Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhanteras Gold Investment Guide : धनत्रयोदशीला सोन्याची खरेदी? दागिने, कॉईंन की गोल्ड ETF; गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय उत्तम?

Dhanteras Gold Investment Guide : धनत्रयोदशीच्या पवित्र मुहूर्तावर सोने खरेदी करताना अनेकांसमोर प्रश्न पडतो की, पारंपारिक दागिन्यांची खरेदी करावी, सोन्याचे सिक्के घ्यावेत की डिजिटल पर्याय म्हणून Gold ETF मध्ये गुंतवणूक करावी?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 06, 2026 | 12:29 PM
गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय उत्तम? ( सौजन्य - Chatgpt )

गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय उत्तम? ( सौजन्य - Chatgpt )

Follow Us
Follow Us:
  • धनत्रयोदशीला सोन्याची खरेदी?
  • दागिने, कॉईंन की गोल्ड ETF
  • गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय उत्तम?
Dhanteras Gold Investment Guide : भारतात खास मुहुर्तावर सोन्याची खरेदी केली जाते. धनत्रयोदशी दिवशी तर सोनं खरेदी करणं ही भारतीय कुटुंबांमधील फार जुनी परंपरा आहे. अनेक लोकं या दिवशी सोन्याचे दागिने, नाणी किंवा सोन्याचे बिस्किट खरेदी करतात. पण बदलत्या काळानुसार सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा पद्धतीही बदलत केल्या आहेत. आता थेट सोनाच्या दुकानात जाऊन कोण सोन्याची खरेदी करत नाही. तर आता सोनं खरेदी करण्याची पद्धत बदलली आहे. आता गोल्ड ईटीएफ आणि सॉवरेन गोल्ड बॉण्ड्स यांसारखे पर्यायही बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हीही धनतेरसच्या दिवशी किंवा दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या बजेटनुसार कोणता पर्याय योग्य ठरणार आहे? सगळं समजून घेऊयात. ( Dhanteras Gold Investment Guide ) 

Gold Price Prediction 2026: सोने खरेदीची हीच योग्य वेळ? घसरणीनंतर पुन्हा मोठी उसळी घेण्याचा अंदाज

सोन्याची नाणी खरेदी करणं फायद्याच आहे?

जर तुम्हाला सणाच्या दिवशी मुहुर्त म्हणून सोनं खरेदी करायचं असेल पण दागिने खरेदी करायचं नसतील. तर सोन्यीची नाणी हा एक उत्तम पर्याय असू शकतो. साधारणपणे दागिन्यांपेक्षा नाण्यांवर कमी प्रीमियम आकारला जातो. पण ती खरेदी करताना तुम्ही शुद्धता, प्रमाणीकरण आणि व्यापाऱ्यांचे बायबॅक धोरण तपासणं आवश्यक आहे. ती विकताना काही कपात होऊ शकते याकडे पण लक्ष देणं आवश्यक आहे.

गुंतवणूक म्हणून दागिने खरेदी करणे किती चांगले?

बहुतेक लोक धनतेरसच्या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करणे पसंत करतात. पण जर तुमचा एकमेव उद्देश गुंतवणूक करणे असेल, तर दागिने खरेदी करणे हा एक फायदेशीर पर्याय मानला जात नाही. याचे कारण घडणावळ शुल्क आणि जीएसटी आहे. दागिने बनवताना हे अतिरिक्त खर्च भरावे लागतात.
जेव्हा तुम्ही ते नंतर विकता, तेव्हा तुम्हाला घडणावळ शुल्क आणि जीएसटी परत मिळत नाही. शिवाय, सोन्याच्या शुद्धतेची चाचणी आणि इतर कपातींमुळे किंमत कमी असू शकते. त्यामुळे, दागिने अशा लोकांसाठी सर्वोत्तम आहेत जे ते घालण्यासाठी किंवा भेट देण्यासाठी खरेदी करत आहेत.

SGB मध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय अजूनही उपलब्ध आहे?

सॉवरेन गोल्ड बॉण्ड्स (SGBs) पूर्वी गुंतवणूकदारांमध्ये एक लोकप्रिय पर्याय होते. ते सोन्याच्या किमतीशी निगडित परताव्यासोबत निश्चित व्याजदर देत असत. पण, सरकारने फेब्रुवारी २०२४ पासून कोणतीही नवीन SGB मालिका जारी केलेली नाही. परिणामी, गुंतवणूकदार नवीन सरकारी योजनेद्वारे ते थेट खरेदी करू शकत नाहीत. सध्या, जुने बॉण्ड्स दुय्यम बाजारात उपलब्ध असू शकतात. ते खरेदी करण्यापूर्वी त्यांची किंमत, तरलता आणि मुदत तपासणे महत्त्वाचे आहे.

