Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Central Tax Devolution: राज्यांना मोठे गिफ्ट! केंद्र सरकारकडून 1,09,019 लाख कोटींचा निधी जारी, कोणत्या कामांवर होणार खर्च?

Central Tax Devolution : आगामी सणासुदीचा काळ पाहता केंद्र सरकारने सर्व राज्यांसाठी आपली तिजोरी उघडली आहे. राज्यांमधील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी योजनांना गती देण्यासाठी केंद्र सरकारने १.०९ लाख कोटी रुपयांचा कर वाटा राज्यांना जारी केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 01, 2026 | 07:22 PM
(फोटो सौजन्य: Chatgpt)

(फोटो सौजन्य: Chatgpt)

Follow Us
Follow Us:
  • राज्यांना मोठे गिफ्ट!
  • केंद्र सरकारकडून 1,09,019 लाख कोटींचा निधी जारी
  • कोणत्या राज्यांना किती निधी?
Central Tax Devolution: सणासुदीच्या दिवसांपूर्वी केंद्र सरकारने काही राज्यांना मोठा दिलासा जाहीर केला आहे. अर्थ मंत्रालयाने कर वाटपाअंतर्गत काही राज्यांच्या खात्यांमध्ये ₹१.०९ लाख कोटींचा अतिरिक्त हप्ता ( Central Tax Devolution ) हस्तांतरित केला आहे. ही रक्कम नेहमीच्या मासिक देयकापेक्षा वेगळी आहे. यामुळे राज्यांना त्यांच्या योजना, विकास प्रकल्प आणि इतर आवश्यक खर्च पूर्ण करण्यासाठी लक्षणीय मदत होईल.

Stock Market New Timing: शेअर बाजारात ट्रेडिंगच्या वेळेत झाला मोठा बदल! नवीन CAS सिस्टीम लागू; जाणून घ्या डिटेल्स

याबाबत केंद्र सरकारने १ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यांना कर वाटपाचा अतिरिक्त हप्ता वितरित केला आहे. ही रक्कम १० ऑगस्ट रोजी वितरित केलेल्या नियमित मासिक हप्त्यापेक्षा वेगळी आहे. नेमकं काय आहे वेगळेपण? आणि कोणत्या राज्याला किती निधी मिळाला आहे? सविस्तर जाणून घेऊयात.

काय आहे टॅक्स शेअरिंग?

अर्थ मंत्रालयाच्या मते, केंद्र सरकारने गोळा केलेल्या एकूण कर महसुलापैकी ४१% रक्कम राज्यांना दिली जाते. ही रक्कम संपूर्ण आर्थिक वर्षात १४ हप्त्यांमध्ये राज्यांना वितरित केली जाते. यामुळे राज्यांना त्यांच्या कार्यक्रमांसाठी आणि सणांच्या आधी अतिरिक्त निधी उपलब्ध होतो आणि ज्यामुळे त्यांना त्यांच्या खर्चाचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येतो. हा निधी विकासकामांसाठी वापरता येतो ज्यामुळे राज्याची वाटचाल व्यवस्थित होते.

कोणत्या राज्यांना किती मिळाला निधी?

या अतिरिक्त हप्त्यात उत्तर प्रदेशला सर्वाधिक रक्कम मिळाली. देशातील इतर प्रमुख राज्यांनाही भरीव रक्कम मिळाली.

उत्तर प्रदेश: अंदाजे ₹१९,२०८ कोटी
बिहार: अंदाजे ₹१०,८४५ कोटी
मध्य प्रदेश: अंदाजे ₹८,०१० कोटी
पश्चिम बंगाल: अंदाजे ₹७,८६६ कोटी
महाराष्ट्र: अंदाजे ₹७,०२२ कोटी

राज्यांना अतिरिक्त पैसे का मिळाले?

केंद्र सरकारने जारी केलेली ही अतिरिक्त रक्कम राज्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने आहे. याशिवाय, सण, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि सरकारी योजनांदरम्यान वाढलेल्या खर्चासाठी ही योजना खूप उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे देश राज्यासह जनतेला याचा लाभ चांगला मिळू शकतो. त्यामुळे हा निधी राज्यासोबतच जनतेसाठी ही तितकाच महत्त्वाचा आहे.

PM Crop Insurance : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पीक विम्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढवली; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

Web Title: Central tax devolution releases 1 09 lakh crore states

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 07:22 PM

Topics:  

  • Business News
  • central goverment
  • Marathi News
  • tax
  • Tax Collection

संबंधित बातम्या

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!
1

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ
2

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ

Food History : समोसा-जलेबीपासून बिर्याणीपर्यंत; भारताचे वाटतात, पण मुळं आहेत परदेशात!
3

Food History : समोसा-जलेबीपासून बिर्याणीपर्यंत; भारताचे वाटतात, पण मुळं आहेत परदेशात!

Ed Sheeran : गाण्यांचा बादशहा बोलला अन् सभागृह शांत झालं! गाझाच्या परिस्थितीवर एड शीरनचा थेट वार!
4

Ed Sheeran : गाण्यांचा बादशहा बोलला अन् सभागृह शांत झालं! गाझाच्या परिस्थितीवर एड शीरनचा थेट वार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.