Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Blinkit ला मागे टाकणार Flipkart Minutes? 10 मिनिटांत डिलिव्हरी रेससाठी आता मोठा गेमप्लॅन, काय आहे खास?

Flipkart Minutes Vs Blinkit : भारतातील १० मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या Quick Commerce बाजारात स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. सध्या अग्रस्थानी असलेल्या Blinkit ला मागे टाकण्यासाठी Flipkart Minutes ने कंबर कसली असून, एका नवीन रिपोर्टनुसार फ्लिपकार्ट मिनिट्सचा विस्तार अत्यंत वेगाने होत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 08, 2026 | 01:03 PM
Flipkart Minutes ( सौजन्य - सोशल मीडिया )

Flipkart Minutes ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Blinkit ला मागे टाकणार Flipkart Minutes?
  • 10 मिनिटांत डिलिव्हरी शर्यतीत मोठा गेमप्लॅन
  • ग्राहकांसाठी काय आहे खास?
Flipkart Minutes Vs Blinkit : ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आता वेगाने वाढत आहेत. ते लोकांना घरबसल्या कोणतीही वस्तू सहजपणे ऑर्डर केल्यावर आणून देतात. पण एवढंच नाही तर हे प्लॅटफॉर्म 10 मिनिटांच्या आत वस्तू पोहोचवण्याचा दावा देखील करतात. हा वेळ आता कमी कमी करण्यासाठी या प्लॅटफॉर्ममध्ये स्पर्धा सुरु आहे. ग्राहकांकडून देखील या प्लॅटफॉर्मना मोठा प्रतिसाद मिळतो आहे. ( Flipkart Minutes Vs Blinkit )

बॅगभरुन बाटल्या… Trainमधून Alcohol नेणं पडलं महागात! बिहारच्या तरुणीला अटक; काय सांगतो कायदा?

या फास्ट- कॉमर्समधील स्पर्धेमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे. दरम्यान, स्विस वित्तीय सेवा कंपनी UBS ने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामध्ये, फ्लिपकार्ट मिनिट्स ब्लिंकीटला टक्कर देत असल्याचं समोर येत आहे. वेगाने वाढ दिसून येत असून यात काही बाबतीत ते ब्लिंकइट्च्या जवळपास पोहोचले आहे. चला तर जाणून घेऊयात नेमका प्लॅन काय आहे? आणि मार्केट व्याप्ती असूनही फ्लिपकार्ट मिनिट्सला कसा फायदा होतोय?

अहवालात नेमकं काय?

या दोन्ही फास्ट – कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये स्पर्धा लक्षणीयरित्या वाढत आहे. जर वेगवान व्यापार करत अधिक लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचायचं असेल तर डार्क स्टोअर्सची संख्या वाढवणं गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. फ्लिपकार्ट मिनिट्सने आता सुमारे 130 शहरांमध्ये 1000 हून अधिक डार्क स्टोअर्सचं जाळ पसरलेलं आहे. शक्य तितक्या जास्त ग्राहकांपर्यंत वस्तू अगदी जलद गतीने पोहोचवणं हे ध्येय समोर ठेवून काम केलं जात आहे.

शिवाय, सरासरी ऑर्डरच्या किमतीबाबत मिनिट्स ब्लिंकइटच्या जवळ पोहोचला आहे. स्मार्टफोन खरेदी वगळता, फ्लिपकार्ट मिनिट्सचे सरासरी ऑर्डर मूल्य ₹५०० ते ₹५३० च्या दरम्यान आहे, तर ब्लिंकइटचे सुमारे ₹५१८ आहे. त्यामुळे आता स्पर्धा बरीच वाढली आहे.

मोबाईल फोनमुळे अधिक फायदा

जेव्हा मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या ऑर्डरचा विचार केला तर, याच ऑर्डर एकूण सरासरी ऑर्डर मूल्य आणखी वाढते. फ्लिपकार्टला या विभागात आधीपासूनच मोठा अनुभव आहे. यामुळेच स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या खरेदीतून मिनिट्सला बराच फायदा होत आहे.

जुन्या स्टोअर्समध्ये सुधारणा

प्रत्येक फ्लिपकार्ट मिनिट्स स्टोअरला दररोज अंदाजे ८०० ते १००० ऑर्डर मिळतात. जुन्या आणि अधिक प्रस्थापित स्टोअर्सना दररोज अंदाजे १२०० ते १५०० ऑर्डर मिळत आहेत. यावरून फास्ट कॉमर्स ॲप्सची मागणी किती वेगाने वाढत आहे हे या आकडेवारीतून दिसून येतं. अंदाजे ६०% मागणी महानगरांमधून येते. पण आता लहान शहरांमध्येही फास्ट कॉमर्सची वाढ दिसून येत आहे.

फ्लिपकार्ट मिनिट्सचा पुढचा प्लॅन

फ्लिपकार्ट मिनिट्स भविष्यात आपल्या डार्क स्टोअर्सचा विस्तार आणखी वाढवण्याची शक्यता आहे. कंपनी पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत अंदाजे १,००० अधिक डार्क स्टोअर्स उघडण्याची योजना आखत आहे. यामुळे तिच्या बॅकएंड कॅपिसिटीदेखील आणखी वाढ होऊ शकते. डार्क स्टोअर्सच्या वाढीमुळे कंपनीला भविष्यात अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल आणि अधिक ऑर्डर्स जलदगतीने पोहोचवता येतील. त्यामुळ त्यांची मार्केट वॅल्यू देखील वाढेल.

Food Safety Feature : आता लगेच होणार कारवाई! खराब जेवणाची तक्रार करणं झालं सोपं; Swiggy कडून 24×7 Helpline नंबर लाँच

Web Title: Flipkart minutes to challenge blinkit in quick commerce market report marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • Blinkit
  • e-commerce
  • flipkart
  • Home Delivery

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.