Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराण-इस्रायल युद्धाचा छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगांना मोठा फटका; एलपीजी तुटवड्यामुळे उत्पादनावर संकट

गॅसचा पुरवठा बंद केल्याने उद्योगांना याचा फटका बसणार आहे. मात्र यावर विजेचा पर्याय आहे. परंतु ही यंत्रणा उभारण्यासाठी किमान दोन ते तीन महिन्यांचा अवधी लागणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 09, 2026 | 01:47 PM
इराण-इस्रायल युद्धाचा छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगांना मोठा फटका (Photo Credit - X)

इराण-इस्रायल युद्धाचा छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगांना मोठा फटका (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

 

  • इराण-इस्रायल युद्धाचा छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगांना मोठा फटका
  • एलपीजी तुटवड्यामुळे उत्पादनावर संकट
छत्रपती संभाजीनगर: इस्रायल -इराण युद्धाचे परिणाम सर्वत्र पाहायला मिळत आहे. विशेष करून पेट्रोलियम आणि गॅसवर अवलंबून असलेल्या बाबींवर याचा अधिक प्रभाव पडत आहे. गॅसचा पुरवठा बंद केल्याने उद्योगांना याचा फटका बसणार आहे. मात्र यावर विजेचा पर्याय आहे. परंतु ही यंत्रणा उभारण्यासाठी किमान दोन ते तीन महिन्यांचा अवधी लागणार आहे. या काळात उत्पादन बंद ठेवण्यास उद्योजकांना आर्थिक नुकसानीची झळ पोहोचणार आहे. एलपीजी गॅसचा तुटवडा पाहता केवळ उद्योगांऐवजी घरगुती वापरासाठी गॅस रिझर्व्ह ठेवा, असे आदेश केंद्र सरकारने जारी केले आहेत. यामुळे उद्योजकांची चिंता वाढली संभाजीनगर शहरात गॅसचा वापर करणारे बहुतेक उद्योग आहेत. या सर्वांना याची झळ बसणार आहे.

गॅसपुरवठा बंद केल्याने उद्योगाला मोठी झळ

छत्रपती संभाजीनगरमध्ये बजाज उद्योगाला सर्वाधिक गॅस लागते. पावडर कोटिंग, पेंटिंग आणि सीईडी कोटिंग यासाठी गॅसची गरज भासते. एकूण ७५ टक्के उत्पादन प्रक्रियेत एलपीजी गॅसचा वापर केला जातो. गॅसपुरवठा बंद केल्याने उद्योगाला मोठी झळ बसणार आहे. सध्या शहरातील उद्योजकांकडे एक आठवड्याचा साठा शिल्लक आहे. मात्र त्यानंतर परिस्थिती चिंतनीय होणार आहे. यावर पर्यायाचा शोध घेतला जात आहे. यात विजेचा वापर केल्यास गॅसवरील अवलंबित्व कमी करता येऊ शकेल. या दृष्टीने उद्योजक कामाला लागले आहेत. मात्र यासाठी विशेष यंत्रणा उभारावी लागणार आहे. यासाठी किमान दोन ते तीन महिने लागू शकता    त. त्यामुळे शिल्लक साठा संपल्यानंतर उद्योजकांना आर्थिक झळ बसण्याची शक्यता वर्तवली आहे. सीएमआयएचे पदाधिकारी मिहीर सौंदलगेकर म्हणाले की, युद्धाची अद्याप स्थिती स्पष्ट नाही. हे युद्ध किती दिवस सुरु राहू शकते यावर अवलंबून आहे.

‘US Patriot System’ निकामी! इराणच्या ड्रोनने बगदाद हादरलं; जयशंकर यांनी दिली 67 हजार भारतीयांची आनंदाची बातमी

पेट्रोलदरवाढीनंतर इव्हीला मागणी !

