
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
UPI AutoPay : UPI AutoPay मध्ये मोठा बदल! ग्राहकांना मिळणार हा मोठा फायदा? जाणून घ्या सविस्तर
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय म्हणजे MoSPI ने सोमवारी 31 ऑगस्ट 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीची GDP आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार हे स्पष्ट होतं की एप्रिल- जून तिमाहीत नॉर्मल GDP 10.3 टक्क्यांनी वाढली आहे. सरकराच्या मते, जागतिक स्तरावर सुरु असलेल्या दणावानंतर आर्थिक आव्हानांनंतरदेखील भारतीय अर्थव्यवस्था प्रगत होत आहे. आपली विकासाठी गती टिकवून ठेवली आहे.
यावेळी २०२२-२३ आधारभूत वर्ष म्हणजेच base year मानून GDP ची आकडेवारी जाहीर केली आहे. सरकारने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी वार्षिक आणि त्रैमासिक GDP मोजमापासाठी एक नवीन मालिका जाहीर केली होती. त्यानंतर, ५ जून २०२६ रोजी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी जीडीपीची तात्पुरती आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली.
मंत्रालयाने २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षांसाठीची वार्षिक आकडेवारी देखील अपडेच केली आहे. विविध सरकारी स्रोतांकडून मिळालेल्या नवीन माहिती आणि आकडेवारीचा वापर करण्यात आला. याव्यतिरिक्त, २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीपासून ते २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीपर्यंतची जीडीपी आकडेवारी अद्ययावत करण्यात आली आहे. तसेच, २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या जीडीपीच्या तात्पुरत्या आकडेवारीमध्येही नवीन माहितीचा समावेश करण्यात आला आहे.
GDP च्या गणनेमध्ये औद्योगिक उत्पादन, किमती, बँकिंग सेवा आणि विविध सरकारी विभागांकडून मिळवलेली प्रशासकीय आकडेवारी यांचा समावेश केला जातो. जीडीपीसोबतच, मंत्रालयाने अर्थव्यवस्थेतील उपभोग, गुंतवणूक आणि इतर खर्चाशी संबंधित आकडेवारीही जाहीर केली आहे. ही आकडेवारी ‘स्थिर किमती’ २०२२-२३ वर आधारित आणि ‘चालू किमती’ अशा दोन्ही पद्धतींनी सादर केली जाते.