Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?

Russia New Policy : रशियाने इंधन निर्यातीबाबत घेतलेल्या एका मोठ्या आणि महत्त्वाच्या निर्णयामुळे जागतिक खनिज तेल आणि डिझेलच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर डिझेलच्या किमतीत घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 11, 2026 | 07:02 PM
रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ ( सौजन्य - सोशल मीडिया )

रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ
  • भारतावर काय होणार परिणाम?
  • डिझेलचे दर घसरणार?
Russia New Policy : जागतिक स्तरावर सुरु असलेली उलथापालथ आणि त्या घडामोडींचा भारतासह जगाभर होणारा परिणाम यावर सगळेच सध्या बारकाईने लक्ष्य ठेवून आहेत. या सगळ्यात कच्च्या तेलाच्या आणि पेट्रोल- डिझेलच्या किंमतींवरही लक्ष्य ठेवून असल्यास एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रशियाने घेतलेला एक निर्णय फार महत्त्त्वपू्र्ण आहे. रशियाने डिझेल निर्यातीवरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारात डिझेलचा पुरवठा करणं अधिक सोपं होणार आहे. मग आता पेट्रोल – डिझेलचे दर कमी होणार का? ( Russia New Policy ) 

Mutual Fund गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर काय? पैशांवर राहणार कोणाचा हक्क? SEBI चे नियम काय सांगतात?

वृत्तांनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश परदेशी बाजारपेठांमध्ये इंधनाची उपलब्धता वाढवणे आणि त्याचबरोबर रशियामधील देशांतर्गत गरजा पूर्ण करणे हा आहे. पण यामुळे डिझेलच्या किमती कितपत कमी होतील, हे मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असेल.

रशियाने डिझेल निर्यातीवरची पाबंदी का उठवली?

रशियाचे म्हणणे आहे की डिझेल उत्पादनामुळे देशांतर्गत गरजा पूर्ण होण्यास तसेच इतर देशांना पुरवठा करण्यास मदत होईल. रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांच्या मते, डिझेल निर्यात आणि पुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी सरकार तेल कंपन्यांसोबत काम करणार आहे. खरं तर, युक्रेनने रशियन ऊर्जा प्रकल्पांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे काही रशियन तेल शुद्धीकरण प्रकल्पांचे कामकाज विस्कळीत झाले होते. यामुळे देशात डिझेलच्या उपलब्धतेबद्दल चिंता वाढली होती. याच कारणामुळे रशियाने यापूर्वी डिझेल निर्यातीवर निर्बंध लादले होते, जे आता उठवण्यात आले आहेत.

ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील डील काय?

वृत्तानुसार, रशिया आणि अमेरिका डिझेलचा पुरवठा वाढवण्यासाठी एका करारावर पोहोचले आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात डिझेलची अतिरिक्त खेप पाठवण्याच्या योजनांचा समावेश आहे. सुरुवातीच्या टप्प्यात अंदाजे ५,००,००० मेट्रिक टन डिझेलचा पुरवठा होणार आहे. वृत्तांनुसार ऑक्टोबरमध्ये ३,००,००० टन, नोव्हेंबरमध्ये ५,००,००० टन आणि त्यानंतर १,००,००० टन पुरवठा होणार असल्याचेही सूचित होते. तथापि, या आकड्यांची आणि पुरवठ्याच्या तारखांची स्वतंत्र पडताळणी करणे आवश्यक आहे.

डिझेलच्या किमती कमी होतील?

रशिया हा जगातील सर्वात मोठ्या डिझेल निर्यातदारांपैकी एक आहे. त्यामुळे, जर रशियाने इतर देशांना अधिक डिझेल पाठवले, तर आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची उपलब्धता वाढू शकते. डिझेलची गरज असलेल्या देशांना अतिरिक्त पुरवठा मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे किमतींवरील दबाव कमी होऊ शकतो, परंतु याची खात्री नाही.

Money Management Tips : ‘इतका खर्च का करतोस?’ पती-पत्नीमध्ये पैशांवरुन भांडण? हे ४ सोपे नियम वाढवतील बचत

Web Title: Will diesel become cheaper russia new decision impact on fuel prices marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • diesel
  • Donald Trump
  • Russia
  • Russian President Putin

संबंधित बातम्या

US-Iran War : ट्रम्प यांचा मोठा दावा; निवडणुकीपूर्वी इराण करणार हल्ला? होर्मुझचे नाव बदलण्याचेही दिले संकेत
1

US-Iran War : ट्रम्प यांचा मोठा दावा; निवडणुकीपूर्वी इराण करणार हल्ला? होर्मुझचे नाव बदलण्याचेही दिले संकेत

US Politics : केटी झकेरिया व्हाईट हाऊसच्या नव्या प्रेस सेक्रेटरी; घेणार कॅरोलिन लेविट यांची जागा, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
2

US Politics : केटी झकेरिया व्हाईट हाऊसच्या नव्या प्रेस सेक्रेटरी; घेणार कॅरोलिन लेविट यांची जागा, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

World News : नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प संतप्त; नॉर्वेच्या नोबेल समितीवर देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप
3

World News : नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प संतप्त; नॉर्वेच्या नोबेल समितीवर देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप

Russia-Ukraine War : रशियन डिझेलवरील निर्बंध शिथिल; झेलेन्स्कींचा अमेरिकेला संतापजनक सवाल, निर्णयाला ‘पुतिन यांना भेट’ म्हटले
4

Russia-Ukraine War : रशियन डिझेलवरील निर्बंध शिथिल; झेलेन्स्कींचा अमेरिकेला संतापजनक सवाल, निर्णयाला ‘पुतिन यांना भेट’ म्हटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.