Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन नागरिकांना योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे. ही आर्थिक मदत भारतीय चलनाचा विचार करता 4 लाख 75 हजारांच्या घरात जाते.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 14, 2026 | 06:42 PM
बाबो... आता Donald Trump 'लाडके अमेरिकन' योजना चालवणार? निवडणूका येताच अमेरिकन नागरिकांना दिलं मोठं आश्वासन

बाबो... आता Donald Trump 'लाडके अमेरिकन' योजना चालवणार? निवडणूका येताच अमेरिकन नागरिकांना दिलं मोठं आश्वासन

Follow Us
Follow Us:
  • प्रत्येक प्रौढ अमेरिकनला ५ हजार डॉलरचे आश्वासन
  • टॅरिफ महसुलातून रक्कम देण्याचा दावा
  • इराण, तेल आणि अर्थव्यवस्थेवर भाष्य
 

आपल्याकडे जशी ‘लाडकी बहिण योजना’ नावारुपाला आली व तिचा फायदा महायुतीला झाला, अशाच प्रकारची योजना अमेरिकेत राबवून आपणही येणाऱ्या निवडणूकीत फायदा करून घ्यावा, अशी एखादी संकल्पना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या डोक्यात चाललीय की, काय? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
त्याचं झालं असे की, आगामी मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसच्या प्रतिनिधीगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांवर रिपब्लिकन पक्षाने नियंत्रण कायम ठेवल्यास प्रत्येक प्रौढ अमेरिकन नागरिकाला 5 हजार डॉलर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. भारतीय चलनात मोजायचे झाले, तर ते 4, 75, 000 हजारच्या घरात जातात.

आयात शुल्कातून (टॅरिफ) मिळणाऱ्या महसुलाचा वापर या रकमेसाठी केला जाईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. अलास्कातील वासिला येथे रिपब्लिकन सिनेटर डॅन सुलिव्हन यांच्या प्रचारसभेत ट्रम्प बोलत होते. या वेळी त्यांनी प्रस्तावित आर्थिक मदतीला ‘ट्रम्प डिव्हिडंड’ असे संबोधले.

 

प्रौढ अमेरिकनला 5 हजार डॉलर देणार

ट्रम्प म्हणाले, रिपब्लिकन पक्षाने प्रतिनिधीगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांच्या निवडणुका जिंकल्यास मी अमेरिकेतील सर्व प्रौढ नागरिकांना 5 हजार डॉलर देईन. टॅरिफमधून मोठ्या प्रमाणात पैसा येत आहे आणि त्याचा वापर या योजनेसाठी केला जाईल.

मात्र, ही रक्कम नेमकी कधी आणि कोणत्या पद्धतीने दिली जाणार, याबाबत ट्रम्प यांनी सविस्तर माहिती दिली नाही. तसेच या योजनेसाठी किती खर्च येईल, हेही स्पष्ट केलेले नाही. अशा प्रकारची रक्कम वितरित करण्यासाठी काँग्रेसची मंजुरी आवश्यक असेल.

डेमोक्रॅट जिंकल्यास आर्थिक संकटाचा इशारा

प्रचारसभेत ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षावरही निशाणा साधला. डेमोक्रॅट पक्षाने निवडणूक जिंकल्यास अमेरिकेला 1929 सालासारख्या आर्थिक मंदीचा सामना करावा लागेल, असा दावा त्यांनी केला. मात्र, या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी ठोस पुरावे दिले नाहीत. 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प रिपब्लिकन उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत.

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान

इराण, तेल आणि इंधनाच्या किमतींवर भाष्य

ट्रम्प यांनी इराणविषयी बोलताना तेहरानला अण्वस्त्रे मिळू दिली जाणार नसल्याचे सांगितले. युद्ध लवकरच संपेल आणि त्यानंतर किमती वेगाने कमी होतील, असा दावाही त्यांनी केला.

