Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर संकट; आर्थिक सर्वेक्षणातून महत्वाची माहिती समोर!

गेल्या काही काळापासून जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर गदा येईल, असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे सर्व स्तरातून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच आता आज संसदेत सादर झालेल्या देशाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात देखील याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या शोधानंतर सर्व प्रकारच्या कामगारांवर होणाऱ्या परिणामाबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चिंता व्यक्त केली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 22, 2024 | 06:56 PM
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर संकट; आर्थिक सर्वेक्षणातून महत्वाची माहिती समोर!

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर संकट; आर्थिक सर्वेक्षणातून महत्वाची माहिती समोर!

Follow Us
Follow Us:

मागील काही काळापासून जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे रोजगार संकटाचा इशारा देण्यात आला आहे. अशातच आज (ता.२२) संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणातही जगभरात वाढत असलेल्या एआयच्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने तयार केलेले आर्थिक सर्वेक्षण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केले. सर्वेक्षणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शोध लागल्यानंतर सर्व प्रकारच्या कामगारांवर होणाऱ्या परिणामाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

काय म्हटलंय आर्थिक सर्वेक्षण अहवालात?

येत्या काही वर्षांत आणि दशकांमध्ये भारताच्या उच्च विकास दर वाढीमध्ये एआयचा सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो. याला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी क्षेत्र यांना भागीदारीत काम करावे लागणार आहे, असेही आज संसदेत सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात सुचवण्यात आले आहे.

24 तास आधीच पीएम मोदींनी सांगितले, कसा असेल देशाचा अर्थसंकल्प; वाचा… कोणत्या बाबींवर असेल फोकस?

इकॉनॉमिक सर्व्हेने ‘द इकॉनॉमिस्ट’ मासिकाच्या एका स्वतंत्र संशोधन लेखाचा दाखला देत म्हटले आहे की, देशाची सेवा क्षेत्रातील निर्यात पुढील दशकात हळूहळू नामशेष होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकते. टेलिकम्युनिकेशन आणि इंटरनेट बूममुळे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगला चालना मिळाली, परंतु तंत्रज्ञानाच्या पातळीवर येणारा बदलाचा पुढील टप्पा थांबवला जाण्याची शक्यता आहे.

कॉर्पोरेट क्षेत्राची समाजाप्रती जबाबदारी

आर्थिक सर्वेक्षणात सरकारने म्हटले आहे की, या सर्वांमध्ये कॉर्पोरेट क्षेत्राची समाजाप्रती मोठी जबाबदारी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स श्रमाला चालना कशी देऊ शकते? नाहीशी कशी करू शकते? याचा विचार कॉर्पोरेट क्षेत्राला करावा लागणार आहे. सर्वेक्षणानुसार, गेल्या दोन वर्षांत आयटी क्षेत्रात नोकर भरतीत घट झाली आहे.

आर्थिक सर्वेक्षणानुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही कमी किंवा मध्यम उत्पन्न असलेल्या देशांच्या अर्थव्यवस्थेची अगदी शेवटची गरज आहे. या सर्वेक्षणात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या नोटचाही दाखला देण्यात आला असून, आयएमएफच्या माहितीनुसार जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे रोजगाराच्या संकटासोबत असमानतेचाही धोका वाढला आहे.

Web Title: Economic survey 2024 artificial intelligence threats jobs nirmala sitharaman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 06:52 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Nirmala Sitharaman

संबंधित बातम्या

गोवंडीत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; चक्क AIच्या मदतीने करत होते रुग्णांवर उपचार
1

गोवंडीत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; चक्क AIच्या मदतीने करत होते रुग्णांवर उपचार

OpenAI News : OpenAI मधील ‘एथिक्स’ प्रमुखांची वर्षभरातच एक्झिट; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांमुळे चर्चेला उधाण
2

OpenAI News : OpenAI मधील ‘एथिक्स’ प्रमुखांची वर्षभरातच एक्झिट; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांमुळे चर्चेला उधाण

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर
3

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर

AI Job Layoffs : सांगताय काय? ज्या AI ची जगभर चर्चा, त्याच क्षेत्रात हाहाःकार? 66% कर्मचाऱ्यांवर… धक्कादायक वास्तव उघड
4

AI Job Layoffs : सांगताय काय? ज्या AI ची जगभर चर्चा, त्याच क्षेत्रात हाहाःकार? 66% कर्मचाऱ्यांवर… धक्कादायक वास्तव उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.