
Godrej Capital चा महाराष्ट्रात मोठा विस्तार! ( सौजन्य - सोशल मीडिया )
सुधारणाऱ्या दळणवळणाच्या सुविधा, तुलनेने परवडणाऱ्या घरांच्या किमती आणि विस्तारणाऱ्या सामाजिक पायाभूत सुविधांमुळे बदलापूरमध्ये निवासी क्षेत्राचा सातत्याने विकास होत आहे. मुंबई आणि ठाणे येथे कामासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी बदलापूर हे घर खरेदीचे एक पसंतीचे ठिकाण बनले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागांच्या तुलनेत येथे अधिक परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध होत असल्याने प्रथमच घर खरेदी करणारे ग्राहक आणि परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार यांच्याकडून सातत्याने मागणी वाढत आहे.
सुरू असलेले निवासी विकास विकास, भाड्याच्या घरांची स्थिर मागणी तसेच रस्ते आणि रेल्वे दळणवळणात नियोजित सुधारणा यांमुळे ठाणे आणि मुंबईशी संपर्क अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. यामुळे बदलापूरमधील गृहबाजारपेठेच्या दीर्घकालीन विकासाच्या शक्यता अधिक बळकट होत आहेत. या सर्व घटकांमुळे महाराष्ट्रातील विस्तारत असलेल्या उपनगरीय गृहविकास क्षेत्रात बदलापूरचे स्थान एक महत्त्वाची विकासक्षम बाजारपेठ म्हणून अधिक मजबूत होत आहे.
या विस्ताराबाबत भाष्य करताना गोदरेज हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मेहेरनोश टाटा म्हणाले, “महाराष्ट्रातील शहरी तसेच उदयोन्मुख केंद्रांमध्ये घरांची असलेली मजबूत मागणी लक्षात घेता हे राज्य आमच्यासाठी प्राधान्याची बाजारपेठ आहे. टियर-2 शहरांमध्ये आणि सूक्ष्म बाजारपेठांमध्ये विस्तार करण्यामागील आमचा उद्देश प्रथमच घर खरेदी करणाऱ्या आणि स्वयंरोजगार असलेल्या ग्राहकांना घर खरेदी अधिक परवडणारी व्हावी आणि गृहवित्त सहज उपलब्ध व्हावे हा आहे. वितरण-केंद्रित दृष्टिकोन, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कर्जजोखीम मूल्यांकन आणि ग्राहककेंद्रित उपाययोजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जबाबदार आणि सर्वसमावेशक गृहवित्त सेवा उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
भारत सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे’ या व्यापक संकल्पनेला पाठबळ देण्यासाठी गोदरेज कॅपिटल पगारदार आणि स्वयंरोजगार करणाऱ्या ग्राहकांसह प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांसाठी लवचिक परतफेड कालावधीचे परवडणारे गृहकर्ज उपलब्ध करून देते. परिसंस्थेवर आधारित धोरणाचा भाग म्हणून, उदयोन्मुख सूक्ष्म बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनी 4,000 हून अधिक स्थानिक संपर्क प्रतिनिधी, विकासक आणि वितरण भागीदारांसोबतचा सहयोग अधिक मजबूत करत आहे. त्याचबरोबर, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता (AUM) 11,800 कोटी रु. पेक्षा अधिक करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
ऑगस्ट 2026 अखेर गोदरेज कॅपिटलची व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (AUM) 30,000 कोटी रु. पेक्षा अधिक होती. यामध्ये गोदरेज हाऊसिंग फायनान्सच्या पोर्टफोलिओमध्ये महाराष्ट्राचा वाटा जवळपास 30% आहे. बदलापूर व्यतिरिक्त, कंपनीने शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, जळगाव, लातूर, पुणे (खराडी), पंढरपूर, अमळनेर आणि चाळीसगाव यांसारख्या प्रमुख केंद्रांमध्येही आपली उपस्थिती वाढवली आहे. यावरून कंपनीच्या दीर्घकालीन विकास आराखड्यात महाराष्ट्राला असलेले धोरणात्मक महत्त्व अधोरेखित होते.
Ans: गोदरेज कॅपिटलने बदलापूरसह छत्रपती संभाजीनगर, अमळनेर, चाळीसगाव, जळगाव, पुणे, पंढरपूर, नागपूर, लातूर आणि शिर्डी यांसारख्या प्रमुख केंद्रांमध्ये आपल्या सेवांचा विस्तार केला आहे.
Ans: ऑगस्ट २०२६ अखेर गोदरेज कॅपिटलची व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता ३०,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक होती, ज्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा जवळपास ३०% आहे.
Ans: पगारदार आणि स्वयंरोजगार करणाऱ्या ग्राहकांसह प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांना लवचिक परतफेड कालावधीचे परवडणारे गृहकर्ज आणि सुलभ गृहवित्त सेवा सहज उपलब्ध होणार आहेत.