सामुद्रधुनीवरील नियंत्रण आणि तेल वाहतुकीचा उल्लेख करताना ट्रम्प यांनी युद्ध सुरू होण्यापूर्वीच्या तुलनेत सध्या अधिक तेलाची वाहतूक होत असल्याचे सांगितले. मात्र, या दाव्याबाबत त्यांनी अधिक तपशील दिला नाही.

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!

कॅनडा आणि स्थलांतराच्या मुद्द्यावरून टीका

ट्रम्प यांनी कॅनडावर अमेरिकेचा अनेक वर्षे गैरफायदा घेतल्याचा आरोप केला. तसेच डेमोक्रॅटिक पक्षाने २.५ कोटी लोकांना अमेरिकेच्या सीमेत प्रवेश दिल्याचा दावा केला. या आकड्याच्या समर्थनार्थ त्यांनी पुरावे सादर केले नाहीत.

याशिवाय, वाहनांच्या उत्सर्जन नियंत्रण यंत्रणेत बदल करून ‘क्लीन एअर ॲक्ट’चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या अलास्कातील दोन डिझेल मेकॅनिकसाठी त्यांनी माफीपत्रांवर स्वाक्षरी केली. वाहनांचे इंजिन दुरुस्त केल्याबद्दल संबंधित व्यक्तींना दीर्घ तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, अशी टीकाही त्यांनी केली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांना किती डॉलर देण्याचे आश्वासन दिले?

    Ans: रिपब्लिकन पक्षाने काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांवर नियंत्रण कायम ठेवल्यास प्रत्येक प्रौढ अमेरिकन नागरिकाला ५ हजार डॉलर देण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिले.

  • Que: ट्रम्प डिव्हिडंडसाठी पैसा कुठून आणला जाणार आहे?

    Ans: आयात शुल्कातून म्हणजेच टॅरिफमधून मिळणाऱ्या महसुलाचा वापर केला जाईल, असे ट्रम्प यांनी सांगितले.

  • Que: अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका कधी होणार आहेत?

    Ans: दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका ३ नोव्हेंबर रोजी होणार आहेत.

Web Title: Donald trump 5000 dollar payment promise republicans midterm elections rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Tarrif

संबंधित बातम्या

Marco Rubio India Visit: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव 6 महिन्यांत दुसऱ्यांदा भारतात; मुंबई अन् जामनगर दौऱ्यामागचे मोठे कारण काय?
1

Marco Rubio India Visit: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव 6 महिन्यांत दुसऱ्यांदा भारतात; मुंबई अन् जामनगर दौऱ्यामागचे मोठे कारण काय?

Nobel Prize: नोबेल शांतता पुरस्काराचे सर्वात तरुण मानकरी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर; वाचा त्यांच्या संघर्षाची रंजक गोष्ट
2

Nobel Prize: नोबेल शांतता पुरस्काराचे सर्वात तरुण मानकरी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर; वाचा त्यांच्या संघर्षाची रंजक गोष्ट

Trump Media Ban: ट्रम्प प्रशासनाचा सूडबुद्धीचा निर्णय फेडरल कोर्टाने उधळला; CNN, MSNBCच्या पत्रकारांचा मोठा विजय
3

Trump Media Ban: ट्रम्प प्रशासनाचा सूडबुद्धीचा निर्णय फेडरल कोर्टाने उधळला; CNN, MSNBCच्या पत्रकारांचा मोठा विजय

US Russia Oil Deal वरून वॉशिंग्टनमध्ये राजकीय वादळ; सिनेटर्समध्ये मोठी फूट, 18 ऑक्टोबरच्या निर्णयाकडे भारतासह जगाचे लक्ष
4

US Russia Oil Deal वरून वॉशिंग्टनमध्ये राजकीय वादळ; सिनेटर्समध्ये मोठी फूट, 18 ऑक्टोबरच्या निर्णयाकडे भारतासह जगाचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.