आज भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प २०२४ साधार करणार आहेत. आज सकाळी ११ वाजता हा अर्थसंकल्प सादर केला या जाणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींवर भर दिली जाणार आहे याकडे जनतेचे लक्ष असणार आहे. महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली होती. या घोषणेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यासंदर्भात अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन या घोषणा करणार आहेत.
लाडकी बहीण योजनेमध्ये पहिला दर महिना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेसंदर्भात ही योजना मध्य प्रदेशमध्ये लागू करण्यात येणार आहे अशी तज्ज्ञाची माहिती आहे. त्यासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. या योजनेमुळे मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार लोकसभा निवडणुकीमध्ये आले आहे. त्यानंतर आता ही योजना महाराष्ट्रामध्ये देखील राबवण्यात आली आहे. त्यामुळे आता या अर्थसंकल्पामध्ये यासंदर्भात मोठी घोषणा करण्यात येणार आहेत अशी तज्ज्ञाची माहिती आहे.
मीडिया रिपोर्टनुसार असा दावा करण्यात आला आहे, की अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होऊ शकते. पीएम किसान सन्मान निधी योजनेची वार्षिक रक्कम ६००० रुपयांवरून ८००० रुपये केली जाऊ शकते. त्याचबरोबर आज बजेट दिनाच्या दिवशी शेअर मार्केटची सेन्सेक्स २०० हून अधिक अंकांनी वाढला. निफ्टी ७० अंकांच्या वर होता. अचानक शेअर बाजारात वाढ झाल्याने गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. उद्योग क्षेत्रातील नेत्यांनी अंतराळ अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आयात सवलती, प्रक्षेपण वाहनांच्या घटकांवर जीएसटी सूट, उत्पादकता-आधारित प्रोत्साहने (PLI) आणि अंतराळसंबंधित खरेदीसाठी वाढीव सरकारी खर्च यांसारख्या विविध प्रोत्साहनांची मागणी केली आहे.