Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रिजस्टोन इंडियाने मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यातील सुलवाड गावात शाश्वत ऑर्चर्ड प्रकल्प राबवून ग्रामीण महिलांचे केले सबलीकरण

ब्रिजस्टोन इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक हिरोशी योशिझाने म्हणाले, “खरी शाश्वतता केवळ व्यवसायापुरती मर्यादित नसते, तर ती समुदायांना सक्षम करण्याची आणि पर्यावरणाचं संरक्षण करण्याची प्रक्रिया असते.

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Jun 18, 2025 | 05:22 PM
ब्रिजस्टोन इंडियाने मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यातील सुलवाड गावात शाश्वत ऑर्चर्ड प्रकल्प राबवून ग्रामीण महिलांचे केले सबलीकरण (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

ब्रिजस्टोन इंडियाने मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यातील सुलवाड गावात शाश्वत ऑर्चर्ड प्रकल्प राबवून ग्रामीण महिलांचे केले सबलीकरण (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

ब्रिजस्टोन इंडियाने सागेस्ट या संस्थेच्या भागीदारीने मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील सुलवाड गावात ‘ब्रिजस्टोन न्यूट्रिशनल फ्रूट ऑर्चर्ड प्रकल्प‘ सुरू केला आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणारा हा उपक्रम पर्यावरणीय शाश्वतता वाढवणे, पोषणमूल्य सुधारणे आणि ग्रामीण भागात उपजीविकेच्या संधी निर्माण करणे, या उद्दिष्टांवर केंद्रित आहे. सुमारे 4 एकर परिसरात उभारण्यात आलेल्या या ऑर्चर्डमध्ये 15 पेक्षा जास्त प्रकारांची 1,300 हून अधिक फळझाडे शाश्वत पद्धतीने लावण्यात आली आहेत.

या उपक्रमात ब्रिजस्टोनचे स्वयंसेवक आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. पहिल्याच वर्षात या प्रकल्पाने 96% झाडे टिकवून ठेवण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. महिलांनी 1,000 रोपांची नर्सरी यशस्वीरित्या सांभाळली असून, बागेतील जैविक कचऱ्यापासून कंपोस्ट आणि सेंद्रिय कीटकनाशक तयार करून सेंद्रिय शेतीला चालना दिली आहे आणि उत्पन्नाच्या नव्या संधीही निर्माण केल्या आहेत. झाडे फळधारणेच्या अवस्थेत आल्यानंतर, त्यांच्या विक्रीमुळे महिलांसाठी वर्षभर उत्पन्नाचे स्थिर साधन उपलब्ध होणार आहे.

भारतात फाल्कन 2000 बिझनेस जेट्सचे उत्पादन करण्यासाठी डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एअरोस्ट्रक्चर यांच्यात करार

उपजीविकेच्या संधी बळकट करण्याबरोबरच या उपक्रमाच्या माध्यमातून सुलवाड गावात 251 घरगुती किचन गार्डन्सची उभारणी करून पोषण सुरक्षेत (प्रत्येक व्यक्तीला आवश्यक ते पौष्टिक अन्न वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे) देखील सुधारणा केली आहे. या बागांमुळे कुटुंबांना ताजी, घरात पिकवलेली भाजी मिळत असून त्यांचा आहार अधिक पौष्टिक झाला आहे. नियमित प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमांमुळे गावकऱ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव, सहभागाची भावना आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढली आहे.

ब्रिजस्टोन इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक हिरोशी योशिझाने म्हणाले, “खरी शाश्वतता केवळ व्यवसायापुरती मर्यादित नसते, तर ती समुदायांना सक्षम करण्याची आणि पर्यावरणाचं संरक्षण करण्याची प्रक्रिया असते. या प्रकल्पात केवळ झाडे लावलेली नाहीत, तर आशा, जिद्द आणि उज्वल भविष्यासाठी बीजे पेरण्यात आली आहेत. महिलांच्या नेतृत्वाखाली आणि समुदायाच्या सहभागातून पोषण, उपजीविका आणि पर्यावरण या तिन्ही क्षेत्रांवर एकाच वेळी दीर्घकालीन परिणाम घडवता येतो, हे या उपक्रमाने सिद्ध केले आहे.”

