Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Atal Pension Yojana: ४० वयानंतरही पेन्शन मिळवण्याची संधी! सरकारी योजनेत दरमहा भरा ‘इतके’ पैसे

Atal Pension Yojana: खाजगी नोकरी करणारे आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांसाठी अटल पेन्शन योजना हा निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवण्याचा पर्याय म्हणून या वृत्तात मांडण्यात आला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 19, 2026 | 03:16 PM
Atal Pension Yojana (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Atal Pension Yojana (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अटल पेन्शन योजनेत दरमहा १,००० ते ५,००० रुपयांपर्यंत पेन्शनचे पर्याय आहेत.
  • वृत्तानुसार, वयाच्या ४० व्या वर्षी सुरुवात केल्यास ४,००० रुपये पेन्शनसाठी दरमहा १,१६४ रुपये भरावे लागतात.
  • २० वर्षांत एकूण योगदान २,७९,३६० रुपये होते.
खाजगी नोकरी करणाऱ्यांना सगळ्यात मोठं टेन्शन असतं ते म्हणजे रिटायरमेंट नंतर काय? सरकारी नोकरीवाल्यांना पेन्शन असते, पण खाजगी कंपनीत काम करणाऱ्यांना, रोजंदारीवर काम करणाऱ्यांना म्हातारपणी कोणीच वाली नसतो. हातात पैसा येणं बंद होतं पण खर्च काही थांबत नाही. अशा लोकांसाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना आणली आहे.

या योजनेत तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी जरी पैसे भरायला सुरुवात केली तरी चालतं. दरमहा फक्त 1164 रुपये भरले की वयाच्या 60 वर्षानंतर तुम्हाला दरमहा 4000 रुपये कायमचे मिळणार. Atal Pension Yojana:

सरकारची गॅरंटी, 1000 ते 5000 पर्यंत पेन्शन

PFRDA म्हणजे पेन्शन फंड रेग्युलेटरी अथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार ही एकदम सुरक्षित योजना आहे. यात तुम्हाला आधीच ठरवायचं आहे की तुम्हाला म्हातारपणी किती पेन्शन हवी आहे. हजारापासून ते पाच हजारपर्यंत पर्याय आहेत. तुम्ही जास्त पेन्शन मागितली तर तुमचा महिन्याचा हप्ता पण जास्त असेल.

40 व्या वर्षी सुरुवात केली तर किती फायदा?

PIB च्या रिपोर्टनुसार, जर एखादा माणूस वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेत आला, तर त्याला पुढची 20 वर्षे पैसे भरावे लागतात. म्हणजे 40 ते 60 पर्यंत.तुम्हाला जर 4000 रुपये पेन्शन हवी असेल तर तुम्हाला दरमहा 1164 रुपये भरावे लागतील. वर्षाला झाले 13,968 रुपये. असे 20 वर्षे भरले तर एकूण 2,79,360 रुपये तुम्ही भरता.आणि 60 वर्षे पूर्ण झाली की तुम्हाला दरमहा 4000 रुपये मिळायला सुरुवात होते. म्हणजे वर्षाला 48,000 रुपये. हे पैसे आयुष्यभर मिळणार.

Instamart QIM Sale 2026: ब्युटी लव्हर्ससाठी खुशखबर! इंस्टामार्ट QIM सेलमध्ये स्किनकेअरपासून मेकअपपर्यंत भन्नाट डील्स

संपूर्ण हिशोब एकदा पाहून घ्या..

  • योजनेत येण्याचे वय – 40 वर्षे
  • किती वर्षे पैसे भरायचे – 20 वर्षे
  • दरमहा हप्ता – 1164 रुपयेवर्षाचा हप्ता – 13,968 रुपये
  • 20 वर्षात एकूण भरलेले पैसे – 2,79,360 रुपये
  • 60 नंतर दरमहा पेन्शन – 4000 रुपये
  • वर्षाची पेन्शन – 48,000 रुपये
  • नॉमिनीला मिळणारा फंड – 6.8 लाख रुपये

नवरा-बायको दोघांनाही फायदा

या योजनेत सगळ्यात भारी गोष्ट कोणती असेल तर ती ही आहे. ही पेन्शन फक्त तुमच्यासाठी नाही. तुमचं वय 60 झालं की तुम्हाला पेन्शन चालू होईल. देव करो आणि तुम्हाला काही झालं तर तुमच्या बायकोला किंवा नवऱ्याला तीच पेन्शन पुढे चालू राहते. दोघांचंही म्हातारपण सुरक्षित.6.8 लाख रुपये नॉमिनीला कधी मिळणार?इथे अनेक लोकांचा गैरसमज होतो.

