
मोदींच्या नेतृत्वात भारताची अर्थव्यवस्था सुसाट; अमित शाह यांनी 'आर्थिक सर्वेक्षणा'चा केला गौरव (Photo Credit- X)
अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, “आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ हे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय अर्थव्यवस्थेच्या ताकदीचे जिवंत प्रमाण आहे. जेव्हा जग महामारीनंतर आर्थिक अस्थिरतेचा सामना करत होते, तेव्हा आपल्या नेतृत्वामुळे भारताने सर्व आव्हाने सहजपणे पार केली. आपण आज सर्व अडथळ्यांना मागे सारून मजबूतीसह प्रगती करत आहोत.”
The Economic Survey 2025-26 attests to the might the Indian economy has acquired under the visionary leadership of PM Shri @narendramodi Ji, forging ahead vigorously, tossing challenges aside. When the world plunged from the pandemic to economic instability, our economy sailed… pic.twitter.com/gcZw4DdIvD — Amit Shah (@AmitShah) January 29, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या सर्वेक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “आज सादर झालेले आर्थिक सर्वेक्षण भारताच्या सुधारणांच्या गतीचे एक सर्वसमावेशक चित्र मांडते. आव्हानात्मक जागतिक वातावरणातही भारताची प्रगती सातत्यपूर्ण आहे. हे सर्वेक्षण मजबूत मॅक्रो-इकॉनॉमिक पाया, निरंतर विकास आणि राष्ट्र उभारणीत नाविन्यपूर्ण संकल्पना व पायाभूत सुविधांची वाढती भूमिका स्पष्ट करते.” पंतप्रधानांनी पुढे नमूद केले की, हे सर्वेक्षण शेतकरी, लघू व मध्यम उद्योग, युवा रोजगार आणि समाजकल्याण यावर विशेष लक्ष केंद्रित करते, जे ‘विकसित भारत’ बनण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा रोडमॅप आहे.
The Economic Survey tabled today presents a comprehensive picture of India’s Reform Express, reflecting steady progress in a challenging global environment. It highlights strong macroeconomic fundamentals, sustained growth momentum and the expanding role of innovation,… https://t.co/ih9ArrtZcU — Narendra Modi (@narendramodi) January 29, 2026
Budget 2026 : अर्थसंकल्पात करदात्यांना मिळू शकते भेट, आर्थिक सर्वेक्षणात काय म्हटलं? जाणून घ्या
१. जीडीपी वाढीचा वेग: चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताचा वास्तविक जीडीपी विकास दर ७.४ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
२. जगात अव्वल स्थान: भारत सलग चौथ्या वर्षी जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान टिकवून आहे.
३. गुंतवणूक आणि सुधारणा: पायाभूत सुविधा (Infrastructure) आणि उत्पादकता वाढवण्यासाठी सरकारने केलेल्या सुधारणांचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
४. सर्वसमावेशक विकास: सर्वेक्षणात शेती, युवा रोजगार आणि उद्योजकता यावर विशेष भर देण्यात आला आहे.
५. जागतिक स्थैर्य: जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारताची अर्थव्यवस्था स्थिर आणि मजबूत असल्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर मंदीची भीती आणि अस्थिरता असताना भारत जगासाठी एक ‘ब्राइट स्पॉट’ ठरला आहे. देशांतर्गत मागणी आणि सरकारी गुंतवणुकीमुळे भारताची अर्थव्यवस्था सुसाट धावत आहे.
Economic Survey 2026: आर्थिक सर्वेक्षण २०२६ झाले जाहीर संसदेत! आर्थिक सर्वेक्षण २०२६ काय सांगते?