
Trump's financial empire shaken! Bitcoin crash hits Rs 9,800 crore
Donald Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनमध्ये घसरण झाल्याने मोठा फटका बसला आहे. यामुळे ट्रम्प यांच्या संपत्तीत तब्बल 9800 कोटींची घसरण झाली आहे. यामुळे त्यांच्या संपत्तीत घट झाली आहे. जवळपास डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेटवर्थमध्ये 1.1 अब्ज डॉलर्सने घसरण झाली असून याचे मुख्य कारण क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये झालेली घसरण आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन क्रॅश झाल्याने मोठे नुकसान झाले. मिळलेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती या घटामुळे 6.2 अब्ज डॉलर्स झाली आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये त्यांची संपत्ती 7.3 अब्ज डॉलर्स होती. जवळपास 1.1 अब्ज डॉलर्स संपत्तीत घसरण झाली आहे. टीएमटीजी या कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने त्यांना आर्थिक फटका बसला आहे.
हेही वाचा : Share Market Today: आज कोणते शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? मार्केट उघडण्यापूर्वी जाणून घ्या लिस्ट
बिटकॉईनसह इतर क्रिप्टोकरन्सीत मोठी घसरण झाल्याचे गेल्या शुक्रवारी पाहण्यात आले. टीएमटीजीच्या स्टॉकमध्ये 10.18 डॉलर्सची घसरण झाल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना झटका बसला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण होत आहे. मीडिया अँड टेक्नोलॉजी ग्रुपचे शेअर गेल्या महिन्यात 35 टक्क्यांनी तर सहमाहीत 55 टक्क्यांनी घसरल्याचे दिसून येत आहे.
सप्टेंबर 2025 पर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत 3 अब्ज डॉलर्सची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेतील 400 श्रीमंत लोकांच्या यादीत डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव समावेश करण्यात आले होते. ट्रम्प या यादीत 201 स्थानावर होते. पण आता त्यांच्या संपत्तीत 1.1 अब्ज डॉलर्सची घसरण झाल्याने त्यांच्या स्थानावर खाली झाले आहे.
ट्रम्प यांच्या संपत्ती वाढीचे कारण म्हणजे त्यांच्या कुटुंबाने क्रिप्टोमध्ये केलेली गुंतवणूक होते. ट्रम्प आणि त्यांची तीन मुलं यांनी सप्टेंबर 2024 मध्ये फायनान्शिअल प्लॅटफॉर्मला लाँच केले. डीटी मार्क्स डीईएफआई एलएलसी या कंपनीत ट्रम्प यांची जवळपास 70 टक्के भागिदारी होती. टीएमटीजी यांचे नुकसान 54.8 मिलियन डॉलर्स इतके होते. कंपनीच्या बिटकॉईन होल्डिंग्जमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली असून ती 48 मिलियन डॉलर्स इतकी आहे. एका बिटकॉईनची किंमत 6 ऑक्टोबरला 125000 अमेरिकन डॉलर होती, त्यानंतर ती 30 टक्क्यांनी घसरून 86174 डॉलरवर स्थिर झाली.