MGNREGA Scheme Days Increased : केंद्र सरकारचा कामगारांसाठी मोठा निर्णय! मनरेगाअंतर्गत 50 दिवसांचा अतिरिक्त रोजगार

60 वर्षे झाली की 6.8 लाख रुपये हातात मिळतील असं वाटतं, पण तसं नाही. हा पैसा तुम्हाला मिळत नाही. जेव्हा खातेदार आणि त्याचा जोडीदार दोघांचंही निधन होतं, तेव्हाच हा 6.8 लाखाचा फंड नॉमिनीला म्हणजे मुलांना दिला जातो. आधी तुम्हाला पेन्शन, मग तुमच्या जोडीदाराला पेन्शन आणि शेवटी मुलांना पैसा, असा क्रम आहे.

कोण या योजनेत पैसे टाकू शकतो?

यासाठी फक्त 3 अटी आहेत. तुम्ही भारतीय नागरिक असला पाहिजे. तुमचं वय 18 ते 40 च्या मध्ये असलं पाहिजे. आणि तुमचं बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खातं असलं पाहिजे.खातं कसं उघडायचं?हे एकदम सोपं आहे. तुमच्या जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जा. तिथे अटल पेन्शन योजनेचा फॉर्म मागा. तो फॉर्म भरा, त्यात तुमची माहिती, बँक खात्याची माहिती आणि नॉमिनी कोण आहे ते लिहा.

Buy Home On 30000 Salary : 30,000 पगार असलेल्यांनाही घेता येणार स्वतःचं घर! फक्त असं करा EMI अन् Down Payment चं गणित

एकदा फॉर्म दिला की दरमहा तुमच्या खात्यातून आपोआप हप्ता कट होईल. तुम्हाला सारखं सारखं जावं लागणार नाही. आता तर हे काम ऑनलाईन पण होतं.म्हातारपण सुखात जायचं असेल तर आतापासूनच तयारी केली पाहिजे. दरमहा थोडे थोडे पैसे बाजूला काढून मोठी पेन्शन तयार होते. वयाच्या 40 शी मध्ये असाल तर ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. त्यामुळे उशीर करू नका, आजच तुमच्या बँकेत जाऊन चौकशी करा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अटल पेन्शन योजनेत किती पेन्शन मिळू शकते?

    Ans: दरमहा १,००० ते ५,००० रुपयांपर्यंत.

  • Que: वयाच्या ४० व्या वर्षी ४,००० रुपये पेन्शनसाठी किती हप्ता भरावा लागतो?

    Ans: दरमहा १,१६४ रुपये.

  • Que: किती वर्षे योगदान द्यावे लागते?

    Ans: वयाच्या ४० व्या वर्षी सुरुवात केल्यास २० वर्षे.

Web Title: Atal pension yojana 4000 monthly pension 1164 contribution age 40 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Business News
  • Pension

संबंधित बातम्या

Instamart QIM Sale 2026: ब्युटी लव्हर्ससाठी खुशखबर! इंस्टामार्ट QIM सेलमध्ये स्किनकेअरपासून मेकअपपर्यंत भन्नाट डील्स
1

Instamart QIM Sale 2026: ब्युटी लव्हर्ससाठी खुशखबर! इंस्टामार्ट QIM सेलमध्ये स्किनकेअरपासून मेकअपपर्यंत भन्नाट डील्स

Kinder Happiness Times Diwali Gift : यंदाची दिवाळी होणार आणखी गोड! किंडरच्या भन्नाट गिफ्ट पॅक्समुळे मुलांच्या चेहऱ्यावर येणार हसू
2

Kinder Happiness Times Diwali Gift : यंदाची दिवाळी होणार आणखी गोड! किंडरच्या भन्नाट गिफ्ट पॅक्समुळे मुलांच्या चेहऱ्यावर येणार हसू

‘बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत’, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचं मोठं विधान
3

‘बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत’, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचं मोठं विधान

Vibrant Goa Summit: उद्योगांना मिळणार जागतिक भरारी! ‘व्हायब्रंट गोवा समिट’मध्ये १,००० हून अधिक व्यावसायिक बैठका; निर्यातीला चालना
4

Vibrant Goa Summit: उद्योगांना मिळणार जागतिक भरारी! ‘व्हायब्रंट गोवा समिट’मध्ये १,००० हून अधिक व्यावसायिक बैठका; निर्यातीला चालना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.