Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टोमॅटोचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल; घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय!

देशाच्या सर्वच भागांमध्ये टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र, आता केंद्र सरकारने टोमॅटोचे दर नियंत्रणात आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार एनसीसीएफमार्फत सामान्य ग्राहकांना ६० रुपये प्रति किलो दराने अल्प दरात टोमॅटो विक्री करणार आहे. ज्यामुळे आता सर्वसामान्यांना स्वस्तात टोमॅटो उपलब्ध होणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 28, 2024 | 03:10 PM
टमाटरचे दर भिडले गगनाला आणखी वाढू शकतात किमती

टमाटरचे दर भिडले गगनाला आणखी वाढू शकतात किमती

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. तर ग्राहकांना मात्र टोमॅटो खरेदी अवघड झाले आहे. जुलैअखेपर्यंत टोमॅटोचे दर नियंत्रणात येतील, अशी केंद्र सरकारला अपेक्षा होती. मात्र, देशाच्या दक्षिण भागात खरिपातील टोमॅटो सुरु झालेला असतानाही टोमॅटोचे काही केल्या आटोक्यात येत नाहीये. हीच बाब लक्षात घेऊन आता केंद्र सरकारने टोमॅटो दर नियंत्रणासाठी प्लॅन बनवला आहे. ज्यामुळे आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

काय आहे सरकारचा प्लॅन?

सध्या टोमॅटो बाजारात ८० ते १०० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. मात्र, आता केंद्र सरकार सर्वसामान्य ग्राहकांना ६० रुपये प्रति किलो या अल्प दरात टोमॅटो विक्री करणार आहे. केंद्र सरकारची सरकारी संस्था असलेल्या नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडियाकडून (एनसीसीएफ) अल्प दरात टोमॅटो विक्री केली जाणार आहे.
(फोटो सौजन्य : istock)

हेही वाचा : तब्बल… 84.16 कोटी रुपये पगार, कोण आहेत विजय कुमार; ज्यांची सर्वदूर होतीये चर्चा!

कधीपासून सुरु होणार स्वस्तात टोमॅटो विक्री

नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एनसीसीएफ) माहितीनुसार, केंद्र सरकारकडून टोमॅटोची ही अल्प दरात विक्री 29 जुलै 2024 पासून सुरु केली जाणार आहे. ही विक्री सध्या तरी राजधानी दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि आसपासच्या परिसरांमध्ये सुरु केली जाणार आहे. या सरकारी टोमॅटो विक्रीद्वारे ग्राहकांना अल्प दरात टोमॅटो विक्रीसाठी उपलब्ध करून देणे, हा उद्देश आहे. असेही एनसीसीएफने म्हटले आहे.

किती आहे सध्या दर?

टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे सरकार चिंतेत असून, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्याच्या दिल्ली येथील बाजारात टोमॅटो ७७ ते ८० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे बाजारात टोमॅटोचा पुरवठा होत नसल्याने राजधानी दिल्लीसह देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोच्या दरात वाढ सुरूच आहे. दरम्यान, मागील वर्षी याच कालावधीत टोमॅटोचे दर 165 रुपये किलोपर्यत पोहोचले होते. यावेळी मात्र टोमॅटोचे दर जवळपास निम्म्याने कमी आहेत.

Web Title: Central government will sell tomatoes rs 60 per kg to the general consumers through nccf

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2024 | 02:26 PM

Topics:  

  • Agriculture News
  • Tomato Price Hike

संबंधित बातम्या

फणसकिंग ठरलेले रत्नागिरी येथील देसाई पितापुत्राची आधुनिक शेतीतील यशोगाथा; फणस शेतीतून कमावतात कोट्यवधी
1

फणसकिंग ठरलेले रत्नागिरी येथील देसाई पितापुत्राची आधुनिक शेतीतील यशोगाथा; फणस शेतीतून कमावतात कोट्यवधी

बजेट, उत्पादन, MSP पासून KCC पर्यंत; गेल्या ११ वर्षांत देशाच्या कृषी क्षेत्रात झाले महत्वाचे बदल
2

बजेट, उत्पादन, MSP पासून KCC पर्यंत; गेल्या ११ वर्षांत देशाच्या कृषी क्षेत्रात झाले महत्वाचे बदल

Mosoon Update : पेरणीची घाई करू नका : राज्य सरकारचं शेतकऱ्यांना आवाहन
3

Mosoon Update : पेरणीची घाई करू नका : राज्य सरकारचं शेतकऱ्यांना आवाहन

दुकानदारांनो सावधान! शेतकऱ्यांची फसवणूक पडेल महागात; कृषी विभागाकडून भरारी पथके तयार
4

दुकानदारांनो सावधान! शेतकऱ्यांची फसवणूक पडेल महागात; कृषी विभागाकडून भरारी पथके तयार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.