LPG Rate Today: LPG Rate वाढला? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
LPG Rate 23 August 2026: सामान्य नागरिकांच्या खिशावर ताण पडणारी बातमी सध्या समोर येत आहे. महिन्याच्या सुरुवातीला घरखर्चाचं बजेट ठरवाताना आपण गॅस सिलेंडरचा भाव अगदी नक्कीत लिहितो. जरा सिलेंडरचा भाव बदलला तरी पूर्ण महिन्याचे बजेट कोलमडते. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या दरानेच नागरिकांनवा 14.2 किलोचा सिलेंडर मिळणार आहे. मात्र महाराष्ट्रात प्रत्येक शहरात एकच किंमत नाही. वाहतूक, स्थानिक कर आणि इतर खर्चामुळे वेगवेगळ्या भागात दर थोडेफार बदलतात. त्यामुळे सिलेंडर बुक करण्याआधी आपल्या शहराचा दर पाहणे फायद्याचे ठरते.
राज्यातील प्रमुख शहरांचा विचार केला तर मुंबई, ठाणे आणि ग्रेटर मुंबई परिसरात 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत 941.50 रुपये आहे. पुण्यात हा दर 945 रुपये, तर नाशिकमध्ये 945.50 रुपये आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये सिलेंडरसाठी 944.50 रुपये मोजावे लागतात.
रायगडमध्ये घरगुती गॅसचा दर 952.50 रुपये आहे. जळगावमध्ये तो 947.50 रुपये, तर नागपूरमध्ये 993.50 रुपये आहे. गडचिरोलीमध्ये 1,011.50 रुपये आणि गोंदियामध्ये 1,010.50 रुपये असा तुलनेने जास्त दर दिसतो. अर्थात, ग्राहकांनी ही किंमत अंतिम मानण्याआधी बुकिंगच्या वेळी लागू असलेला दर तपासणे योग्य ठरेल.
हॉटेल, चहाची टपरी, रेस्टॉरंट किंवा इतर व्यवसायांमध्ये वापरला जाणारा 19 किलोचा LPG सिलेंडर घरगुती सिलेंडरपेक्षा वेगळ्या दराने मिळतो. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2,691.50 रुपये आहे. ठाण्यात ती 2,693 रुपये, तर पुण्यात 2,752 रुपये आहे. नाशिकमध्ये 2,767 रुपये, नागपूरमध्ये 2,915.50 रुपये आणि रायगडमध्ये 2,783.50 रुपये असा दर आहे. गडचिरोली आणि गोंदिया येथे व्यावसायिक सिलेंडरसाठी 2,941.50 रुपये मोजावे लागतात. व्यावसायिक ग्राहकांसाठी गॅसचा खर्च हा रोजच्या व्यवसायाशी जोडलेला असल्याने दरातील बदल त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो. LPG Rate Today:
ज्या घरांमध्ये सिलेंडरऐवजी पाइपद्वारे नैसर्गिक गॅस म्हणजे PNG वापरला जातो, त्यांच्यासाठीही शहरानुसार दर बदलतात. मुंबई आणि रायगडमध्ये PNG सुमारे 51.50 रुपये आहे. पुण्यात हा दर 51 रुपये, तर नाशिकमध्ये 50.25 रुपये आहे. लातूर, उस्मानाबाद आणि रत्नागिरीमध्ये PNG चा दर 45.50 रुपये असल्याची माहिती आहे. कोल्हापूरमध्ये तो 49.82 रुपये, तर नागपूरमध्ये 48.30 रुपये आहे. त्यामुळे LPG प्रमाणेच PNG वापरणाऱ्यांनीही आपल्या भागातील ताजा दर तपासणे गरजेचे आहे.
गॅस सिलेंडरची किंमत जाणून घेण्यासाठी आता गॅस एजन्सीमध्ये फोन करण्याची किंवा प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. संबंधित कंपनीच्या वेबसाइट किंवा अॅपवरून ग्राहक माहिती पाहू शकतात. Indane ग्राहक Indian Oil च्या डिजिटल सेवांमधून आपल्या राज्याचा आणि जिल्ह्याचा तपशील निवडून दर तपासू शकतात. Bharat Gas ग्राहक ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून सिलेंडरची माहिती पाहू शकतात. HP Gas वापरणाऱ्यांसाठी HP Pay अॅप हा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय UMANG अॅपमधूनही LPG शी संबंधित सेवा वापरता येतात. सध्या घरगुती LPG च्या दरात कोणतीही वाढ झालेली नसल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र शहरानुसार किंमत बदलत असल्याने सिलेंडर बुक करण्यापूर्वी ताजा दर पाहणे ही छोटी सवय घरच्या बजेटसाठी नक्कीच उपयोगी ठरू शकते.
FSSAI परवाना नसल्याची कबुली, दोन रुग्णालयांतील कॅन्टीन बंद; रुग्णांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह






