Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rupee Value Against Dollar : रुपयाची घसरण, डॉलरचा दर यावर RBI चं नियंत्रण असतं का? कशी ठरते किंमत? गव्हर्नरनी दिलं स्पष्ट उत्तर

Rupee Value Against Dollar : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची होणारी घसरण किंवा चढ-उतार यावर RBI रुपयाचे मूल्य ठरवते का, हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. यावर आरबीआयच्या गव्हर्नरने स्पष्टीकरण दिलं आहे. नेमकी RBI ची यात काय आहे भूमिका? रुपयाचं मुल्य कसं ठरतं? सविस्तर जाणून घ्या.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 24, 2026 | 04:21 PM
रुपयाची घसरण, डॉलरचा दर यावर RBI चं नियंत्रण असतं? ( सौजन्य - सोशल मीडिया )

रुपयाची घसरण, डॉलरचा दर यावर RBI चं नियंत्रण असतं? ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • रुपयाची घसरण, डॉलरचा दर यावर RBI चं नियंत्रण असतं?
  • कशी ठरते किंमत?
  • गव्हर्नरनी दिलं स्पष्ट उत्तर
Rupee Value Against Dollar : US Dollar च्या तुलनेत भारतीय रुपया बराच खाली घसरला अशा बातम्या आपण ऐकतो. बऱ्याचदा RBI रुपयाचं मुल्य स्थिर ठेवण्यासाठी काही का करत नाही असा प्रश्नही बऱ्याचदा विचारला जातो. पण यात RBI ची काय भूमिका आहे? रुपयाचं मुल्य घसरण्यात आणि डॉलरचा दर ठरवण्यात RBI चा काही रोल आहे का? याबाबत नुकताच भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट मत मांडलं. नेमकी काय आहे भूमिका जाणून घेऊयात. ( Rupee Value Against Dollar ) 

Dhanteras Gold : धनतेरसच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचा विचार करताय? त्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या ‘या’ गोष्टी आणि नियम

भारतीय रिझर्व्ह बँक RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी शुक्रवारी रुपयाच्या बचावासाठी एक निवेदन जारी केले. नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान संजय यांनी सांगितले की, आरबीआय डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य निश्चित करत नाही. गेल्या काही काळापासून रुपयाचे मूल्य घसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले. संजय मल्होत्रा ​​दिल्लीत एनडीटीव्ही वर्ल्ड समिट २०२६ च्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते, तेव्हा त्यांना विचारण्यात आले की रुपयाचे मूल्य डॉलरच्या मूल्यावर आधारित ठरवले जाते का. या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी रुपयाचा बचाव केला.

RBI गव्हर्नर नेमकं काय म्हणाले?

शिखर परिषदेत त्यांनी स्पष्ट केलं की, RBI चे प्रार्थमिक उद्दिष्ट परकीय चलन बाजारात स्थिरता राखणं हे आहे. जर रुपयामध्ये बराच चढ-उतार होत असेल किंवा कोणी रुपयाच्या मुल्यातील बदलांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत सट्टा लावत असेल तर RBI त्याच्यावर कारवाई करु शकतो.

रुपयाला खास किंमतीवर ठेवलं जात नाही

रुपयाच्या मुल्याबाबत सांगताना त्यांनी स्पष्ट केलं की, RBI रुपयाला एका विशिष्ट किमतीवर ठेवण्याचा प्रयत्न करत नाही तर त्यावर बाजारातील अचानक होणारे बदल आणि अस्थिरता टाळण्यासाठी त्यांना ही पावलं उचलावी लागतात.

सध्या रुपयाची किंमत किती?

गेल्या काही आठवड्यांमध्ये भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत प्रति डॉलर सुमारे 97 रुपयांपर्यंत खाली घसरला होता. आतापर्यंत रुपया पहिल्यांदा इतक्या कमजोर पातळीवर पोहोचला होता. त्यानंतर रुपया सावरला आणि सलग 8 दिवस व्यापाराचे तो मजबूतीने राहिला. या काळात रुपयाने गेल्या 4 महिन्यांतील सगळ्यात चांगली सर्वोच्च पातळी गाठली. गुरुवारी रुपयाची घसरण झाली आणि तो एका डॉलरच्या 94.83 रुपयांपर्यंत खाली आला.

Bank Of India च्या भागधारकांची चांदी! दुसऱ्या तिमाहीत बँकेने कमावला तब्बल 3202 कोटींचा निव्वळ नफा; पाहा कशी राहीली कामगिरी

💡

Frequently Asked Questions

  • Que: डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत RBI स्वतः ठरवते का?

    Ans: नाही, आरबीआय रुपयाचे मूल्य स्वतः ठरवत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलरची मागणी आणि पुरवठा यानुसार रुपयाचे मूल्य आपोआप ठरते.

  • Que: रुपयाच्या मूल्यात मोठी घसरण झाल्यावर RBI काय भूमिका बजावते?

    Ans: आरबीआय बाजारात अचानक होणारे मोठे चढ-उतार रोखण्यासाठी आणि रुपयाच्या स्थिरतेसाठी आपल्या परकीय चलन साठ्यातून डॉलरची विक्री करते किंवा खरेदी करते.

  • Que: भारतीय रुपयाची ही व्यवस्था कोणत्या प्रकारची आहे?

    Ans: भारत एका लवचिक 'मॅनेज्ड फ्लोटिंग एक्सचेंज रेट' व्यवस्थेचा अवलंब करतो, जिथे आरबीआय केवळ असामान्य चढ-उतार नियंत्रित करण्याचे काम करते.

Web Title: Does rbi fix rupee value against dollar governor statement ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • bank RBI
  • dollar
  • indian rupee

संबंधित बातम्या

RBI Unchanged Repo Rate : RBI च्या निर्णयामुळे FD गुंतवणूकदार खूश! व्याजदर कमी न झाल्याने बँक FD  वर मिळणार तगडा परतावा
1

RBI Unchanged Repo Rate : RBI च्या निर्णयामुळे FD गुंतवणूकदार खूश! व्याजदर कमी न झाल्याने बँक FD वर मिळणार तगडा परतावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.