हा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. यात अनेक भागधारकांचा सहभाग आहे. ब्रिजस्टोन आणि त्यांचे भागीदार सागेस्ट यांनी या प्रकल्पाची अंमलबजावणी केली असली तरी स्थानिक ग्रामपंचायतीने जमीन उपलब्ध करून दिली, स्थानिक महिलांना या प्रकल्पाची देखरेख व व्यवस्थापनाचे काम केले आणि या प्रकल्पाला लागून असलेल्या निवासी शाळेतील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाला सक्रिय पाठिंबा दिला आहे. पर्यावरणाची शाश्वतता, ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास आणि महिलांचे सबलीकरण केंद्रस्थानी ठेवून ब्रिजस्टोन इंडियाने सुरू केलेला न्यूट्रिशनल फ्रूट ऑर्चर्ड प्रकल्प म्हणजे कॉर्पोरेट जबाबदारीतून उभा राहिलेला, समाजाच्या सहभागातून घडणाऱ्या परिवर्तनाचा एक आदर्श नमुना आहे.

ब्रिजस्टोन इंडियाबद्दल

ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनची ग्रुप कंपनी असलेल्या ब्रिजस्टोन इंडिया प्रा. लि.चे कामकाज 1996 मध्ये सुरू झाले. मार्च 1998 मध्ये त्यांनी मध्यप्रदेशमधील खेडा येथे त्यांचा निर्मिती कारखाना सुरू केला. भारतातील रस्त्यांवर भारतात उत्पादित झालेले टायर भारतात वापरण्याचे ध्येय ब्रिजस्टोनने साध्य केले आहे. पुण्यातील चाकण येथे 2013 मध्ये अजून एक कारखाना सुरू करत त्यांनी विस्तारीकरण केले.

2023 मध्ये इंदूरच्या कारखान्यात त्यांनी आपल्या 100 दशलक्षाव्या टायरचे उत्पादन केले. 25 वर्षांच्या कमी कालावधीत ब्रिजस्टोन इंडिया प्रा. लि. ही ओईएम आणि रिप्लेसमेंट बाजारपेठेतील एक आघाडीची टायर कंपनी झाली आहे.

आता नाही भरता येणार प्रलंबित जीएसटी रिटर्न, १ जुलैपासून लागू होतील नविन नियम; जाणून घ्या

Web Title: Bridgestone india empowers rural women by implementing a sustainable orchard project in sulwad village dhar district madhya pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 05:22 PM

Topics:  

  • Business News
  • share market

संबंधित बातम्या

‘या’ ५ चुका तुमचा क्रेडिट स्कोअर खराब करू शकतात, ते कसे टाळायचे जाणून घ्या!
1

‘या’ ५ चुका तुमचा क्रेडिट स्कोअर खराब करू शकतात, ते कसे टाळायचे जाणून घ्या!

सामान्य माणसाला मोठा दिलासा, दैनंदिन वस्तूंवरील कराचा बोजा होणार कमी; अर्थ मंत्रालयाने दोन-स्तरीय GST दर रचना केली प्रस्तावित
2

सामान्य माणसाला मोठा दिलासा, दैनंदिन वस्तूंवरील कराचा बोजा होणार कमी; अर्थ मंत्रालयाने दोन-स्तरीय GST दर रचना केली प्रस्तावित

Swiggy ने वाढवली प्लॅटफॉर्म फी, आता कंपनी प्रत्येक ऑर्डरवर आकारणार ‘इतके’ रुपये
3

Swiggy ने वाढवली प्लॅटफॉर्म फी, आता कंपनी प्रत्येक ऑर्डरवर आकारणार ‘इतके’ रुपये

केंद्र सरकारने सागरी विकास निधी ७०,००० कोटींपर्यंत वाढवला, देशाला शिपबिल्डिंग हब बनवण्याची तयारी
4

केंद्र सरकारने सागरी विकास निधी ७०,००० कोटींपर्यंत वाढवला, देशाला शिपबिल्डिंग हब बनवण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.