फोटो सौजन्य- सोशल मीडिया
परदेशी इलेक्ट्रॉनिक कंपन्यांच्या तोडीस तोड ब्रँडची उभारणी करणारे बीपीएल समुहाचे संस्थापक टीपी गोपालन नांबियार यांचे काल दि. 31 ऑक्टोबर रोजी निधन झाले. नांबियार यांनी वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बीपीएल समूहाचे संस्थापक नांबियार हे भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचे सासरे होते. नांबियार यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे..नांबियार यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ते 94 वर्षांचे होते आणि काही दिवसांपासून ते आजारी होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिली श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर निधनावर शोक व्यक्त केला त्यांनी लिहिले, श्री टीपीजी नांबियार जी हे एक अग्रगण्य नवकल्पक आणि उद्योगपती होते, जे भारताला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचे प्रबळ समर्थक होते. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना संवेदना.
Shri TPG Nambiar Ji was a pioneering innovator and industrialist, who was a strong votary of making India economically strong. Pained by his passing away. Condolences to his family and admirers.
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2024
पंतप्रधानांसोबतच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा आणि देशातील इतर मान्यवर व्यक्तींनीही उद्योगपती नांबियार यांच्याप्रती श्रद्धांजली व्यक्त केली.
बीपीएल – पॅनल मीटर बनवणारी कंपनी ते इलेक्ट्रॉनिक उपकरण बनणारी अग्रगण्य कंपनी
ब्रिटिश फिजिकल लॅबोरेटरीज अर्थात बीपीएलची (BPL) सुरुवात नांबियार यांनी 1963 मध्ये केरळमधील पलक्कड येथे केली होती. संरक्षण दलांसाठी पॅनेल मीटर तयार करणारी बीपीएल ही पहिली कंपनी होती. त्यानंतर कंपनीने आरोग्य सेवा क्षेत्रासाठी कार्य करत इलेक्ट्रोकार्डियोग्राफ आणि इतर अनेक उपकरणांची निर्मिती केली.1982 साली भारतात झालेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेचे ऑचित्य साधत बीपीएलने रंगीत टेलिव्हिजन बाजारात आणले. या रंगीत टेलिव्हिजनला ऐवढा प्रतिसाद मिळाला की, कंपनीने एका महिन्यात 10 लाखांहून अधिक टीव्ही संचांची विक्री करत अनोखा विक्रम प्रस्थापित केला होता. 1990 पर्यंत ही कंपनी इलेक्ट्रॉनिक्स बाजारात प्रचंड लोकप्रिय होती. यानंतरच्या काळात बीपीएलने रेफ्रिजरेटर, वैद्यकीय उपकरणे, वाद्य, गॅस स्टोव्ह, व्हॅक्यूम क्लीनर यांसारखी उत्पादने बाजारात आणली. सध्या कंपनीचे मुख्यालय हे बंगळुरुमध्ये असून बीपीएलचे व्यवस्थापकीय संचालक अजित नांबियार आहेत .
पॅनल मीटर बनवणारी कंपनी ते टेलिव्हिजनसहित इलेक्ट्रॉनिक उपकरणातील आघाडीची कंपनी नांबियार यांनी तयार करत भारतीय कंपनीला इलेक्ट्रॉनिक उत्पादनामध्ये आघाडीवर नेत एक भारताचा ब्रँड इलेक्ट्रॉनिक विश्वात प्रस्थापित केला.