Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रीन होम्स भारतासाठी अर्थपूर्ण आहेत का? काय सांगतात तज्ज्ञ

ग्रीन होम्स ही संकल्पना लोकप्रिय ठरत आहेत. पर्यावरणपूरक असलेली ही घरे परवडणाऱ्या श्रेणीतील आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात तज्ज्ञांकडून. ग्रीन होम्स भारतासाठी कशा पद्धतीने योग्य ठरू शकतात याबाबतदेखील आपण या लेखातून जाणून घेऊया.

  • By नारायण परब
Updated On: Jun 27, 2024 | 04:58 PM
सौजन्य - Wikipedia

सौजन्य - Wikipedia

Follow Us
Follow Us:

स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाला वाटते  ते घर परवडणारे असले पाहिजेच तसेच ते दीर्घकालीन टिकणे गरजे आहे. भारतामध्ये सध्या परवडणाऱ्या घरांची निर्मिती वाढत असून लोक परवडणाऱ्या घरांच्याबाबतीत शाश्वत भविष्याचाही विचार करत आहेत. यामुळेच शाश्वत बांधकाम आणि राहण्याच्या पद्धतीवर आधारित एक नवा कल उदयास आला आहे आणि तो म्हणजे ग्रीन होम्स अर्थात हरित घर हा होय. या ग्रीन होम्स संकल्पनेबद्दल  गौरव मोहता, सीएमओ – होमफर्स्ट फायनान्स यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे ती जाणून घेऊयात.

ग्रीन होम्स पर्यावरण संरक्षणाचा मार्ग 

ग्रीन होम्समुळे बांधकाम पद्धतींमध्ये आलेला हा शाश्वत बदल किफायतशीरतेसह टिकाऊपणाशी कायमचे बंध जोडत चालला आहे. स्वयं-निर्मित घरांसाठी ग्रीन होम्स हा एक अग्रगण्य प्रयत्न ठरताना दिसतोय. परवडणाऱ्या गृहनिर्माण उद्योगाची वाढ कायम ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नात ग्रीन होम्स एक हरित मार्ग प्रदान करत आहेत.

बांधकाम खर्च कमी, उर्जा आणि पाणी यांची बचत तसेच जागतिक संस्थांची मान्यता.

ग्रीन होम्स ही परवडणारी आणि उपलब्ध स्वरुपातील घरे आहेत, मुळात  ही संकल्पना अथवा विचार मान्य करायला लोक अजुनही काहीसा वेळ घेताना दिसतात. आराम किंवा कार्यक्षमतेशी कोणतीही तडजोड न करता टिकाऊ, दीर्घकालीन ऊर्जा आणि वीजबिलाच्या बचतही याद्वारे होते. स्वयं-निर्मित ग्रीन होम्स हे  20 टक्के अधिक कार्यक्षम आहेत. कारण त्यांच्या बांधकाम खर्च कमी असून ऊर्जा, पाणी आणि मूर्त ऊर्जेची ते मोठ्या प्रमाणात बचत करतात.  ग्रीन होम्स संकल्पनेला जागतिक स्तरावरील आघाडीच्या संस्थांद्वारे मान्यता मिळालेली आहे. ही बाब पर्यावरणासाठी अतिशय उत्तम असल्याचे सिद्ध झाले आहे.

कमी कालावधीत गुणवत्तापूर्ण बांधकाम

स्वयं-निर्मित ग्रीन होम्स बांधण्याच्या पद्धतीत फ्लाय ॲश आणि काँक्रीटच्या विटांच्या निर्मितीमध्ये पुनर्नवीनीकरण केलेले घटक वापरलेले असतात. तसेच त्यांच्या उत्पादनासाठी इंधन जाळण्याची आवश्यकता नसते. या विटा केवळ खर्चाच्या दृष्टीनेच नव्हे तर बांधकाम प्रक्रियेला गती देण्याबाबत देखील किफायतशीर आहे. त्यामुळे मजुरांवरील खर्च कमी होतो आणि प्रकल्पाचा एकूण कालावधीही कमी होतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास, घराची गुणवत्ता आणि त्याच्या आयुष्यमानाबाबत कोणतीही तडजोड न करता हरित बांधकाम पध्दत तुमच्या बांधकामाचा एकूण खर्च कमी करते.

