Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी Findability Sciencesचे Lacta Insight लाँच; दुधाचे नुकसान टळणार आता बचत वाढणार

Findability Sciences Lacta Insight : अप्लाइड एआय क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या 'फाइंडॅबिलिटी सायन्सेस'ने दुग्ध प्रक्रिया केंद्रांसाठी विशेष डिझाइन केलेले Lacta Insight हे नवीन उत्पादन लाँच केले आहे. कंपनीच्या LactaAI प्लॅटफॉर्मचा भाग असलेले हे तंत्रज्ञान प्रक्रियेदरम्यान होणारे दुधाचे नुकसान रोखण्यासाठी प्रयत्न आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 07, 2026 | 05:36 PM
दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी Findability Sciencesचे Lacta Insight लाँच ( सौजन्य - सोशल मीडिया )

दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी Findability Sciencesचे Lacta Insight लाँच ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • दुग्ध प्रक्रिया केंद्रांचे उत्पन्न वाढणार!
  • फाइंडॅबिलिटी सायन्सेसच्या नव्या AI तंत्रज्ञान
  • दुधाची तूट अन् ऊर्जेचा अपव्यय थांबणार
Findability Sciences Lacta Insight : अप्लाइड एआय आणि डेटा लॉजिस्टिक्स क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी ‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस’ने दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी विशेष डिझाइन केलेल्या ‘लॅक्टा इनसाईट’ या नवीन उत्पादनाच्या लाँचची घोषणा केली. हे उत्पादन फाइंडॅबिलिटी सायन्सेसच्या ‘लॅक्टाआय’ या फ्लॅगशिप प्लॅटफॉर्मचा एक भाग असून भारतात सर्व दुग्ध उत्पादक व प्रक्रिया केंद्रांसाठी उपलब्ध आहे. ( Findability Sciences Lacta Insight )

नुसता क्रेझ… Grey Market मध्ये Jio IPO चा धुमाकूळ! GMP थेट ₹170 वर; जाणून घ्या कधी होणार लाँच?

भारत हा २०२४-२५ मध्ये २४७.८७ दशलक्ष टन दूध उत्पादनासह जगातील अग्रगण्य देश बनून राहिला आहे. या अथांग क्षमतेचा विचार करता, दुधाचे संकलन, प्रक्रियेतील स्थैर्य आणि ऊर्जेचा वापर यांमधील लहान सुधारणा देखील दुग्ध प्रक्रिया केंद्रांसाठी मोठा आर्थिक फायदा निर्माण करू शकतात. प्रक्रियेदरम्यान होणारी दुधातील मौल्यवान घटकांची तूट अनेकदा प्रयोगशाळेचे निष्कर्ष आल्यावरच समजते, ज्यामुळे ही हानी भरून काढणे अशक्य होते.

मोठी आर्थिक बचत साधता येते

‘लॅक्टा इनसाईट’ हे उत्पादन, प्रयोगशाळा, गुणवत्ता, निगा आणि एंटरप्राइज डेटा यांना एकमेकांशी जोडते. यामुळे प्रक्रिया केंद्रांना उत्पादनातील तूट वाढण्यापूर्वीच ओळखणे आणि सर्व संकेतांचे एकत्रित विश्लेषण करून संभाव्य कारणे जलद शोधणे सोपे जाते. तसेच बाष्पीभवन आणि वाळवण्याच्या प्रक्रियेत टाळता येणारा वाफेचा, पाण्याचा व ऊर्जेचा वापर ओळखून मोठी आर्थिक बचत साधता येते. विशेष म्हणजे, ही प्रणाली स्वतंत्रपणे प्लांटच्या सेटिंग्जमध्ये बदल न करता ऑपरेटिंग टीमचे पूर्ण नियंत्रण कायम ठेवते, जिथे ऑपरेटरच्या प्रत्येक निर्णयाची पुढील ऑडिटसाठी नोंद ठेवली जाते.