आखाती देशांतील युद्धामुळे गॅससोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावरही परिणाम दिसून येत आहे. पेट्रोलची कमतरता किंवा दरवाढ अटळ असल्याचे बोलले जात आहे. असे झाल्यास पेट्रोलवर अवलंबून असलेल्या वाहनांसाठी त्रासदायक ठरणार आहे इव्ही वाहनांचा वापर केल्यास विजेचा पुरवठा आणि वाहन करण्याची क्षमता असलेल्या यंत्रणेची अपग्रेड करावी लागेल असे औद्योगिक सूत्रांचे म्हणणे आहे. उद्योगांना गॅस बंद करण्याचे शासनाचे आदेश आहेत. आधी घरगुती वापरासाठी गॅस देणे महत्वाचे. त्यामुळे या निर्णयानुसार काम सुरु आहे. प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी

एका उद्योगाला लागतो दहा हजार किलो गॅस

हे गॅस साठवण्यासाठी बुलेट उभारलेले असतात. शहरात उद्योगांसाठी किती किलो गॅसची गरज आहे याची ठोस माहिती नसली तरी एका पावडर कोटिंग करण्याऱ्या उद्योगाला रोज किमान दहा हजार किलो गॅस लागतो. यानुसार, शहराती उद्योगांना लाखो किलोंच्या घरात मागणी आहे. जमशेदपूर येथे चुनखडीतुन गॅसची निर्मिती करून तो गैस उद्योगांना वापरला जातो असेही बोलले जाते. मात्र संभाजीनगर येथे हा प्रयोग होण्याची चिन्हे नसल्याचे उद्योग सूत्रांनी म्हटले आहे.

उद्योजकांची चिंता वाढली, पर्यायी मार्ग शोधणे सुरू

युद्ध लवकर संपल्यास परिस्थिती आटोक्यात येऊ शकते मात्र युद्ध लांबल्यास उद्योजकांना पर्यायी मार्गांची व्यवस्था करावी लागणार आहे. यात विजेचा पर्याय समोर येऊ शकतो. मात्र ही यंत्रणा उभारण्यासाठी कमीत कमी वेळ कसा लागू शकेल यावर विचार सुरु आहे. किमान दोन ते तीन आठवड्यात ही यंत्रणा उभारल्यास उद्योग सुरळीत सुरु राहू शकणार आहेत इतर पर्यायामध्ये तेलाच्या पर्यायाकडेही उद्योजक पाहत आहेत, मात्र परत तेलाचा तुटवडा भासल्यास अधकनी येऊ शकतील यष्टी विजेचा पर्याय हा कायमस्वरूपी टिकणारा आहे. त्यामुळे विजेकडे उद्योजकांचा अधिक ओढा आहे. सध्या शहरात बजाज उद्योगाला सर्वाधिक गॅसची गरज भासते यासोबतच सवरा, ऋचा इंडस्ट्री. एआयटीजी यांनाही गॅसची गरज भासते. पावडर कोटिंग करणाऱ्या उद्योगांना गॅस लागतो. यासर्वांची चिंता वाढली असुन पर्यायी मार्ग म्हणून विजेची चाचपणी केली जात आहे.

Food Delivery India 2026: फूड डिलिव्हरी मार्केटला मिळाला ‘बूस्ट’; स्वीगी-झोमॅटोच्या ‘फूड डिलिव्हरी’त मोठी वाढ

Web Title: Chhatrapati sambhajinagar industry lpg crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Business News
  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Layoff: यापेक्षा वाईट काय? Luxury Car बनवणारी कंपनी करणार 100000 कामगारांची कपात, 4 फॅक्टरीज होणार बंद
1

Layoff: यापेक्षा वाईट काय? Luxury Car बनवणारी कंपनी करणार 100000 कामगारांची कपात, 4 फॅक्टरीज होणार बंद

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर सर्वात मोठे अपडेट, Fitment Factor बाबत मागण्या होणार पूर्ण?
2

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर सर्वात मोठे अपडेट, Fitment Factor बाबत मागण्या होणार पूर्ण?

Forex Reserve: जून संपतानाच देशाच्या फॉरेक्स रिझर्व्हवर आनंदाची बातमी! 6,35,04,61,65,00,000 कोटी डॉलरवर पोहचला आकडा
3

Forex Reserve: जून संपतानाच देशाच्या फॉरेक्स रिझर्व्हवर आनंदाची बातमी! 6,35,04,61,65,00,000 कोटी डॉलरवर पोहचला आकडा

Indian Economy: इतक्या धक्क्यांनंतरही सावरू शकतो भारताचा विकास दर! Global Agency ने दाखवला अर्थव्यवस्थेचा खरा आरसा
4

Indian Economy: इतक्या धक्क्यांनंतरही सावरू शकतो भारताचा विकास दर! Global Agency ने दाखवला अर्थव्यवस्थेचा खरा आरसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.