Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांसाठी आणि त्याची विक्री करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. FSSAI ने अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि आरोग्यास घातक ठरणाऱ्या पान मसाल्यातील विशिष्ट उत्पादनावर कडक बंदी लादली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 11, 2026 | 07:20 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • FSSAI चा मोठा निर्णय!
  • पान मसाल्यातील घातक घटकांवर बंदी
  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई
FSSAI Action On Pan Masala : सध्या धनंजय मुंडे महाराष्ट्रात तर चांगलेच अँक्शन मोडवर आले आहेत. त्यामुळे सगळ्यांचेच लायसन्स धोक्यात येतात का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच रेस्टॉरंटचे लायसन्स रद्द झाले आहेत. त्यामुळे आता कुणाचा नंबर अशी परिस्थिती दिसते आहे. या सगळ्यात आता पान मसाला उत्पादक आणि ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा FSSAI ने ( FSSAI Action On Pan Masala ) अलीकडेच पान मसाला पॅकेजिंगच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. नवीन नियमांनुसार, पान मसाला पॅकेजिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या प्लास्टिक आणि कृत्रिम सामग्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे याचा नेमका काय परिणाम होतोय? नेमके कोणते आदेश आलेत सगळं समजून घेऊयात.

Hybrid Home Loan : होम लोनचा हप्ता वाढण्याची भीती? हायब्रिड होम लोनचा पर्याय ठरेल फायदेशीर; वाचतील लाखो रुपये

कोणत्या पॅकेजिंग साहित्यावर बंदी आहे?

पान मसाल्याच्या पॅकेजिंगमध्ये आता प्लास्टिक-आधारित साहित्याला परवानगी नाही. पॉलीप्रोपिलीन, पॉलिस्टर, पॉलीथिलीन आणि पीव्हीसी यांसारख्या कृत्रिम पॉलिमरवर आधारित पॅकेजिंगवर यापुढे बंदी असणार आहे. कोपॉलिमर आणि लॅमिनेट-आधारित पॅकेजिंगवरही बंदी असणार आहे. पण ॲल्युमिनियम फॉइल आणि मेटॅलाइज्ड थरांच्या पॅकेजिंगवरही बंदी घालण्यात आली आहे. याचा परिणाम बाजारात वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक प्लास्टिक पाऊचवरही होऊ शकतो. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरी वरुन पान खाणं बंद होतंय का असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे.

पॅकेजिंगमध्ये कोणते साहित्य वापरले जाईल?

नवीन नियमांनुसार, पान मसाला आता कागद, पेपरबोर्ड, सेल्युलोज आणि इतर नैसर्गिक स्रोतांपासून बनवलेल्या साहित्यामध्ये पॅक केला जाईल. FSSAI ने म्हटले आहे की या पॅकेजिंग साहित्यामध्ये प्लास्टिक किंवा कृत्रिम पॉलिमरचे कोणतेही थर नसावेत. याव्यतिरिक्त, FSSAI ने टिन आणि काचेच्या कंटेनरलाही मंजुरी दिली आहे, ज्यामुळे कंपन्यांना या कंटेनरमध्ये मसाला पॅक करण्याची परवानगी मिळाली आहे. FSSAI ने म्हटले आहे की पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन नियम केव्हापासून लागू?

FSSAI ने ७ ऑगस्ट, २०२६ रोजी सुधारित नियमांची अधिसूचना जारी केली. यापूर्वी, या बदलांचा मसुदा २८ एप्रिल, २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. पण सूचना आणि आक्षेपांचा विचार केल्यानंतरच अंतिम नियम लागू करण्यात आले. FSSAI च्या मते, अन्नपदार्थांचे पॅकेजिंग पर्यावरणीय नियमांनुसार सुसंगत बनवण्यासाठी आणि प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जाते.

कंपन्यांवर काय परिणाम होईल?

यामुळे पान मसाला कंपन्यांना त्यांच्या सध्याच्या पॅकेजिंग प्रणालीमध्ये बदल करण्याची आवश्यकता भासू शकते. नवीन नियमांनुसार पॅकेजिंग डिझाइन आणि पुरवठा साखळीची व्यवस्था करावी लागू शकते. कागद, टिन किंवा काचेवर आधारित पॅकेजिंगचा अवलंब केल्यास उत्पादन आणि वाहतूक खर्चावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. पण FSSAI च्या मते, कंपन्यांना नवीन पॅकेजिंग प्रकारांची चाचणी करणे आणि नियमांचे पालन करणे आवश्यक असेल.

Sky Gold Q1 Results : स्काय गोल्ड अँड डायमंड्सची दमदार सुरुवात! पहिल्या तिमाहीत नफा 2.4 पटीने वाढला; महसूल 2012.8 कोटींवर

Web Title: Fssai action on pan masala sale and ingredients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Business News
  • dhananjay munde
  • FSSAI
  • Marathi News

संबंधित बातम्या

Breaking News :इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव
1

Breaking News :इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
2

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Shree Chhatrapati Sugar Factory: ‘छत्रपती’ची वार्षिक सभा गाळ्यांच्या भाडेवाढीवरून तापली; पोटभाडेकरूंना काढण्याचा मोठा निर्णय
3

Shree Chhatrapati Sugar Factory: ‘छत्रपती’ची वार्षिक सभा गाळ्यांच्या भाडेवाढीवरून तापली; पोटभाडेकरूंना काढण्याचा मोठा निर्णय

Nagpur News : कापूस उत्पादनात मोठी झेप घेण्याची वेळ! नितीन गडकरींचे आवाहन
4

Nagpur News : कापूस उत्पादनात मोठी झेप घेण्याची वेळ! नितीन गडकरींचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.