मोठ्या दुग्ध प्रक्रिया केंद्रात याचे यशस्वी मूल्यमापन

या उपक्रमाविषयी बोलताना फाइंडॅबिलिटी सायन्सेसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माहूरकर म्हणाले, “बहुतेक दुग्ध प्रक्रिया केंद्रांकडे नुकसान ओळखण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध असते, मात्र ती वेगवेगळ्या यंत्रणांमध्ये विखुरलेली असते. ‘लॅक्टा इनसाईट’ उत्पादन अजूनही लाईनवर असताना काय बदलत आहे, ते का महत्त्वाचे आहे आणि कुठे हस्तक्षेप करणे गरजेचे आहे हे पाहण्यास प्लांट टीमला मदत करते. सध्या भारतातील एका मोठ्या दुग्ध प्रक्रिया केंद्रात याचे यशस्वी मूल्यमापन सुरू असून प्रत्यक्ष अडचणींवर मात करून स्पष्ट परिणामांवर आमचा भर आहे.”

पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्याची गरज

‘लॅक्टा इनसाईट’ हे केंद्रातील सध्याच्या पीएलसी, एससीएडीए, डीसीएस, इआरपी, एमईएस आणि एलआयएमएस यंत्रणांशी सहजासहजी जोडले जात असल्याने केंद्रांना सध्याच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्याची गरज नाही. सध्या लोणी, दुधाची पावडर, मिल्क प्रोटीन कन्संट्रेट आणि व्हे लाईन्ससाठी हे उपलब्ध असून, भविष्यात चीज व इतर उत्पादनांसाठीही याचा विस्तार केला जाऊ शकतो.

दुग्ध प्रक्रिया केंद्र ३० मिनिटांच्या मोफत ‘डेअरी एआय रेडीनेस असेसमेंट’ची विनंती करून आपल्या प्लांटमधील डेटा या प्रणालीसाठी किती सुसंगत आहे हे तपासून पाहू शकतात.

Cab Booking केल्यावर बिल कुठच्या कुठे जातं? निष्काळजीपणामुळे लागतात अतिरिक्त पैसे; असं वाचवा बिल

Web Title: Findability sciences launches lacta insight for dairy processing plants marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • ai
  • Business News

संबंधित बातम्या

RBI Repo Rate Hike: कर्जदारांना मोठा झटका! घर-गाडीचं कर्ज महागणार, RBIने रेपो रेट 5.50 टक्क्यांवर नेला; EMIवर किती परिणाम?
1

RBI Repo Rate Hike: कर्जदारांना मोठा झटका! घर-गाडीचं कर्ज महागणार, RBIने रेपो रेट 5.50 टक्क्यांवर नेला; EMIवर किती परिणाम?

Business Success Story : 15 रुपयांच्या चहाने बदललं 3 मित्रांचं नशीब… नोकरीचा नाद सोडून उभी केली 100 कोटींचा बिझनेस
2

Business Success Story : 15 रुपयांच्या चहाने बदललं 3 मित्रांचं नशीब… नोकरीचा नाद सोडून उभी केली 100 कोटींचा बिझनेस

Swiggy Financial Services : अन्न उद्योजकांसाठी सुवर्णसंधी! Swiggy Instamart कडून ₹5 कोटींपर्यंत कर्ज; NOICE ब्रँडचा मेगाप्लॅन
3

Swiggy Financial Services : अन्न उद्योजकांसाठी सुवर्णसंधी! Swiggy Instamart कडून ₹5 कोटींपर्यंत कर्ज; NOICE ब्रँडचा मेगाप्लॅन

Lilavati Hospital चा मोठा उपक्रम! श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी ‘ऑडिटरी व्हर्बल थेरपी’ क्लिनिक सुरू
4

Lilavati Hospital चा मोठा उपक्रम! श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी ‘ऑडिटरी व्हर्बल थेरपी’ क्लिनिक सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.