
(फोटो सौजन्य: Chatgpt)
सीबीआयने दाखल केलेल्या या आरोपपत्रात कंपनीच्या माजी बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड कंपनीचे माजी कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र सुधाळकर, माजी मुख्य जोखीम अधिकारी कृष्णन गोपालकृष्णन अय्यर आणि रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचे माजी मुख्य कर्ज व जोखीम अधिकारी धनंजय भगवानप्रसाद तिवारी या सर्वांवर आर्थिक गुन्हेगारी कायद्यांतर्गत ठपका ठेवण्यात आला आहे.
CBI च्या तपासानुसार, या सर्व आरोपींनी मिळून गुन्हेगारी कट रचला आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची फसवणूक केली. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडने विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम ठरवून दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून इतरत्र वळवली. ही रक्कम काही मध्यस्थ आणि माध्यम कंपन्यांचा वापर करून रिलायन्स एडीए समूहातील इतर कंपन्यांकडे वळविण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
हे संपूर्ण प्रकरण युनियन बँक ऑफ इंडिया आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कन्सोर्टियमने (बँकांचा समूह) दिलेल्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने नोंदवले होते. कन्सोर्टियममधील एकूण १० सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे या घोटाळ्यामुळे तब्बल ३,५२६ कोटी ३५ लाख रुपयांचे अतोनात आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सीबीआय आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. यामुळे अनिल अंबानींच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या कंपनींच्या शेअर्समध्येही दिसून येत आहे.