Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारकडून मोठी भेट! फक्त 1 रुपयात 10 एकर जमीन मिळवा, ‘या’ राज्यात खरेदीची सुवर्ण संधी, जाणून घ्या कोणाला फायदा होईल?

एका राज्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग आणि रोजगाराला चालना देण्यासाठी केवळ 1 रुपयाच्या टोकन रक्कमेवर जमीन उपलब्ध करून दिली. दरम्यान, निश्चित गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीच्या आधारावर उद्योजकांना जमिनीचे वाटप केले जाईल.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 06, 2025 | 12:01 PM
सरकारकडून मोठी भेट! फक्त 1 रुपयात 10 एकर जमीन मिळवा, 'या' राज्यात खरेदीची सुवर्ण संधी, जाणून घ्या कोणाला फायदा होईल?

सरकारकडून मोठी भेट! फक्त 1 रुपयात 10 एकर जमीन मिळवा, 'या' राज्यात खरेदीची सुवर्ण संधी, जाणून घ्या कोणाला फायदा होईल?

Follow Us
Close
Follow Us:
  • देशभरात जमिनीच्या किंमती वाढल्या
  • सरकार देत आहे केवळ 1 रुपयात जमीन
  • गुंतवणूक आकर्षित करणे आणि तरुणांसाठी नवीन रोजगाराच्या संधी
आजच्या युगात हक्काची जमीन खरेदी करणं सर्वसामान्यांसाठी अत्यंत कठीण झाले आहे. रिअल इस्टेटच्या झापाट्याने वाढणाऱ्या किमती, कायदेशीर गुंतागुंत आणि जमिनीची कमी उपलब्धा यामुळे सामान्य माणसाला जमीन खरेदी करणं जवळपास अशक्य झालं आहे. देशभरात जमिनीच्या किंमती वाढल्या आहेत. पण अवघ्या 1 रुपयात तुम्हाला कोणी 10 एकर जमिन देतय असं सांगितलं तर? तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का? पण हे खरं आहे. एक रुपात कुठे जमीन कुठे मिळते? जाणून घ्या सविस्तर बातमी…

अनेकदा असे दिसून येते की, उत्तम व्यवसाय कल्पना असूनही, जमिनीच्या गगनाला भिडणाऱ्या किमती उद्योजकांच्या स्वप्नांना धुळीस मिळवून देतात. जर तुम्हीही स्वतःचा कारखाना किंवा उद्योग उभारण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी लॉटरीपेक्षा कमी नाही. बिहार सरकारने औद्योगिक जगात क्रांती घडवण्यासाठी एक उपक्रम सुरू केला आहे, ज्याची देशभर चर्चा होत आहे. सरकारने गुंतवणूकदारांना फक्त एक रुपयाच्या टोकन रकमेत जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे.

रूसून बसलेल्या विदेशी गुंतवणुकदारांना आता आकर्षित करणार SEBI, पैशाची त्वरीत करतील Investment! नोंदणी होणार सोपी

या योजनेला ‘बिहार औद्योगिक गुंतवणूक प्रोत्साहन पॅकेज २०२५’ असं नाव देण्यात आले. त्याचे प्राथमिक उद्दिष्ट राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करणे आणि तरुणांसाठी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे. परंतु ही संधी मर्यादित काळासाठी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, गुंतवणूकदारांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे .

१ रुपयांत जमीन कोणाला भेट म्हणून मिळेल?

प्रत्येकाला १ रुपयांत जमीन मिळेल का? तर उत्तर नाही आहे. सरकारने विशिष्ट श्रेणी आणि अटी स्थापित केल्या आहेत. ही ऑफर प्रामुख्याने मोठ्या गुंतवणूकदारांसाठी आहे, ज्यांच्याकडे राज्यात रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे.

नियमांनुसार, जर एखादी कंपनी १०० कोटी रुपये गुंतवते आणि किमान १००० लोकांना रोजगार देते. तर तिला फक्त १ रुपयांच्या नाममात्र किमतीत १० एकर जमीन दिली जाईल. शिवाय जर गुंतवणूक १,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली तर सरकार त्याच नाममात्र दराने २५ एकर जमीन देईल. शिवाय, फॉर्च्यून ५०० कंपन्यांसाठी नियम आणखी शिथिल आहेत. त्यांना २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह १० एकर जमीन मिळू शकते. या श्रेणींमध्ये न येणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. BIADA इतर गुंतवणूकदारांना त्यांच्या जमिनीच्या दरांवर ५० टक्क्यांपर्यंत मोठी सूट देत आहे.

या पॅकेजमध्ये जमिनीशिवाय आणखी काय समाविष्ट आहे?

