
Shriram Financial Services (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मुंबई, २२ ऑक्टोबर २०२६: श्रीराम ग्रुपने आपल्या भांडवली बाजार व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. २०२० मध्ये अधिग्रहित केलेल्या Way2Wealth या कंपनीचे नाव बदलून आता श्रीराम फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (Shriram FS) असे करण्यात येत आहे. या बदलामुळे ब्रोकिंग व्यवसायाला श्रीराम ब्रँडच्या विश्वासार्हतेशी जोडण्यात येणार असून, ग्रुपच्या भांडवली बाजारविषयक धोरणाला नवी दिशा मिळणार आहे. नामांतराची प्रक्रिया सध्या सुरू आहे. Shriram Financial Services:
या नव्या टप्प्याचा भाग म्हणून अमित गोलिया यांची श्रीराम फायनान्शियल सर्व्हिसेसच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (MD & CEO) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना भांडवली बाजार क्षेत्रातील २६ वर्षांचा अनुभव असून, यापूर्वी त्यांनी Motilal Oswal, Axis Securities आणि SBI Securities या संस्थांमध्ये काम केले आहे.
श्रीराम FS भारतातील अशा गुंतवणूकदारांवर लक्ष केंद्रित करणार आहे, जे गुंतवणुकीच्या बाबतीत योग्य मूल्याला प्राधान्य देतात. कंपनी Assisted DIY (Do-It-Yourself) गुंतवणूक प्लॅटफॉर्म विकसित करणार आहे. स्वतःच्या गुंतवणुकीचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य राखतानाच तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरणार आहे. स्वयंचलित डिजिटल गुंतवणूक प्लॅटफॉर्म आणि पारंपरिक सल्लागार-आधारित सेवांमधील दरी कमी करणे, हा या मॉडेलचा मुख्य उद्देश आहे.
कंपनी किरकोळ तसेच उच्च निव्वळ संपत्ती असलेल्या (HNI) ग्राहकांसाठी गुंतवणूक, ट्रेडिंग आणि संपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध सेवा उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज, कमोडिटीज, मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी (MTF), म्युच्युअल फंड (MF), प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री (IPO), पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (PMS), रिसर्च ॲनालिस्ट (RA) सेवा, नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS), डिपॉझिटरी पार्टिसिपंट आणि डिमॅट सेवा, मुदत ठेवी (FD), म्युच्युअल फंडांवर कर्ज (LAMF), सिक्युरिटीजवर कर्ज (LAS) तसेच इतर गुंतवणूकविषयक उपायांचा समावेश असेल.
भारतातील भांडवली बाजारात किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग सातत्याने वाढत आहे. आर्थिक जागरूकतेत वाढ, डिजिटल सेवांचा वाढता वापर आणि तंत्रज्ञानासोबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवण्याची नव्या पिढीतील गुंतवणूकदारांची अपेक्षा यामुळे या क्षेत्राला चालना मिळत आहे.
श्रीराम FS च्या माध्यमातून श्रीराम ग्रुप आपल्या भांडवली बाजारातील उपस्थितीला अधिक बळकट करणार असून, श्रीराम ब्रँडवरील ग्राहकांचा विश्वास आणि विश्वासार्हतेचा फायदा कंपनीला होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेतील विमा आणि भांडवली बाजार क्षेत्रातील प्रमुख समूह असलेला Sanlam Group, जो श्रीराम ग्रुपचा दीर्घकालीन भागीदार आहे, या व्यवसायाच्या विकासासाठी जागतिक स्तरावरील आपला अनुभव आणि कौशल्य उपलब्ध करून देणार आहे.
श्रीराम ग्रुपचे भारतीय ग्राहकांविषयीचे सखोल ज्ञान आणि वितरण नेटवर्कची ताकद यांची सांगड Sanlam च्या जागतिक वित्तीय सेवा आणि संपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभवाशी घातली जाणार आहे. यामुळे व्यवसायाचा दीर्घकालीन विकास साधण्यास मदत होईल.
या उपक्रमामुळे श्रीराम ग्रुपची भांडवली बाजारातील उपस्थिती अधिक मजबूत होणार आहे. तसेच कर्जपुरवठा, विमा, मालमत्ता व्यवस्थापन आणि ब्रोकिंग या क्षेत्रांतील विद्यमान व्यवसायांना पूरक ठरत ग्राहकांच्या संपत्ती निर्मितीच्या संपूर्ण प्रवासात अधिक व्यापक सेवा देण्याची क्षमता वाढणार आहे.
या घडामोडीबाबत श्रीमती सुभास्री श्रीराम, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीराम कॅपिटल लिमिटेड, म्हणाल्या:
“भारताची भांडवली बाजारपेठ विकासाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. गुंतागुंतीच्या होत चाललेल्या गुंतवणूक विश्वात मार्गक्रमण करताना गुंतवणूकदारांना विश्वासार्ह भागीदारांची गरज आहे.
श्रीराम FS मुळे श्रीराम ग्रुपच्या भांडवली बाजारविषयक सेवांची व्याप्ती पूर्णत्वाकडे जात असून, ग्राहकांच्या संपत्ती निर्मितीच्या प्रवासात अधिक अर्थपूर्ण योगदान देण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. श्रीराम ब्रँडची ताकद, आमच्या वितरण नेटवर्कची व्यापकता आणि Sanlam चे जागतिक कौशल्य यांच्या एकत्रित बळावर आम्ही तंत्रज्ञान, सल्ला आणि विश्वास यांची सांगड घालणारे व्यासपीठ उभारत आहोत. भारतीय तसेच जागतिक गुंतवणूकदारांच्या नव्या पिढीच्या गरजा पूर्ण करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.”
“अमित यांना वित्तीय सेवा, भांडवली बाजार आणि व्यवसाय परिवर्तन क्षेत्रातील सखोल अनुभव आहे. ग्राहकांच्या गरजा, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि वितरण व्यवस्था यांविषयीची त्यांची समज श्रीराम FS ला विकासाच्या पुढील टप्प्यात नेण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनी एक वेगळे आणि सल्ला-केंद्रित गुंतवणूक व्यवसाय मॉडेल विकसित करेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! DA वाढीचं नेमकं काय झालं?
अमित गोलिया, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीराम फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, म्हणाले:
“श्रीराम FS च्या विकासातील या महत्त्वपूर्ण टप्प्यावर नेतृत्व करण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी सन्मान आहे. श्रीराम ब्रँडची ताकद, Sanlam चे धोरणात्मक सहकार्य आणि समर्पित टीम यांच्या बळावर भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन प्लॅटफॉर्मपैकी एक उभारण्याची आमच्याकडे अनोखी संधी आहे.
सोपे, पारदर्शक आणि तंत्रज्ञानावर आधारित गुंतवणुकीचे अनुभव निर्माण करणे, वितरण क्षमता मजबूत करणे आणि ग्राहक, भागीदार तसेच भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणे, यावर आमचा भर असेल. मूल्याला प्राधान्य देणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन प्लॅटफॉर्मपैकी एक उभारण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
Ans: कंपनीचे नवीन नाव श्रीराम फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (Shriram FS) असे करण्यात येत आहे.
Ans: अमित गोलिया यांची कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
Ans: उत्तर: त्यांना भांडवली बाजार क्षेत्रातील २६ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी Motilal Oswal, Axis Securities आणि SBI Securities या संस्थांमध्ये काम केले.