Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! DA वाढीचं नेमकं काय झालं?

DA Hike : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक जुलै 2026 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्ता (DA) वाढीच्या घोषणेची प्रतीक्षा करत आहेत. दिलेल्या बातमीनुसार, यावेळी 3% वाढ होण्याची शक्यता असून, DA 60% वरून 63% होऊ शकतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 22, 2026 | 12:15 PM
DA Hike (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

DA Hike (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • DA वाढीच्या घोषणेची प्रतीक्षा कायम
  • 3% वाढ झाल्यास DA 63% होण्याची शक्यता
  • जुलै 2026 पासूनच्या एरियरकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष

DA Hike Update: सणासुदीचे दिवस आले की सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक महागाई भत्ता वाढीची वाट पाहत आहेत. आता सगळ्यांचे लक्ष जुलै 2026 पासूनच्या DA वाढीकडे लागलंय. दसरा झाला तरी अजून सरकारने यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. त्यामुळे आता दिवाळीच्या आधी कॅबिनेट मिटिंगमध्ये हा निर्णय होणार का, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. जर 3% वाढ झाली तर कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगलीच वाढ होणार आहे आणि जुलैपासूनचा फरकाचा पैसाही मिळणार आहे. DA Hike :

घोषणा का लांबली?

केंद्र सरकार वर्षातून दोनदा DA वाढवतं. एकदा जानेवारीमध्ये आणि दुसऱ्यांदा जुलैमध्ये. जरी हा भत्ता जुलैपासून लागू होत असला तरी त्याची घोषणा नेहमी उशिरा, म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सणांच्यावेळी केली जाते.

यावेळी पण तसंच झालंय. 14 ऑक्टोबरला झालेल्या कॅबिनेट बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस दिला गेला, पण DA चा विषय घेतलाच नाही. त्यानंतर 16 ऑक्टोबरला बाकीच्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस मंजूर झाला, पण DA ची फाईल तशीच पेंडिंग राहिली. आता 27 ऑक्टोबरला एक मोठी बैठक होणार आहे, ज्यात मंत्रालयांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. पण कर्मचारी म्हणत आहेत की या बैठकीशिवाय सरकारने दिवाळीच्या आधी वेगळी घोषणा करून DA वाढवावा.

किती टक्के वाढणार?

AICPI म्हणजे महागाईचा जो निर्देशांक असतो, त्याच्या आकडेवारीनुसार यावेळी 3% वाढ होण्याची शक्यता जास्त आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या बेसिक पगाराच्या 60% DA मिळतो. जर 3% वाढ झाली तर तो थेट 63% होईल.

Gold Silver Rate Today: एका झटक्यात 5500 रुपयांनी घसरली चांदी, सोन्यामध्येही मोठी घसरण; आजचा दर घ्या जाणून

मागच्या वर्षीचा पॅटर्न पाहिला तर 2025 मध्ये जुलैचा DA 6 ऑक्टोबरला जाहीर झाला होता. 2024 मध्ये तो 21 ऑक्टोबरला जाहीर झाला होता. त्यामुळे यावेळी पण दिवाळीच्या आधीच ही घोषणा होईल अशी अपेक्षा सगळ्यांना आहे.

पगारात किती वाढ होणार? हे गणित समजून घ्या..

तुमचा बेसिक पगार 18,000 रुपये आहे. सध्या 60% प्रमाणे तुम्हाला 10,800 रुपये DA मिळतो. जर DA 63% झाला तर तुम्हाला 11,340 रुपये मिळतील. दर महिन्याला थेट 540 रुपयांची वाढ. आणि वर्षाचं गणित केलं तर 6,480 रुपयांचा जास्त फायदा.

ज्यांचा बेसिक पगार जास्त आहे, त्यांना यापेक्षा जास्त फायदा होणार आहे. पेन्शनधारकांना पण DR म्हणजे महागाई सवलत याच प्रमाणात वाढून मिळणार आहे.जुलैपासूनचा एरियर मिळणार का?हो, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकारने घोषणा जरी उशिरा केली तरी DA हा 1 जुलै 2026 पासूनच लागू होणार म्हणजेच जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार महिन्यांचा जो फरक आहे, तो एरियर म्हणून तुमच्या खात्यात एकदम जमा होणार आहे.

SBI Data Leak Confirmed : SBI ने अखेर डेटा चोरी स्वीकारली! ग्राहकांची माहिती डार्क वेबवर लीक झाल्याची बँकेकडून पुष्टी

दिवाळीच्या आधी पगार वाढ plus एरियरचा पैसा असा डबल धमाका होऊ शकतो. पण याचा फायनल आकडा आणि कधी पैसा येणार हे वित्त मंत्रालय अधिकृत GR काढल्यावरच कळेल.एकंदरीत काय तर, कर्मचाऱ्यांना थोडी अजून वाट पाहावी लागणार आहे. दिवाळीच्या आधी गुडन्यूज मिळेल अशी आशा आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA किती टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे?

    Ans: DA मध्ये 3% वाढ होण्याची शक्यता आहे.

  • Que: DA वाढल्यास महागाई भत्ता किती होईल?

    Ans: 3% वाढ मंजूर झाल्यास DA 60% वरून 63% होऊ शकतो.

  • Que: DA वाढीची घोषणा कधी होऊ शकते?

    Ans: अधिकृत तारीख निश्चित झालेली नाही.

Web Title: Da hike 2026 3 dearness allowance increase expected before diwali rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Business News
  • Central Governement
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ebola Outbreak : नायजेरियात इबोलाचा शिरकाव; पहिल्या रुग्णाची पुष्टी, ४४ जण आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली
1

Ebola Outbreak : नायजेरियात इबोलाचा शिरकाव; पहिल्या रुग्णाची पुष्टी, ४४ जण आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली

Yemen News : येमेनमध्ये हुथी बंडखोरांचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला; ७३ जणांचा मृत्यू, अडीच लाख नागरिक विस्थापित!
2

Yemen News : येमेनमध्ये हुथी बंडखोरांचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला; ७३ जणांचा मृत्यू, अडीच लाख नागरिक विस्थापित!

Ahilyanagar News :अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत विखे-थोरातांना धक्का; बिनविरोधचा फॉर्म्युला फसला,२ नोव्हेंबरला रणधुमाळी
3

Ahilyanagar News :अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत विखे-थोरातांना धक्का; बिनविरोधचा फॉर्म्युला फसला,२ नोव्हेंबरला रणधुमाळी

China-Taiwan Conflict : चीन तैवान संघर्ष ; दक्षिण चीन समुद्रात हालचाली वाढल्या
4

China-Taiwan Conflict : चीन तैवान संघर्ष ; दक्षिण चीन समुद्रात हालचाली वाढल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.