Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BPCLचा ब्राझिलियन कच्च्या तेलासाठी धोरणात्मक करार; भविष्यात कालावधीत वाढ होण्याची शक्यता

बीपीसीएलने ब्राझीलच्या पेट्रोब्राससोबत कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी धोरणात्मक करार केला, ज्यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेला मदत होणार आहे. हा करार एक वर्षांसाठी असून, आवश्यकतेनुसार आणखी एका वर्षासाठी वाढवता येईल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 12, 2025 | 04:34 PM
BPCLचा ब्राझिलियन कच्च्या तेलासाठी धोरणात्मक करार; भविष्यात कालावधीत वाढ होण्याची शक्यता
Follow Us
Close
Follow Us:

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने ब्राझीलच्या पेट्रोलियो ब्राझीलेरो एस.ए. (पेट्रोब्रास) सोबत ब्राझिलियन कच्च्या तेलाच्या प्रकारांसाठी धोरणात्मक करार केला आहे. हा करार बीपीसीएलच्या कार्यकारी संचालक मनोज हेडा आणि पेट्रोब्रासच्या संचालक क्लॉडिओ रोमेओ श्लॉसर यांच्या उपस्थितीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या समक्ष साइन करण्यात आला. या कराराद्वारे भारताच्या ऊर्जा सुरक्षेत महत्त्वाची भर पडणार असून कच्च्या तेलाच्या स्रोतांचे विविधीकरण होणार आहे.

Baba Ramdev च्या पतंजलिला मिळाला ‘तगडा’ नफा, केवळ तेल विकून मिळवली 6 हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम

हा करार प्रारंभी एका वर्षासाठी वैध असून, आवश्यकतेनुसार आणखी एका वर्षासाठी वाढवता येईल. त्यामुळे बीपीसीएलच्या रिफायनरींना स्थिर आणि विश्वासार्ह कच्च्या तेलाचा पुरवठा मिळेल, तसेच दोन्ही कंपन्यांमधील सहकार्य मजबूत होईल. बीपीसीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जी. कृष्णकुमार यांनी सांगितले की, “पेट्रोब्राससोबतची भागीदारी ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण असून, हा करार स्थिर आणि स्पर्धात्मक पुरवठा सुनिश्चित करतो. ब्राझीलमधून कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवल्याने आमच्या दीर्घकालीन ऊर्जा धोरणाला मदत होईल.”

बीपीसीएल ही फॉर्च्यून ग्लोबल ५०० कंपनी असून, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची तेल विपणन कंपनी आहे. कंपनीकडे मुंबई, कोची आणि बीना येथे एकूण ३५.३ एमटीपीए शुद्धीकरण क्षमता असलेली अत्याधुनिक रिफायनरी आहे. याशिवाय, बीपीसीएलकडे विस्तृत वितरण नेटवर्क असून, यात २२,०००+ इंधन स्टेशन, ६,२५०+ एलपीजी वितरण केंद्रे, ५२५ ल्यूब्स वितरण केंद्रे आणि १२३ पीओएल साठवण सुविधा यांचा समावेश आहे. कंपनीने महारत्न दर्जा मिळवला असून, ती तेल आणि गॅस उद्योगाच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. भारतातील ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासोबतच बीपीसीएल जागतिक स्तरावर आपला प्रभाव वाढवत आहे.

Stock Market Crash: सेन्सेक्स आणि निफ्टीची जोरदार विक्री, घसरणीचा ‘Villain’ ठरलाय अमेरिका

ऊर्जा क्षेत्रात शाश्वत उपाययोजना करण्यावर भर देत, बीपीसीएलने पुढील पाच वर्षांत ७,०००+ ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा संकल्प केला आहे, ज्यामुळे देशात हरित ऊर्जेला चालना मिळेल. कंपनीने २०४० पर्यंत नेट झिरो उत्सर्जन उद्दिष्ट ठेवले असून, पर्यावरणपूरक धोरणे राबवण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत. यासोबतच, बीपीसीएल पाणी संवर्धन, कौशल्य विकास, आरोग्य सेवा आणि समाजकल्याण क्षेत्रात विविध उपक्रम राबवते. पेट्रोब्राससोबतचा हा करार बीपीसीएलच्या जागतिक सहकार्याला चालना देणारा ठरणार असून, भारताच्या ऊर्जा सुरक्षेला भक्कम आधार देण्यास मदत करेल.

Web Title: Bpcl signs strategic deal for brazilian crude oil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 04:34 PM

Topics:  

  • Government of India
  • Hindustan Petrolium
  • Petrol and diesel

संबंधित बातम्या

Bike Tips: वापराशिवाय बाईकच्या टाकीतील पेट्रोल होते का खराब, काय आहे तथ्य
1

Bike Tips: वापराशिवाय बाईकच्या टाकीतील पेट्रोल होते का खराब, काय आहे तथ्य

दिल्ली, बिहारसह ‘ही’ राज्ये तरुणांना प्रशिक्षण देण्यात पिछाडीवर; परिषदही नाही स्थापन
2

दिल्ली, बिहारसह ‘ही’ राज्ये तरुणांना प्रशिक्षण देण्यात पिछाडीवर; परिषदही नाही स्थापन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.