सगळा निधी गुंतवणं टाळा

तज्ञांच्या मते, सोन्याच्या किमतीतील अस्थिरता लक्षात घेता, गुंतवणूकदारांनी संपूर्ण रक्कम एकाच वेळी गुंतवणे टाळावे. त्याऐवजी, वेगवेगळ्या वेळी लहान खरेदी करणे हा एक चांगला दृष्टिकोन असू शकतो. एनरिच मनीचे सीईओ, पोनमुडी आर यांच्या मते, गुंतवणुकीचे निर्णय घेताना किंमत, तरलता आणि एकूण पोर्टफोलिओ विचारात घेतला पाहिजे. एकूणच, वैयक्तिक वापरासाठी दागिने, प्रत्यक्ष सोने ठेवण्यासाठी नाणी आणि सोन्याच्या किमतीत गुंतवणूक करण्यासाठी ETFs हे उपयुक्त पर्याय असू शकतात. योग्य निवड तुमच्या गरजा आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवर अवलंबून असते.

गोल्ड ETFमध्ये गुंतवणूक करणे किती सोपे आहे?

ज्यांना प्रत्यक्ष सोने खरेदी न करता किमतीतील चढ-उतारांचा फायदा घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी Gold ETFs हा एक उपयुक्त पर्याय आहे. त्यांची खरेदी-विक्री शेअर बाजारात डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यांमार्फत करता येते.

घरी सोने साठवण्याची किंवा त्याचे संरक्षण करण्याची चिंता करण्याची गरज नाही. कोणतेही घडणावळीचे शुल्क आकारले जात नाही. तथापि, गुंतवणूकदारांनी फंडाचे खर्च गुणोत्तर, दलाली आणि व्यवहार शुल्क यांचा विचार केला पाहिजे. गोल्ड ईटीएफची किंमत आणि प्रत्यक्ष सोन्याची किंमत यामध्ये किंचित फरक असू शकतो.

Todays Gold-Silver Price: धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर काय आहेत सोन्याचे दर? किंमती वाढल्या की घसरल्या? जाणून घ्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: धनत्रयोदशीला Physical Gold म्हणून काय खरेदी करणे चांगले असते?

    Ans: पारंपारिक आणि सांस्कृतिक विश्वासात दागिन्यांची खरेदी शुभ मानली जाते, तर भविष्यात सहज विकता यावे यासाठी २४ कॅरेटचे सोन्याचे सिक्के किंवा बार खरेदी करणे हा एक चांगला भौतिक पर्याय मानला जातो.

  • Que: Gold ETF मध्ये गुंतवणूक करण्याचे काय फायदे आहेत?

    Ans: गोल्ड ईटीएफमध्ये दागिने खरेदी करताना द्यावा लागणारा मेकिंग चार्ज वाचतो, चोरीची भीती नसते आणि सोन्याच्या शुद्धतेची कोणतीही चिंता न करता ऑनलाईन पद्धतीने सोप्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर खरेदी-विक्री करता येते.

  • Que: दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर ठरतो?

    Ans: जर गुंतवणूक हाच मुख्य उद्देश असेल, तर गोल्ड ईटीएफ, सोव्हरिन गोल्ड बॉण्ड्स SGB किंवा डिजिटल सोने अधिक फायदेशीर ठरतात; तर वापर आणि संस्कृतीच्या दृष्टीने दागिने किंवा सिक्के पसंत केले जातात.

Web Title: Dhanteras gold investment guide jewellery coin or etf marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • Dhanteras rituals
  • Digital Gold
  • Diwali 2026

संबंधित बातम्या

Zee Marathi Artists: कुणाला आवडतो घरचा फराळ, तर कुणाला किल्ला बनवण्याची आवड, झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या खास आठवणी
1

Zee Marathi Artists: कुणाला आवडतो घरचा फराळ, तर कुणाला किल्ला बनवण्याची आवड, झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या खास आठवणी

Diwali Sugar Free Sweets Recipes: मधुमेहींसाठी यंदाची दिवाळी गोड! साखरेशिवाय बनवा स्वादिष्ट मिठाई; पाहा सोप्या रेसिपी
2

Diwali Sugar Free Sweets Recipes: मधुमेहींसाठी यंदाची दिवाळी गोड! साखरेशिवाय बनवा स्वादिष्ट मिठाई; पाहा सोप्या रेसिपी

Diwali 2026: दिवाळीत लक्ष्मी-गणेशाची मूर्ती खरेदी करताना करू नका या चुका, जाणून घ्या महत्त्व आणि नियम
3

Diwali 2026: दिवाळीत लक्ष्मी-गणेशाची मूर्ती खरेदी करताना करू नका या चुका, जाणून घ्या महत्त्व आणि नियम

Diwali 2026: फ्लॅट संस्कृतीत रांगोळीचा नवा ट्रेंड; वुडन, वुलन आणि मॅट रांगोळीला वाढती मागणी
4

Diwali 2026: फ्लॅट संस्कृतीत रांगोळीचा नवा ट्रेंड; वुडन, वुलन आणि मॅट रांगोळीला वाढती मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.