Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विमानाचा प्रवास आता सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये? कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने तिकीट दरांबाबत सरकारचे मोठे संकेत

विमान प्रवाशांना लवकरच काही दिलासादायक बातमी मिळू शकते. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाल्यानंतर, केंद्र सरकारने संकेत दिले आहेत की जर ही घसरण अशीच कायम राहिली, तर विमान कंपन्यांना विमान तिकिटांवर आकारल्या जाणाऱ्या अधिभाराचा आढावा घेण्यास सांगितले जाऊ शकते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 25, 2026 | 08:51 PM
विमानाचा प्रवास आता सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये? कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने तिकीट दरांबाबत सरकारचे मोठे संकेत (Photo Credit - X)

विमानाचा प्रवास आता सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये? कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने तिकीट दरांबाबत सरकारचे मोठे संकेत (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:
  • विमानाचा प्रवास आता सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये?
  • कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने तिकीट दरांबाबत सरकारचे मोठे संकेत
  • वाचा संपूर्ण बातमी
येत्या काही दिवसांत लाखो विमान प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती काहीशा कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने (Central Goverment) संकेत दिले आहेत की जर हा घसरणीचा कल कायम राहिला, तर विमान कंपन्यांना अधिभार आणि वाढवलेल्या भाड्यांचा आढावा घेण्यास सांगितले जाऊ शकते. यामुळे भविष्यात विमान प्रवासाची तिकिटे स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

किमतींमध्ये स्थिरता दिसून आली, तर…

‘एएनआय’ (ANI) या वृत्तसंस्थेनुसार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांनी गुरुवारी सांगितले की, सरकार ‘एव्हिएशन टर्बाइन फ्युएल’ (ATF) म्हणजेच विमान इंधनाच्या किमतींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. विमान कंपन्यांच्या खर्चातील एक प्रमुख घटक म्हणजे एटीएफ (ATF) आणि त्याच्या किमतींचा थेट परिणाम विमान भाड्यावर होतो. किमतींमधील अलीकडील घसरण तात्पुरती आहे की ती दीर्घकाळ टिकणारी आहे, याचा आढावा सरकार सध्या घेत आहे. मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, जर किमतींमध्ये स्थिरता दिसून आली, तर प्रवाशांवरील अधिभाराचा बोजा कमी करण्यासाठी विमान कंपन्यांशी चर्चा करून योग्य पावले उचलली जातील.

#WATCH | Varanasi, UP | On fuel surge charges, Civil Aviation Minister K Ram Mohan Naidu says, “In the case of ATF, we have also provided a price stabilisation fund of Rs 10,000 crore. So you can see how important the Indian government is considering this issue right now.… pic.twitter.com/FQOFA8rggT — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 25, 2026

भारतीय क्रिप्टो गुंतवणूकदारांचा कल बदलला; दीर्घकालीन गुंतवणूक आणि बिटकॉइनला वाढती पसंती, कॉईनडीसीएक्सचा अहवाल

गेले काही महिने आव्हानात्मक ठरले आहेत

गेल्या चार महिन्यांत विमान वाहतूक क्षेत्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला असल्याचे सरकारने नमूद केले आहे. जागतिक तणाव विशेषतः अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेली परिस्थिती याचा परिणाम इंधनाच्या किमतींवर झाला. यामुळे विमान कंपन्यांवरील खर्चाचा ताण वाढला आणि परिणामी प्रवाशांना अनेकदा अधिक भाडे मोजावे लागले. अलीकडच्या काळात तेलाच्या किमती काहीशा कमी झाल्या असल्या तरी, सरकार घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ इच्छित नाही; किमतींमधील स्थिरता दीर्घकाळासाठी टिकून राहील याची खात्री सरकारला करायची आहे.

विमान कंपन्यांना सरकारचा आधार

सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात विमान कंपन्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी एटीएफच्या (ATF) किमती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. याव्यतिरिक्त, विमानतळ शुल्कात सवलत आणि आपत्कालीन कर्ज-संबंधित योजनांद्वारे मदत पुरवली जात आहे. संकटाच्या काळात विमान कंपन्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने सुमारे १०,००० कोटी रुपयांचा ‘किंमत स्थिरीकरण निधी’ देखील उभारला आहे.

प्रवाशांना दिलासा कधी मिळणार?

सध्या तरी विमान तिकिटांच्या दरात कपात करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, सरकारकडून मिळालेल्या अलीकडील संकेतांवरून हे स्पष्ट होते की, जर कच्च्या तेलाच्या आणि एटीएफच्या (ATF) किमती दीर्घकाळासाठी नियंत्रणात राहिल्या, तर अधिभार कमी करण्यासाठी आणि भाड्यात सवलत देण्यासाठी विमान कंपन्यांवर दबाव वाढू शकतो. परिणामी, येत्या काही महिन्यांत सामान्य जनतेसाठी विमान प्रवास काहीसा अधिक परवडणारा ठरू शकतो.

Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी मोठा दिलासा! आता 35 किलोऐवजी प्रति व्यक्ती 7 किलो मोफत धान्य देण्याचा सरकारचा विचार

Web Title: Flight tickets to get cheaper as crude oil prices drop government hints

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • central goverment
  • crude oil
  • flight ticket

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.