फोटो सौजन्य- iStock
देशात सर्वत्र दिवाळी जोरदार साजरी केली जात आहे. या दरम्यान ग्राहकांसाठी अनेक सवलतीच्या ऑफर्स कंपन्यांकडून दिली जातात. बॅंकाही आपल्या सेवेकरिता ग्राहकांना काही ऑफर्स देतात. काही नवीन उत्पादने, योजना बाजारात आणतात. एचडीएफसी (HDFC) बँकेने या सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी एक महत्वाची ऑफर आणली आहे. एचडीएफसी बँक आपले काही लोकप्रिय क्रेडिट कार्ड कोणत्याही वार्षिक शुल्काशिवाय किंवा अतिरिक्त शुल्काशिवाय ग्राहकाना ऑफर करत आहे. याचा अर्थ असा की, तुम्हाला क्रेडिट कार्डसाठी लागणारे वार्षिक शुल्क भरावे लागणार नाही. मीडीया रिपोर्टनुसार, ही ऑफर स्विगी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड, टाटा न्यू प्लस एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि टाटा न्यू इन्फिनिटी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डवर या वर्षीच्या 31 डिसेंबरपर्यंत वैध असणार आहे.यापूर्वी, ग्राहकांना 31 ऑक्टोबरपर्यंत वार्षिक शुल्काशिवाय फ्रीडम क्रेडिट कार्ड आणि बिझफर्स्ट क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याची संधी होती.
एचडीएफसी (HDFC) बँकेचे क्रेडिट कार्डवरील असणारे शुल्क
टाटा न्यू प्लस एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डसाठी ग्राहकांना वार्षिक शुल्क 499 रुपये द्यावे लागते. तर टाटा न्यू इन्फिनिटी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डसाठी वार्षिक शुल्क 1,499 रुपये आणि स्विगी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डसाठी वार्षिक शुल्क 500 रुपये भरावे लागतात. या नवीन ऑफरमुळे ग्राहकांना ही रक्कम भरावी लागणार नाही.
क्रेडिट कार्डवरील वार्षिक शुल्क काय आहे?
ज्यावेळी तुम्ही कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड घेतात त्यावेळी तुम्हाला जॉइनिंग फी आणि वार्षिक शुल्क भरावे लागते. तुम्हाला फक्त एकदाच जॉइनिंग फी भरावी लागते. हे वार्षिक शुल्क तुमच्या क्रेडिट कार्डवर दरवर्षी लागू होणारे सर्वात सामान्य कार्ड शुल्क आहेत. वार्षिक शुल्क हे तुम्हाला दरवर्षी भरावे लागते. प्रत्येक बँकांनुसार वार्षिक शुल्क वेगवेगळे असते. मात्र, काही बँका काही कालावधीकरिता हे शुल्क आकारत नाहीत. त्याच वेळी, काही बँकांकडून ग्राहकांनी जर एका ठराविक रकमेच्या जास्त क्रेडिट कार्डवरुन खरेदी केल्यास त्या बँका तुम्हाला वार्षिक शुल्कात सूट दिली जाते. त्यामुळे तुमचा फायदा ही होतो.
आवश्यकतेनुसार घेऊ शकता क्रेडिट कार्ड
जर एचडीएफसी बँकेचे या योजनेचा ग्राहकांना लाभ घ्यायचा असल्यास 31 डिसेंबरपर्यंत ही ऑफर वैध असणार आहे. त्याअगोदर हे कार्ड ग्राहकांनी घ्यायचे आहे. हे क्रेडिट कार्ड घेण्यासाठी जवळजवळ 2 महिन्याचा कालावधी बँकेकडून देण्यात आला आहे. या क्रेडिट कार्डचे लिमिट हे वेगवेगळे आहे. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही यापैकी कोणतेही क्रेडिट कार्ड घेऊ शकतात. ज्यामुळे तुम्हाला खरेदीवर चांगली सवलत ही मिळू शकते.