सरकार केवळ परवडणारी जमीन देऊन जबाबदारी टाळत नाही,तर उद्योगाची भरभराट करण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणूनच जमिनीसह आर्थिक मदतीसाठी एक व्यापक योजना विकसित करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ४० कोटी पर्यंतचे व्याज अनुदान देण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त, कर सवलत दिली जात आहे. ज्यामध्ये १०० टक्के SGST परतावा किंवा प्रकल्प खर्चाच्या ३०० टक्के पर्यंत निव्वळ SGST परतफेड समाविष्ट आहे. हा लाभ पूर्ण १४ वर्षांसाठी उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, ३० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदानाचा पर्याय देखील आहे. गुंतवणूकदार त्यांच्या व्यवसायाच्या गरजांनुसार यापैकी कोणताही पर्याय निवडू शकतात.

अर्ज कसा करावा

जर तुम्हाला या योजनेअंतर्गत तुमचा उद्योग उभारायचा असेल, तर तुम्हाला सरकारी कार्यालयांना भेट देण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाइन आहे.

सुरुवातीला https://biada1.bihar.gov.in/ या अधिकृत BIADA पोर्टलला भेट द्यावी लागेल.

‘ऑनलाइन अर्ज करा’ विभागात स्वतःची नोंदणी करा.

तुमचे नाव, पत्ता आणि इतर आवश्यक माहिती प्रविष्ट करा. तुमचा ईमेल पत्ता तुमचा वापरकर्ता आयडी बनेल.
पासवर्ड सेट केल्यानंतर, तुम्ही सहजपणे अर्ज भरू शकता.

गुंतवणूकदारांना मदत करण्यासाठी सरकारने १८००३४५६२१४ हा हेल्पलाइन क्रमांक देखील जारी केला आहे. शिवाय, पोर्टलचा ‘लँड बँक’ विभाग प्रत्येक जिल्ह्यात किती रिक्त जमीन उपलब्ध आहे किंवा तुमच्या व्यवसायासाठी कोणता औद्योगिक क्षेत्र योग्य असेल याची संपूर्ण माहिती प्रदान करतो. ‘प्लग अँड प्ले’ शेडची माहिती देखील उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही बांधकामाच्या त्रासाशिवाय त्वरित काम सुरू करू शकता.

Zero Balance Account: झिरो बॅलेन्स असणाऱ्यांना आता मिळणार ‘अमाप’ मोफत सुविधा, RBI ने बँकांना दिला 7 दिवसांचा वेळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: १ जमीन किती एकर आहे?

    Ans: जमिनीचे एकरमध्ये रूपांतर करण्यासाठी, जिथे १ जमीन ०.०५५ एकर बरोबर आहे, जमिनीतील आकृतीला ०.०५५ ने गुणा. तुम्ही ऑनलाइन रूपांतरण कॅल्क्युलेटर देखील वापरू शकता.

  • Que: १ एकरमध्ये ३०x४० आकाराच्या किती जागा आहेत?

    Ans: १ एकरमध्ये ३०x४० च्या किती जागा असतात? ३०x४० च्या जागेचे क्षेत्रफळ १२०० चौरस फूट (३० x ४० = १२००) असते. १ एकर म्हणजे ४३,५६० चौरस फूट असल्याने, १ एकरमध्ये अंदाजे ३६.३ (४३५६०/१२००) अशा जागा बसू शकतात.

  • Que: १ एकर जमिनीसाठी किती गुंठे?

    Ans: एकर ते गुंठा: १ एकर म्हणजे अंदाजे ४०.४७ गुंठा . हा रूपांतरण घटक लहान आणि मोठ्या जमिनीच्या एककांची तुलना सुलभ करतो.

Web Title: Bihar government industrial land scheme 1 rupee investment news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 12:01 PM

Topics:  

  • Bank
  • bihar
  • Business News

संबंधित बातम्या

India EU Free Trade Impact: भारत–EU एफटीए अंतिम टप्प्यात; शेअर बाजारासाठी ठरणार ‘गेम-चेंजर’?
1

India EU Free Trade Impact: भारत–EU एफटीए अंतिम टप्प्यात; शेअर बाजारासाठी ठरणार ‘गेम-चेंजर’?

Sony TCL Joint Venture: सोनी टीव्ही व्यवसायात मोठा ट्विस्ट; सोनी-टीसीएल ऐतिहासिक करार
2

Sony TCL Joint Venture: सोनी टीव्ही व्यवसायात मोठा ट्विस्ट; सोनी-टीसीएल ऐतिहासिक करार

Zomato च्या सीईओपदाचा दीपिंदर गोयल यांचा राजीनामा ; ही व्यक्ती १ फेब्रुवारीपासून स्वीकारणार कंपनीचा पदभार
3

Zomato च्या सीईओपदाचा दीपिंदर गोयल यांचा राजीनामा ; ही व्यक्ती १ फेब्रुवारीपासून स्वीकारणार कंपनीचा पदभार

मुंबईत Embassy Group ची मोठी एन्ट्री! वरळी आणि जुहूमध्ये उभी राहणार आलिशान घरे; करणार ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक
4

मुंबईत Embassy Group ची मोठी एन्ट्री! वरळी आणि जुहूमध्ये उभी राहणार आलिशान घरे; करणार ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.