Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोवंडीत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; चक्क AIच्या मदतीने करत होते रुग्णांवर उपचार

गोवंडीत बोगस डॉक्टरांचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या पाच जणांनी वैद्यकीय नोंदणी नसतानाही क्लिनिक सुरू करून रुग्णांवर उपचार केल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, आजारांची लक्षणे शोधण्यासाठी ते Google, YouTube आणि ChatGPTसारख्या AI साधनांचा वापर करत होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 15, 2026 | 11:02 AM
गोवंडीत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; चक्क AIच्या मदतीने करत होते रुग्णांवर उपचार

गोवंडीत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; चक्क AIच्या मदतीने करत होते रुग्णांवर उपचार

Follow Us
Follow Us:
  • गोवंडी परिसरात क्लिनिक थाटून रुग्णांवर उपचार करणाऱ्या पाच बोगस डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली.
  • आरोपी Google, YouTube आणि ChatGPTवर आजारांची लक्षणे शोधून रुग्णांना उपचार व औषधे देत असल्याचे तपासात समोर आले.
  • पोलिसांनी छाप्यादरम्यान १,१९,३२४ रुपयांची अॅलोपॅथी औषधे, इंजेक्शन, सिरिंज आणि वैद्यकीय साहित्य जप्त केले.
इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या ५ बोगस डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे. गोवंडीमध्ये या डॉक्टरांनी आपला दवाखाना थाटला होता. विशेष म्हणजे, हे बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करण्यासाठी एआयची मदत घेत असल्याचे तपासात समोर आले आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सगीर अहमद (सगीर क्लिनिक), अखिलेश कुमार दुबे (गायत्री क्लिनिक), महमूद आलम शरीफ शेख (आयशा क्लिनिक), केशव प्रसाद पटेल (पटेल क्लिनिक) आणि मोहम्मद आफताब खान (आफताब खान क्लिनिक) यांचा समावेश आहे.

‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम

गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत घोणे, सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ काळे आणि पोलीस उपनिरीक्षक संदीप रहाणे यांच्या पथकाने या कारवाईचे नेतृत्व केले.

यूट्यूबवर पहायचे उपचाराचे व्हिडीओ

तपासात उघड झालेली धक्कादायक बाब म्हणजे, अटकेतील बहुतांश आरोपी हे केवळ आठवी ते दहावीपर्यंतच शिक्षण घेतलेले आहेत. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे कोणतेही नोंदणी प्रमाणपत्र नसताना हे बोगस डॉक्टर गूगल, युट्यूब आणि ‘चॅट जीपीटी’ सारख्या एआय टूल्सवर आजारांची लक्षणे शोधून रुग्णांवर उपचार करत होते तसेच त्यांना हाय-डोस अँटिबायोटिक्स (औषधे) देत होते.

Crime News : तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये; आरोपी सिया गोयलच्या वडिलांचे दुकान सील

छाप्यादरम्यान पोलिसांनी १,१९,३२४ रुपये मूल्याची अॅलोपॅथी औषधे, इंजेक्शन, सिरिंज आणि वैद्यकीय साधने जप्त केली आहेत. या प्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात ४ आणि निर्मल नगर पोलीस ठाण्यात १ अशा एकूण ५ एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत. गोवंडी, शिवाजी नगर, बैगणवाडी आणि मानखुर्द या भागांत अवैध नर्सिंग होम आणि शेकडो बोगस क्लिनिक्सचे जाळे पसरले आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे बोगस डॉक्टर अनेकदा पकडले जाऊनही जामिनावर सुटताच पुन्हा आपली ‘दुकानदारी’ थाटतात. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष आणि ढिसाळ कारभारामुळे या आरोपींचे धाडस वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Web Title: Govandi fake doctors ai treatment chatgpt arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Bogus Doctor
  • crime news

संबंधित बातम्या

AI Renamed SI : अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन पर्वाची सुरुवात; ‘AI’ आता भूतकाळ; ट्रम्प यांनी जारी केला ‘SI’ चा आदेश
1

AI Renamed SI : अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन पर्वाची सुरुवात; ‘AI’ आता भूतकाळ; ट्रम्प यांनी जारी केला ‘SI’ चा आदेश

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
2

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
3

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
4

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.