Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PepsiCo India : चव तीच, पण आता थोडं Healthy ! PepsiCo चा भारतीय ग्राहकांसाठी मास्टरप्लॅन; पाहा काय आहे नवीन?

PepsiCo India : भारतातील ग्राहकांची बदलती जीवनशैली आणि आरोग्याबाबतची जागरूकता लक्षात घेऊन पेप्सिको इंडियाने आपल्या अन्नपदार्थ आणि पेय उत्पादनांच्या पोर्टफोलिओमध्ये मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. पेप्सी ब्लॅक, ७अप झिरो शुगर यांसारख्या झिरो/कमी कॅलरी पेयांचे प्रमाण ७० टक्क्यांवरून १०० टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य समोर आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 15, 2026 | 03:35 PM
PepsiCo चा भारतीय ग्राहकांसाठी मास्टरप्लॅन ( सौजन्य - सोशल मीडिया )

PepsiCo चा भारतीय ग्राहकांसाठी मास्टरप्लॅन ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • PepsiCo चा भारतीय ग्राहकांसाठी मास्टरप्लॅन
  • ७०% पेये झिरो व लो कॅलरी
  • स्नॅक्समध्ये कृत्रिम रंग-स्वाद बंद
PepsiCo India : पेप्सिको इंडिया आपल्या खाद्यपदार्थ आणि पेय व्यवसायाचा विस्तार करत असताना, भारतातील ग्राहकांच्या बदलत्या आणि अधिक जागरूक होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या उत्पादनांमध्येही बदल करत आहे. ग्राहकांना आवडणारी चव कायम ठेवून आरोग्य आणि निरोगी जीवनशैलीबाबत वाढती जागरूकता लक्षात घेऊन कंपनी अधिक आरोग्यदायी पर्यायांचा विस्तार करत आहे. यासाठी उत्पादनांच्या घटकांमध्ये बदल करणे, नवीन उत्पादने आणि प्रकार सादर करणे तसेच विविध घटकांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. ( PepsiCo India ) 

सांगता काय? RBI ची गुंतवणूकदारांसाठी भन्नाट सुविधा! FD, Share अन् Mutual Fund एकाच ठिकाणी Track होणार

उत्पादनांमधील पोषणमूल्ये आणि इतर वैशिष्ट्यांबाबत अधिक पारदर्शकता ठेवली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध होत असून, त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडी आणि सेवनाच्या प्रसंगानुसार योग्य उत्पादन निवडण्यासाठी आवश्यक माहितीही मिळत आहे.

कमी आणि मध्यम कॅलरी

पेप्सिको इंडियाच्या पेय व्यवसायाने कमी आणि मध्यम कॅलरी असलेल्या पेयांच्या पर्यायांचा विस्तार करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. सध्या कंपनीच्या एकूण पेय उत्पादनांपैकी 70 टक्क्यांहून अधिक उत्पादने झिरो शुगर किंवा मध्यम कॅलरी असलेली आहेत. येत्या काळात हे प्रमाण टप्प्याटप्प्याने 90 ते 100 टक्क्यांपर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यासाठी उत्पादनांच्या घटकांमध्ये आवश्यक बदल करण्यासोबतच कमी आणि झिरो शुगर असलेल्या पेयांचे पर्याय वाढविण्यावर भर दिला जात आहे. यामध्ये पेप्सी ब्लॅक, 7अप झिरो शुगर, गेटोरेड झिरो आणि निंबूझ या पेयांचा समावेश आहे.

ग्राहकांसाठी अधिक पर्याय

खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात पेप्सिको इंडिया पोषणमूल्ये, विविध घटक आणि तयारीच्या नवीन पद्धतींच्या माध्यमातून ग्राहकांसाठी अधिक पर्याय उपलब्ध करून देत आहे. 2026 मध्ये क्वेकर ब्रँडमध्ये नव्याने बदल करण्यात आले असून, त्यातील प्रथिने, फायबर आणि संपूर्ण धान्यांचे गुणधर्म अधिक ठळकपणे ग्राहकांसमोर मांडण्यात आले आहेत. आरोग्यदायी पर्यायांच्या श्रेणीत रेड रॉक डेलीच्या बेक्ड प्रकारांचा समावेश आहे. यामध्ये 40 टक्के कमी चरबी आहे.

कुरकुरे ज्वारी पफ्स हा नवीन पर्यायही

भारताच्या कृषी परंपरेचा गौरव करणारा भरडधान्य आधारित कुरकुरे ज्वारी पफ्स हा नवीन पर्यायही सादर करण्यात आला आहे. ग्राहकांच्या विविध चवी, आवडीनिवडी आणि जीवनशैलीशी सुसंगत अधिक पर्याय उपलब्ध करून देण्याच्या पेप्सिकोच्या व्यापक प्रयत्नांचा हे नवनवीन प्रयोग एक भाग आहेत. लेज, कुरकुरे, डोरिटोस, चीटोज, अंकल चिप्स, क्वेकर आणि रेड रॉक डेली यांसह कंपनीच्या सर्व ब्रँडमधील रेडी-टू-ईट खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम स्वाद किंवा रंगांचा वापर केला जात नाही.

