Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Commercial LPG Cylinder Price Hike: दिवाळीच्या तोंडावर महागाईचा झटका! LPG सिलेंडर महागला; हॉटेलमधील जेवणही महागणार?

Commercial LPG Cylinder Price Hike: दिवाळीपूर्वी व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी १ नोव्हेंबरपासून १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे नवीन दर लागू केले आहेत. मुंबईत आता या सिलिंडरची किंमत २,७७४.५० रुपये झाली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 01, 2026 | 11:50 AM
Commercial LPG Cylinder Price Hike: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Commercial LPG Cylinder Price Hike: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • व्यावसायिक LPG सिलिंडर १० रुपयांनी महागला.
  • मुंबईत १९ किलो सिलिंडरचा दर २,७७४.५० रुपये.
  • घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही.

दिवाळी काही दिवसांवर आली असतानाच एक वाईट बातमी आली आहे. पुन्हा एकदा गॅसच्या दरात वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी 1 नोव्हेंबरपासून व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात 10 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटवाल्यांचा खर्च वाढणार असून बाहेर जेवण महाग होण्याची शक्यता आहे. Commercial LPG Cylinder Price Hike:

दिल्लीमध्ये आता 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची नवीन किंमत 2,820 रुपये झाली आहे. काही आठवड्यांपूर्वीच या सिलिंडरच्या किमती कमी केल्या होत्या, पण आता पुन्हा वाढ करण्यात आली आहे. मात्र, एक चांगली गोष्ट म्हणजे घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे घरात स्वयंपाक करणाऱ्या गृहिणींना तरी दिलासा मिळाला आहे.

आधी हजाराने वाढ, नंतर थोडी कपात, आता पुन्हा वाढ

तुम्हाला आठवत असेल, 1 मे रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 1000 रुपयांची मोठी वाढ झाली होती. त्यावेळी 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 993 रुपयांनी वाढून थेट 3000 रुपयांच्या वर गेली होती. सगळे व्यापारी हवालदिल झाले होते. त्यानंतर एकदा किंमत थोडी कमी करण्यात आली होती. लोकांना वाटलं आता दर स्थिर राहतील, पण दिवाळीच्या तोंडावर पुन्हा 10 रुपयांची वाढ करण्यात आली.

काय सांगता… आता नवीन गॅस कनेक्शन मिळणार नाही? e-KYC न केल्यामुळे LPG लाभार्थ्यांची संख्या घटली

10 रुपये वाटायला कमी वाटत असले तरी हॉटेल व्यवसायासाठी तो मोठा खर्च आहे. एका मोठ्या हॉटेलमध्ये दिवसाला 10-15 सिलिंडर लागतात. त्यामुळे महिन्याचा खर्च 3000-4000 रुपयांनी वाढतो. हा खर्च शेवटी ग्राहकांकडूनच वसूल केला जातो. त्यामुळे सकाळचा नाश्ता असो, दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण, सगळं बाहेर खाणं महाग होणार आहे.

तुमच्या शहरात किती आहे नवीन दर?

तेल कंपन्यांनी सगळ्या मोठ्या शहरांचे नवीन दर जाहीर केले आहेत. सगळीकडेच जवळपास 10 रुपयांची वाढ झाली आहे.

  • दिल्लीत – 10 रुपये वाढून नवीन किंमत 2,820 रुपये
  • मुंबईत – 10 रुपये वाढून नवीन किंमत 2,774.50 रुपये
  • कोलकातामध्ये – 10 रुपये वाढून 2,964 रुपये
  • चेन्नईमध्ये – 11.50 रुपये वाढून 2,994.50 रुपये
  • बंगळूरूमध्ये – 10 रुपये वाढून 2,908 रुपये
  • पाटण्यात – 10 रुपये वाढून 3,110.50 रुपये
  • लखनऊमध्ये – 10 रुपये वाढून 2,942.50 रुपये

व्यापाऱ्यांना मोठा फटका

दिवाळी हा हॉटेल व्यवसायासाठी सगळ्यात मोठा सीझन असतो. लोक बाहेर खरेदीला जातात, कुटुंबासोबत जेवायला जातात. अशा वेळीच गॅस महाग झाला तर व्यापाऱ्यांचा नफा कमी होतो. अनेक छोट्या टपरीवाल्यांना, वडापावच्या गाड्यावाल्यांना पण या व्यावसायिक सिलिंडरचाच वापर करावा लागतो. त्यांच्यासाठी तर 10 रुपयांची वाढ पण खूप आहे.

LPG Rate Today: LPG Rate वाढला? महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचे आजचे दर पाहून धक्का बसेल!

सध्या घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ न केल्यामुळे तरी थोडा दिलासा आहे. पण व्यावसायिक दरात सातत्याने होणारी वाढ पाहता, येणाऱ्या काळात बाहेरचं खाणं अजून महाग होणार हे नक्की. दिवाळीच्या सणात गोडधोड बनवण्यासाठी लागणाऱ्या खर्चाबरोबरच आता हॉटेलचे बिल पण वाढणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात किती वाढ झाली आहे?

    Ans: १९ किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात १० रुपयांची वाढ झाली आहे.

  • Que: LPG सिलिंडरचे नवीन दर कधीपासून लागू झाले?

    Ans: व्यावसायिक LPG सिलिंडरचे नवीन दर १ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत.

  • Que: मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची नवीन किंमत किती आहे?

    Ans: मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची नवीन किंमत २,७७४.५० रुपये आहे.

Web Title: Commercial lpg cylinder price hike november 2026 mumbai delhi rates rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • lpg cylinder
  • LPG Gas Price
  • price hike news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.