Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Murti Price Hike: यंदा ‘गणपती बाप्पा’ महागणार! वाहतूक, रंग आणि मजुरी वाढल्याने मूर्ती महागल्या

Ganesh Murti Price Hike: कोकणातील गणेशमूर्ती व्यवसायावर इंधन दरवाढ, वाहतूक खर्च, शाडू माती, रंग आणि मजुरीच्या वाढत्या खर्चाचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असून गणेशभक्तांना मूर्तीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 06, 2026 | 06:22 PM
यंदा 'गणपती बाप्पा' महागणार! वाहतूक, रंग आणि मजुरी वाढल्याने मूर्ती महागल्या

यंदा 'गणपती बाप्पा' महागणार! वाहतूक, रंग आणि मजुरी वाढल्याने मूर्ती महागल्या

Follow Us
Follow Us:
  • कोकणातील गणेशमूर्ती निर्मिती व्यवसायाला इंधन दरवाढीचा फटका
  • गणेशभक्तांना मूर्तीसाठी मोजावी लागणार अधिक किंमत
  • वाढलेला वाहतूक खर्च, रंग, कामगार मजुरी गणेशमूर्तीकारांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारी
रोहन नाईक, सिंधुदुर्ग: गणेशोत्सवाला अवघा महिना शिल्लक असताना कोकणातील गणेशमूर्ती शाळांमध्ये लगबग वाढली आहे. मात्र, यंदा पेट्रोल-डिझेल दरवाढ, वाहतूक खर्च, शाडू माती, रंग, मजुरी आणि वीज समस्यांमुळे गणेशमूर्ती व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी, यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत मोठी वाढ झाली असून गणेशभक्तांना बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशमूर्ती निर्मिती हा अनेक कुटुंबांचा पिढ्यानपिढ्यांचा व्यवसाय आहे. नवीन पिढीही ही परंपरा जपत असली तरी उत्पादन खर्च सातत्याने वाढत असल्याने मूर्तिकार आर्थिक अडचणीत आले आहेत. पूर्वी स्थानिक मातीचा वापर करून कमी खर्चात मूर्ती तयार होत असत. मात्र, गेल्या काही वर्षांत शाडू माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) यांचा वापर वाढला असून त्यांचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे साचे बाहेरून आणावे लागत असल्याने वाहतूक खर्चातही मोठी वाढ झाली आहे.

कोकणवासियांना मोठा दिलासा! गणेशोत्सवासाठी Railway चा मोठा निर्णय; ‘इतक्या’ विशेष गाड्या सोडणार

मूर्तिकार शंकर पाटकर यांनी सांगितले की, कच्चा माल, वाहतूक आणि रंगकामाचा खर्च इतका वाढला आहे की, मूर्ती तयार करण्याचे आर्थिक गणित जुळवणे कठीण झाले आहे.

दुसरीकडे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूर्तिकारांना महावितरणच्या वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचाही मोठा फटका बसत आहे. मूर्तींचे फिनिशिंग आणि रंगकाम करताना वीज नसल्याने कामात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढत असल्याची तक्रार मूर्तिकार सुशांत सावंत यांनी केली.

मूर्तिकारांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. गोवा राज्यात मूर्तिकारांना प्रति फूट मूर्तीसाठी २०० रुपयांचे अनुदान दिले जाते, मात्र महाराष्ट्रातील, विशेषतः कोकणातील मूर्तिकारांना अशा कोणत्याही आर्थिक योजनेचा लाभ मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे.

मूर्तिकार कृष्णा चव्हाण यांनी सांगितले की, इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यातच रंगकाम, कच्चा माल आणि कारागिरांच्या मजुरीचे दर वाढल्याने लहान आकाराच्या गणेशमूर्तींच्या किमतीही सुमारे २,५०० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत.

एकूणच, महागाईचा सर्वाधिक फटका यंदा कोकणातील गणेशमूर्ती व्यवसायाला बसला असून, त्याचा परिणाम थेट गणेशभक्तांच्या खिशावर होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

‘ज्याचा पास मिळवायला भांडलो, तिथंच…’! कृष्णकुमार गोयल यांचा ‘नवराष्ट्र’शी खास संवाद

Web Title: Fuel price hike hits kokan ganesh idol makers prices rise ahead of ganeshotsav 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganesh Festival
  • Konkan
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

देखणे हे रूप दिसे! ‘श्रीमंतां’च्या दर्शनासाठी गर्दीचा महापूर; पुण्यनगरीत भविकांचा उत्साह
1

देखणे हे रूप दिसे! ‘श्रीमंतां’च्या दर्शनासाठी गर्दीचा महापूर; पुण्यनगरीत भविकांचा उत्साह

पौरणिक देखाव्यांपासून…! पुण्यात गणेशोत्सवाचा अनोखा उत्साह; संध्याकाळी पेठांमध्ये अलोट जनसागर
2

पौरणिक देखाव्यांपासून…! पुण्यात गणेशोत्सवाचा अनोखा उत्साह; संध्याकाळी पेठांमध्ये अलोट जनसागर

Ganeshotsav: ‘व्हायरल सजावट’ ते ‘सोशल मीडिया रील्स’! पुण्यात गौरी आगमनासाठी डिजिटल ट्रेंड्सचा नवा ‘टच’
3

Ganeshotsav: ‘व्हायरल सजावट’ ते ‘सोशल मीडिया रील्स’! पुण्यात गौरी आगमनासाठी डिजिटल ट्रेंड्सचा नवा ‘टच’

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
4

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.