Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारतावर दुप्पट कर लादणार’, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी; वाचा… नेमका काय होणार भारतावर परिणाम?

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण राष्ट्राध्यक्ष झाल्यास भारतीय वस्तूंवरील कर दुप्पट करू, असे म्हटले आहे. त्यांनी पुन्हा एकदा अमेरिकी निवडणूक प्रचारात हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे असे झाल्यास त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होणार? याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 13, 2024 | 06:20 PM
‘भारतावर दुप्पट कर लादणार’, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी; वाचा… नेमका काय होणार भारतावर परिणाम?
Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले असून, या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्या काळात त्यांनी अमेरिकन वस्तूंवर भारताने लावलेल्या करावर अनेकदा टीका केली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या निवडणूक प्रचारात हा मुद्दा उपस्थित केला आहे.

काय होणार भारताच्या जीडीपीवर परिणाम

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण राष्ट्राध्यक्ष झाल्यास भारतीय वस्तूंवरील कर दुप्पट करू, असे म्हटले आहे. तसेच, चिनी वस्तूंवरही अधिक कर लादणार असल्याचे ट्रम्प म्हणाले. असे झाल्यास भारतावर काय परिणाम होतील? याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सच्या मते, ट्रम्प टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही. जर ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाले आणि भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांवर नवीन कर लादले तर भारताचा जीडीपी २०२८ पर्यंत केवळ ०.१ टक्क्यांनी खाली जाईल. असेही ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सने म्हटले आहे.

हे देखील वाचा – महागड्या गाड्या, आलिशान घर; कोट्यधीश बाबा सिद्दिकी यांच्याकडे नेमकी किती होती संपत्ती?

व्यापारात काहीशी घट होणार

तर चीनमध्ये तयार झालेल्या वस्तूंवर ६० टक्के कर आणि इतर देशांवर २० टक्के कर लावणार असल्याचे ट्रम्प म्हणाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना भारत खूप जास्त कर आकारतो असेही ते म्हणाले होते. अहवालानुसार, नवीन कर लागू झाल्यानंतर भारत-अमेरिका व्यापारात काहीशी घट दिसून येईल. असेही ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सने म्हटले आहे.

हार्ले डेव्हिडसनवरील करावरून यापूर्वीच वाद

ट्रम्प यांनी हार्ले डेव्हिडसनचे उदाहरण देत सांगितले आहे की, भारताने लादलेल्या जास्त करामुळे कंपनी जास्त वाहने विकू शकली नाही. भारत हा सर्वाधिक कर घेणारा देश असल्याचेही त्यांनी सांगितले. जे देश अमेरिकन वस्तूंवर जास्त कर आकारतात अशा देशांविरुद्ध आम्ही नवीन करप्रणाली आणू. २०१९ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दक्षिण आशियाई देशांच्या यादीतून वगळले होते. जे अमेरिकेला शुल्कमुक्त वस्तू पाठवू शकतात. यानंतर भारतानेही अनेक उत्पादनांवर कर वाढवला. गेल्या वर्षी अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. दोन्ही देशांमध्ये सुमारे १२७ अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला आहे.

Web Title: Donald trump says he will increase tax on india tariff war is going to effect indian economy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 06:20 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Indian Economy

संबंधित बातम्या

‘अमेरिकेला भारताची गरज’ ; डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफ वादावर निक्की हेलीच्या व्यक्तव्याची जगभरात चर्चा
1

‘अमेरिकेला भारताची गरज’ ; डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफ वादावर निक्की हेलीच्या व्यक्तव्याची जगभरात चर्चा

‘तर खरेदी करु नका…’ ; रशियन तेल खरेदीवरुन भारताचा अमेरिका आणि पाश्चत्य देशांना थेट सल्ला
2

‘तर खरेदी करु नका…’ ; रशियन तेल खरेदीवरुन भारताचा अमेरिका आणि पाश्चत्य देशांना थेट सल्ला

Trump targets Chicago : अमेरिकेतील अंतर्गत गुजगोष्टी!वॉशिंग्टननंतर ट्रम्पची नजर शिकागोवर; गुन्हेगारीविरोधी मोहीमेला राजकीय रंग
3

Trump targets Chicago : अमेरिकेतील अंतर्गत गुजगोष्टी!वॉशिंग्टननंतर ट्रम्पची नजर शिकागोवर; गुन्हेगारीविरोधी मोहीमेला राजकीय रंग

India Forex Reserves : RBI कडून आनंदाची बातमी! भारताकडे 695 अब्ज डॉलर्सचा खजिना, पाकिस्तान मात्र हवालदिल
4

India Forex Reserves : RBI कडून आनंदाची बातमी! भारताकडे 695 अब्ज डॉलर्सचा खजिना, पाकिस्तान मात्र हवालदिल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.