पाणी बचतीच्या पद्धतीमुळे टळतो पाण्याचा अपव्यय

ग्रीन होम्समधील प्लंबिंगमध्ये झालेल्या छोट्या प्रगतीमुळे पाण्याच्या बचतीत मोठी झेप घेतली गेली आहे. या नवकल्पना सध्याच्या वापराच्या पद्धतींमध्ये कोणताही व्यत्यय न आणता पाण्याच्या वापराचे नियमन करण्यास संधी देतात. पाण्याच्या प्रवाहाला प्रतिबंध करताना धुकेयुक्त पाण्याचा (मिस्ट) प्रवाह तयार होतो आणि  आणि त्यामुळे कमी पाणी वापरले जाऊन पाण्याचा दाबही टिकवला जातो. या छोट्याशा पण अतिशय महत्त्वाच्या पद्धतींमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याच्या अपव्ययास लगाम लागला आहे आणि तुमच्या खिशातील पैसाही वाचला आहे.

वीज खर्चात कपात आणि उष्म्यापासून बचाव

सीलिंग फॅन, टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि एसी यांसारखी मूलभूत उपकरणे पंचतारांकित रेटींगची असल्यास ती वीज खूपच कमी प्रमाणात वापरतात. ही उपकरणे कमी ऊर्जा वापरतात आणि वाढीव कालावधीत वीजेच्या खर्चात बचत घडवून आणतात. ओव्हरहँग्स आणि पांढऱ्या रंगाच्या छतांसारखे बांधकाम उपाय उष्म्यापासून बचाव करत आरामदायीपणा वाढवतात. परिणामी उर्जेचा वापर कमी होतो.

परवडणारी घरे, ग्रीन होम्सद्वारे करु शकतो पर्यावरणीय आव्हानांचा सामना

गृहनिर्माण योजनांसाठी सरकारकडून हिरारीने केला जात असलेला प्रचार आणि पर्यावरणपूरक जीवनासाठीची वाढती जाणीव यामुळे ग्रीन होम्सरुपी जीवनशैली अंगिकारण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. दाखवत आहेत. ग्रीन होम्सची लोकप्रियता भविष्यात आणखी वाढेल कारण ही घरे परवडणारी आहेत.

Web Title: Do green homes make sense for india what do the experts say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2024 | 04:26 PM

Topics:  

  • Affordable
  • india

संबंधित बातम्या

PM Narendra Modi: ‘पेपर लीक करणाऱ्यांना अशी शिक्षा द्या…’ दिल्लीतील आंदोलनानंतर पंतप्रधान मोदींची मोठी भूमिका
1

PM Narendra Modi: ‘पेपर लीक करणाऱ्यांना अशी शिक्षा द्या…’ दिल्लीतील आंदोलनानंतर पंतप्रधान मोदींची मोठी भूमिका

Weather Update : मान्सूनचा रौद्रावतार कायम; 20 ते 26 जुलैदरम्यान अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता
2

Weather Update : मान्सूनचा रौद्रावतार कायम; 20 ते 26 जुलैदरम्यान अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता

Natural Collagen Booster : कोलेजनसाठी हजारो रुपये खर्च कशाला? ‘हे’ 5 पदार्थ करतील नैसर्गिक कमाल
3

Natural Collagen Booster : कोलेजनसाठी हजारो रुपये खर्च कशाला? ‘हे’ 5 पदार्थ करतील नैसर्गिक कमाल

सिया, सोनमनंतर आता समिता! प्रियकरासाठी पतीची धावत्या ट्रेनमध्ये हत्या; ‘या’ तीन चुकांमुळे उघडकीस आला कट
4

सिया, सोनमनंतर आता समिता! प्रियकरासाठी पतीची धावत्या ट्रेनमध्ये हत्या; ‘या’ तीन चुकांमुळे उघडकीस आला कट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.