल्या आठ-दहा दिवसांत सोन्याचे दर नियंत्रणात आल्याने खरेदीदारांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. भविष्यात दर पुन्हा वाढण्याची शक्यता गृहीत धरून अनेकांनी पितृपंधरवड्यापासूनच दागिन्यांचे आगाऊ बुकिंग सुरू केले होते. दसऱ्याच्या दिवशी ऐनवेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांनी आधीच पसंती नोंदवून ठेवली असून, मुहूर्तावर प्रत्यक्ष डिलिव्हरी घेण्याकडे कल आहे.

सध्या बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४७ हजार रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३५ हजार ५०० ते १ लाख ३६ हजार रुपयांच्या घरात आहे. चांदीचा दर प्रति किलो २ लाख ११ हजार रुपये असून प्रमाणित हिऱ्यांचे दर कॅरेटनुसार ५५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

Dussehra 2026 : दसऱ्याच्या मुहुर्तावर Gold Silver ने दिला तुफान परतावा! एका वर्षात सोन्यात 25%, तर चांदीत 45% वाढ

पारंपरिक ते आधुनिक : टेम्पल आणि अँटिक दागिन्यांना पसंती

यंदाच्या सणासुदीत ग्राहकांकडून पारंपरिक धाटणीच्या दागिन्यांना सर्वाधिक मागणी नोंदवली जात आहे:
सोन्याचे दागिने: मोठ्या व लहान आकारातील डिझायनर मंगळसूत्रे, अँटिक नेकलेस, टेम्पल ज्वेलरी, पारंपरिक बांगड्या, पाटल्या, सरदार कडे आणि गंठण यांना पसंती मिळत आहे.
कमी वजनातील दागिने: दैनंदिन वापरासाठी व बजेटनुसार तयार केलेल्या ‘लाइटवेट’ दागिन्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.
चांदी आणि भेटवस्तू: चांदीच्या मूर्ती, नाणी, आकर्षक भांडी तसेच पैंजण, जोडवी आणि चांदीची घड्याळे मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहेत.
हिरे आणि नाणी: गुंतवणुकीसाठी सोन्या-चांदीची नाणी आणि प्रमाणित हिऱ्यांच्या दागिन्यांचीही लक्षणीय विक्री होत आहे.

सराफा व्यावसायिकांकडून आकर्षक ऑफर्स आणि योजना
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शहरातील सराफ व्यावसायिकांनी विविध सवलतींची घोषणा केली आहे:
दागिन्यांच्या घडणावळीवर (मेकिंग चार्जेस) विशेष सवलत.
आगाऊ बुकिंगवर निश्चित बक्षिसे आणि लकी ड्रॉ योजना.
जुन्या सोन्याच्या बदल्यात नवीन दागिने घेण्याची विशेष सुविधा.
सोन्याची नाणी आणि निवडक भेटवस्तूंवर थेट सूट.

हॉलमार्क आणि पावती तपासूनच खरेदी करा
सणासुदीच्या काळात खरेदी करताना ग्राहकांनी सजग राहण्याचे आवाहन सराफा असोसिएशनने केले आहे. दागिने खरेदी करताना केवळ दरांवर अवलंबून न राहता दागिन्यांवर असलेला हॉलमार्क आणि ६ अंकी अल्फान्युमेरिक ‘एचयूआयडी’ क्रमांक आवर्जून तपासावा. याशिवाय जीएसटीसह अधिकृत बिल, सोन्याचा अचूक प्रति ग्रॅम दर आणि मजुरीचा तपशील समजून घेऊनच अंतिम व्यवहार करावा.

Dasara 2026: दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर घरी आणा ‘या’ वस्तू; सुख-समृद्धीसाठी मानल्या जातात शुभ

“गेल्या आठ-दहा दिवसांत सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. दरवाढ थांबल्याने आणि दर कमी झाल्याने ग्राहकांकडून प्रत्यक्ष खरेदी आणि बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. यंदा ग्राहकांचा कल विशेषतः टेम्पल आणि अँटिक दागिन्यांकडे अधिक दिसून येत आहे.”
— गणेश कटारीया, संचालक, सुनीता ज्वेलर्स
 

 

Web Title: People rush to buy gold jwellery in pcmc dussehra 2026 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • Business News
  • Dussehra
  • Gold
  • Pimpri

संबंधित बातम्या

Dussehra 2026 : दसऱ्याच्या मुहुर्तावर Gold Silver ने दिला तुफान परतावा! एका वर्षात सोन्यात 25%, तर चांदीत 45% वाढ
1

Dussehra 2026 : दसऱ्याच्या मुहुर्तावर Gold Silver ने दिला तुफान परतावा! एका वर्षात सोन्यात 25%, तर चांदीत 45% वाढ

Dasara 2026: दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर घरी आणा ‘या’ वस्तू; सुख-समृद्धीसाठी मानल्या जातात शुभ
2

Dasara 2026: दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर घरी आणा ‘या’ वस्तू; सुख-समृद्धीसाठी मानल्या जातात शुभ

Dussehra 2026: देवीला निरोप देण्यापूर्वी हे जाणून घ्या! दसऱ्याला घट विसर्जन कधी कराल? शुभ वेळ आणि धार्मिक महत्त्व
3

Dussehra 2026: देवीला निरोप देण्यापूर्वी हे जाणून घ्या! दसऱ्याला घट विसर्जन कधी कराल? शुभ वेळ आणि धार्मिक महत्त्व

Dussehra 2026: कुठे रावणदहन, तर कुठे दुर्गापूजा! भारतातील ‘या’ राज्यांमध्ये दसऱ्याचा उत्साह असतो शिगेला, जाणून घ्या खास परंपरा
4

Dussehra 2026: कुठे रावणदहन, तर कुठे दुर्गापूजा! भारतातील ‘या’ राज्यांमध्ये दसऱ्याचा उत्साह असतो शिगेला, जाणून घ्या खास परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.