Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Retail Inflation Update: सर्वसामान्यांचे बजेट बिघडलं! जून महिन्यात महागाई 4.38 टक्क्यांवर; आले-टोमॅटोचे भाव कडाडले

भारतात जून २०२६ मध्ये किरकोळ महागाईचा दर ४.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. अन्नधान्य, इंधन आणि विशेषतः भाजीपाल्याच्या वाढत्या किमतींमुळे महागाईच्या आकडेवारीत ही वाढ नोंदवली गेली आहे. यामध्ये आले आणि टोमॅटोच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीवरून समोर आले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 13, 2026 | 06:35 PM
महागाई गगनाला भिडली; ऐन सणासुदीच्या काळात फटका बसणार, खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ

महागाई गगनाला भिडली; ऐन सणासुदीच्या काळात फटका बसणार, खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ

Follow Us
Follow Us:
  • सर्वसामान्यांचे बजेट बिघडलं!
  • जून महिन्यात महागाई 4.38 टक्क्यांवर
  • आले-टोमॅटोचे भाव कडाडले
Retail Inflation Update: इराण-अमेरिका युद्ध पुन्हा सुरू झाल्याने देशभरात महागाईत सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, किरकोळ महागाई मे महिन्यातील ३.९३% वरून जूनमध्ये ४.३८% पर्यंत वाढली. या वाढीचे सर्वात मोठे कारण म्हणजे खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमती. ग्राहक किंमत निर्देशांकानुसार CPI, मे महिन्यातील ४.७८% च्या तुलनेत जूनमध्ये अन्नधान्याची महागाई ५.३२% होती. याचा अर्थ लोकांना पूर्वीपेक्षा खाद्यपदार्थांवर जास्त खर्च करावा लागला.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कापूस लागवडीसाठी सरकारकडून मिळणार तब्बल ‘इतकी’ मदत; जाणून घ्या कोण करु शकतं अर्ज?

मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, ग्रामीण भागातील किरकोळ महागाईचा दर मे महिन्यातील ४.२५ टक्क्यांवरून जूनमध्ये ४.७४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. शहरी भागांमध्ये, महागाईचा दर मे महिन्यातील ३.५३ टक्क्यांवरून जूनमध्ये ३.९२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
किरकोळ अन्नधान्य महागाईचा दर मे महिन्यातील ४.७८ टक्क्यांवरून जूनमध्ये ५.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात वार्षिक आधारावर ज्या पाच वस्तूंच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे, त्या खालीलप्रमाणे आहेत: चांदीचे दागिने (१३३.२१ टक्के), आले (५०.४१ टक्के), सोने/हिरे/प्लॅटिनमचे दागिने (३६.८२ टक्के), टोमॅटो (३१.९२ टक्के) आणि मनुका व सुकी द्राक्षे (२०.५२ टक्के).

जून MPC मध्ये, RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी नमूद केले की जागतिक आव्हाने असूनही, किरकोळ महागाई (CPI) अजूनही RBI च्या लक्ष्य पातळीपेक्षा कमी आहे. पण येत्या काही महिन्यांत महागाई वाढण्याची शक्यता आहे आणि ती आरबीआयने निर्धारित केलेल्या वरच्या मर्यादेपर्यंत पोहोचू शकते. ते म्हणाले की, महागाईशी संबंधित धोके वाढले आहेत, परंतु सध्याच्या परिस्थितीत व्याजदरात बदल करण्याऐवजी परिस्थिती अधिक स्पष्ट होऊ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. RBI डेटा-आधारित निर्णय घेणे सुरू ठेवेल आणि महागाई आणि पुरवठा बाजूच्या दबावांवर बारीक लक्ष ठेवेल.

सरकारने सोपवली RBI वर जबाबदारी

या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर, सरकारने आता भारतीय रिझर्व्ह बँकेवर महागाई सुमारे ४% राखण्याची जबाबदारी सोपवली आहे. पण आवश्यक असल्यास महागाई २% ने जास्त किंवा २% ने कमी (म्हणजेच २% ते ६% दरम्यान) होऊ शकते. यामुळे आरबीआयसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. अन्नपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेवर महागाई नियंत्रणात ठेवण्याचा दबाव वाढू शकतो.

महागाई वाढण्याचे कारण काय?

महागाई वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मे महिन्यात अन्न आणि तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ. भाजीपाला, डाळी, फळे आणि दूध यांसारख्या दैनंदिन वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत गेल्याने महागाई वाढली आहे. विशेषतः मध्य-पूर्वेतील तणावामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झालेली वाढ, हे महागाई वाढीमागील एक प्रमुख कारण आहे. तेलाच्या किमती वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्चही वाढला आहे, ज्याचा परिणाम इतर अन्नपदार्थांवर झाला आहे.

SEBI ने कर्मचाऱ्यांसाठी कडक केले नियम! Share Market मध्ये गुंतवणुकीवर आणली गदा, नोकरी बदलण्यावरही वाढली देखरेख

Web Title: Budget spoiled june inflation at 438 percent ginger tomato prices increased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • bank RBI
  • High Inflation Rate
  • Indian Inflation
  • Inflation
  • Inflation News
  • RBI
  • tomato
  • Tomato Price Hike

संबंधित बातम्या

सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार; कांद्याचे दर घटणार, बफर स्टॉकमधून वाढवली कांद्याची विक्री
1

सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार; कांद्याचे दर घटणार, बफर स्टॉकमधून वाढवली कांद्याची विक्री

Retail Inflation CPI : बाप रे… सप्टेंबरमध्ये महागाईचा शॉक! थेट 23 महिन्यांचा रेकॉर्ड मोडला; किरकोळ महागाई 5.54 टक्क्यांवर
2

Retail Inflation CPI : बाप रे… सप्टेंबरमध्ये महागाईचा शॉक! थेट 23 महिन्यांचा रेकॉर्ड मोडला; किरकोळ महागाई 5.54 टक्क्यांवर

Rupee vs US Dollar : एका झटक्या मजबूत झाला रुपया? RBI च्या निर्णयाचा धमाका… डॉलर बॅकफूटवर, नेमकी काय स्थिती?
3

Rupee vs US Dollar : एका झटक्या मजबूत झाला रुपया? RBI च्या निर्णयाचा धमाका… डॉलर बॅकफूटवर, नेमकी काय स्थिती?

RBI Measures To Strengthen Rupee : Dollar ची विक्री, नियम कडक करणार… रुपयाला सावरण्यासाठी RBI घेणार कोणते मोठे निर्णय?
4

RBI Measures To Strengthen Rupee : Dollar ची विक्री, नियम कडक करणार… रुपयाला सावरण्यासाठी RBI घेणार कोणते मोठे निर्णय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.