Gold Price Prediction 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया) Gold Price Prediction 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया) Gold Price Prediction 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया) Gold Price Prediction 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
गेल्या वर्षी सोन्याने सगळ्यांना चकित केलं होतं. पण 2026 मध्ये सोनं आणि चांदी दोघांनीही खूप वर-खाली होऊन दाखवलं. कधी सोनं 5600 डॉलरवर गेलं, तर कधी 4000 च्या खाली पण आलं. या सगळ्या गोंधळात आता मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने आपला नवीन रिपोर्ट काढला आहे. त्याचं नाव आहे “गोल्ड्स रॅली : डिफर्ड, नॉट डीरेल्ड” म्हणजे सोन्याची तेजी थांबली आहे, संपली नाही.
रिपोर्टचं एकच म्हणणं आहे, जवळच्या काळात थोडा त्रास होईल, पण लांबच्या पल्ल्यात सोनं अजूनही मजबूत आहे. भाव पडला तर घाबरून विकू नका, तर थोडं थोडं करून खरेदी करा. Gold Price Prediction 2026
जानेवारी 2026 मध्ये सोनं 5600 डॉलर प्रति औंसच्या विक्रमी पातळीवर गेलं होतं. सगळ्यांना वाटलं आता सोनं थांबणारच नाही. पण नंतर अचानक भाव पडला आणि 4000 डॉलरच्या खाली गेला. नंतर परत थोडा सुधारला.
चांदीचं तर अजूनच भारी झालं. चांदी 100 डॉलरच्या पुढे गेली होती, पण नंतर सोन्यापेक्षा जास्त वेगाने खाली आली. डॉलरच्या तुलनेत रुपया पण वर-खाली होत होता, त्यामुळे आपल्या इथल्या भावात पण फरक पडला.
2025 मध्ये सोनं फक्त वरच जात होतं, पण 2026 मध्ये मात्र सारखं वर-खाली होतंय. याला कारणं आहेत, अमेरिकेत व्याजदर काय होणार, महागाई अजूनही जास्त आहे, बॉन्डवर मिळणारा परतावा जास्त आहे आणि जगात युद्धाची परिस्थिती आहे.
पुण्याच्या ARAPL ची अमेरिकेत मोठी झेप; जगातील पहिल्या १३ रोबोटिक्स कंपन्यांमध्ये स्थान
आपल्याकडे दिवाळी आणि धनत्रयोदशी म्हणजे सोनं-चांदी खरेदीचा मोठा सण. लग्नसराई पण याच काळात असते. त्यामुळे मागणी वाढते. 2016 च्या दिवाळीला सोनं 30,000 रुपये होतं. आणि 2026 च्या दिवाळीला ते जवळपास 1.50 लाख रुपयांवर गेलं आहे. 10 वर्षात 5 पट वाढ. आकडेवारी सांगते की दिवाळीच्या आधीच्या 30 दिवसात सोन्याने दिवाळीनंतरच्या 30 दिवसांपेक्षा जास्त फायदा दिला आहे. गेल्या वर्षी तर दिवाळीआधी महिनाभरात सोनं 20% आणि चांदी 38% वाढली होती.
भाव जास्त असून पण लोकांचा सोन्यावरचा विश्वास कमी झालेला नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जगभरातल्या गोल्ड ETF मध्ये 187 टन सोनं वाढलं. एकूण सोनं 4,256 टन झालं, जे आतापर्यंतचं सगळ्यात जास्त आहे.
भारतामध्ये पण सप्टेंबरमध्ये गोल्ड ETF मध्ये 44.5 अब्ज रुपये आले, जे आधीच्या महिन्यापेक्षा 71% जास्त आहे. सिल्वर ETF मध्ये पण 19.7 अब्ज रुपये आले. पण दुसरीकडे भारतात सोन्याची आयात कमी झाली. ऑगस्टमध्ये 2.3 अब्ज डॉलर होतं, ते सप्टेंबरमध्ये 1.8 अब्ज डॉलरवर आलं. कारण भाव जास्त आहे आणि सरकारने पण आयातीवर थोडं बंधन आणलं आहे.
India Transport Sector: ट्रक वाहतुकीला अच्छे दिन! दुचाकी, कार अन् बांधकाम उपकरणांच्या विक्रीत वाढ
मोतीलाल ओसवालचे रिसर्च हेड नवनीत दमानी म्हणतात, “जगात एवढी अनिश्चितता असताना सोनं हे सुरक्षित ठिकाण आहे. पण जवळच्या काळात भाव काय राहील हे अमेरिकेचं फेडरल रिझर्व्ह, महागाई, डॉलर आणि बॉन्ड यावर अवलंबून आहे. सप्टेंबरमध्ये अमेरिकेने व्याजदर 25 पॉइंटने वाढवून 3.75 ते 4.00% केला, त्यामुळे थोडं दडपण आलं आहे. तरी पण मध्यवर्ती बँका सोनं खरेदी करतायत, त्यामुळे लांब पल्ल्यात आधार आहे.
“त्यांचे अॅनालिस्ट मानव मोदी म्हणतात, “चांदीत जास्त फायदा मिळू शकतो, पण त्यात धोका पण जास्त आहे. सोन्यातली घसरण ही खरेदीची संधी आहे.
रिपोर्टनुसार, सोन्यात घसरण आली तर घाबरू नका, हळूहळू खरेदी करा. आंतरराष्ट्रीय बाजारात 3,800 ते 3,900 डॉलर ही पातळी खरेदीसाठी चांगली आहे. जवळच्या काळात 4,200 डॉलर आणि मध्यम काळात 4,500 ते 4,700 डॉलरपर्यंत सोनं जाऊ शकतं.
आपल्या इथल्या भावाचं बोलायचं तर, जर डॉलर 96 रुपये मानला, तर 1,35,000 रुपये ही पातळी खरेदीसाठी चांगली आहे. जवळच्या काळात 1,48,000 रुपये आणि मध्यम काळात 1,60,000 ते 1,68,000 रुपयेपर्यंत सोनं जाऊ शकतं. तेजीच्या मागे धावू नका. भाव पडला की शांतपणे थोडं थोडं सोनं घ्या. सोनं हे तुमच्या पैशांचं रक्षण करण्यासाठी आहे, श्रीमंत होण्यासाठी नाही. त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये थोडं सोनं नेहमी ठेवा.
Ans: अहवालानुसार मध्यम कालावधीत सोन्याचा भाव 1.60 ते 1.68 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
Ans: भारतीय बाजारात 1,35,000 रुपये ही खरेदीसाठी महत्त्वाची पातळी मानली आहे.
Ans: अमेरिकेतील व्याजदर, महागाई, डॉलर आणि जागतिक अनिश्चितता यामुळे चढ-उतार होत आहेत.