उत्पादनांच्या पॅकेटवर पोषणमूल्यांची माहिती

या बदलत्या वाटचालीत पारदर्शकतेलाही महत्त्वाचे स्थान आहे. पेप्सिको इंडिया आपल्या उत्पादनांच्या पॅकेटवर पोषणमूल्यांची माहिती देते. यामध्ये ऊर्जा, एका वेळी सेवन करण्याचे प्रमाण आणि महत्त्वाच्या पोषक घटकांच्या शिफारस केलेल्या दैनंदिन आहारातील गरजेच्या तुलनेत असलेले योगदान यांचा समावेश आहे.

ग्राहकांच्या विविध गरजा ओळखणे महत्त्वाचे

पेप्सिको इंडिया आणि दक्षिण आशियाच्या चीफ कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर आणि सस्टेनेबिलिटी हेड यशिका सिंह म्हणतात, “पेप्सिको इंडियामध्ये आम्हाला विश्वास आहे की, ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी समजून घेणे आणि त्यांच्या विविध गरजा ओळखणे महत्त्वाचे आहे. ग्राहकांना आरोग्यदायी पर्याय निवडणे सोपे करून देणे ही केवळ आमची जबाबदारी नसून, नवकल्पना आणि व्यवसायाच्या वाढीचा अविभाज्य भाग आहे. आमच्या ब्रँडच्या माध्यमातून लोकांना विचारपूर्वक निवडी करण्यासाठी सक्षम करणे आणि त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे”.

“कमी आणि झिरो शुगर असलेल्या पेयांपासून ते संपूर्ण धान्ये आणि भरडधान्यांसारख्या विविध घटकांपासून तयार केलेल्या स्नॅक्सपर्यंत, आम्ही ग्राहकांसाठी अधिक पर्याय उपलब्ध करून देत आहोत. आपल्या निवडींबाबत अधिक जागरूक होत असलेल्या ग्राहकांना हे पर्याय उपयुक्त ठरतील. त्याचवेळी, उत्पादनांची चव आणि त्यातून मिळणारा आनंद यांना आम्ही प्राधान्य देत आहोत. एकूणच, ग्राहकांच्या बदलत्या गरजांना प्रतिसाद देणारे आणि भारतातील विविध खाद्यसंस्कृती व पेयांच्या सवयी प्रतिबिंबित करणारे अधिकाधिक पर्याय उपलब्ध करून देणे, हाच आमचा प्रयत्न आहे.”

या सर्व उपक्रमांतून पेप्सिको इंडियाचा ग्राहकांच्या गरजांना केंद्रस्थानी ठेवून उत्पादनांमध्ये बदल करण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. भारतीय ग्राहकांच्या बदलत्या चवी, जीवनशैली आणि विविध प्रसंगांनुसार कंपनी आपल्या सध्याच्या उत्पादनांमध्ये सुधारणा करत असून, त्यांच्यासाठी नवे पर्यायही उपलब्ध करून देत आहे.

धक्क्यावर धक्के… अनिल अंबानी यांच्या Reliance Power चे 2026 कोटींचे शेअर्स अन् 6 कोटींचा बँक बॅलन्स जप्त; ED ची मोठी कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: पेप्सिको इंडिया पेय व्यवसायात काय बदल करतंय

    Ans: पेप्सिको इंडियाच्या पेय व्यवसायाने कमी आणि मध्यम कॅलरी असलेल्या पेयांच्या पर्यायांचा विस्तार करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे.

  • Que: पौष्टिकतेसाठी काय बदल केलेत?

    Ans: खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात पेप्सिको इंडिया पोषणमूल्ये, विविध घटक आणि तयारीच्या नवीन पद्धतींच्या माध्यमातून ग्राहकांसाठी अधिक पर्याय उपलब्ध करून देत आहे.

  • Que: पोषणमूल्यांची माहिती कुठे मिळेल?

    Ans: पेप्सिको इंडिया आपल्या उत्पादनांच्या पॅकेटवर पोषणमूल्यांची माहिती देते

Web Title: Pepsico india zero sugar drinks and millet snacks details ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • healthy
  • india
  • Pepsi

संबंधित बातम्या

भारतातील 6 मोठ्या कार कंपन्यांमध्ये CNG कारची शर्यत! ग्राहकांना मिळणार जास्त पर्याय?
1

भारतातील 6 मोठ्या कार कंपन्यांमध्ये CNG कारची शर्यत! ग्राहकांना मिळणार जास्त पर्याय?

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला
2

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला

GE Aerospace ची भारतात मोठी गुंतवणूक! देशांतर्गत पुरवठादार खर्चात करणार दुप्पट वाढ; विमान वाहतूक क्षेत्राला बळ
3

GE Aerospace ची भारतात मोठी गुंतवणूक! देशांतर्गत पुरवठादार खर्चात करणार दुप्पट वाढ; विमान वाहतूक क्षेत्राला बळ

Pratap Sarnaik: एलॉन मस्क यांच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईक आक्रमक! टेस्लाला दिलेल्या सवलतींचा फेरआढावा घेण्याचे संकेत
4

Pratap Sarnaik: एलॉन मस्क यांच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईक आक्रमक! टेस्लाला दिलेल्या सवलतींचा फेरआढावा घेण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.