Todays Gold-Silver Price: 24 कॅरेट सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीनेही पार केला 1 लाख 16 हजार रुपयांचा टप्पा
22 ऑगस्ट रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,076 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,231 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,553 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,310 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,00,760 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 75,530 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 116.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,16,100 रुपये आहे.
भारतातील अनेक शहरांत आज सोन्याच्या दराने पुन्हा एकदा वाढ नोंदवली आहे. गेल्या काही दिवसांचा विचार केला तर सोन्याच्या किंमतीत सतत घसरण सुरु होती. मात्र आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वााढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर वेगवेगळ्या घटरकांवर अवलंबून असतात. काही डीलर्स एमसीएक्सच्या फ्युचर्स मार्केटमध्ये येणाऱ्या सूत्रानुसार सोन्याच्या किंमती ठरवतात. एमसीएक्स हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी एक्सचेंज आहे आणि या एक्सचेंजवर सोन्याचे फ्युचर्स व्यवहार केले जातात. तुम्ही कधीही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी सोन्याचे दर तपासणं अत्यंत आवश्यक आहे. कारण सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे का, सोनं खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे का, किती टक्के जीएसटी आकरला जात आहे, या सर्व गोष्टी तपासणं अत्यंत आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – istockphoto)
सोने खरेदी करण्यासाठी कोणताही चांगला किंवा वाईट काळ नसतो, फक्त किंमत योग्य असली पाहिजे. पुरवठा साखळीतील व्यत्यय, मागणी, चलनातील चढउतार आणि भू-राजकीय तणाव यासारख्या जागतिक बाजारातील घटकांवर आधारित भारतातील सोन्याच्या दरात दररोज चढ-उतार होत असतात. या घटकांनुसार सोन्याच्या किंमती ठरवल्या जातात. आज 22 ऑगस्ट रोजी भारतातील विविध शहरात सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istockphoto)
शहरं | 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर |
---|---|---|---|
चेन्नई | ₹92,310 | ₹1,00,760 | ₹75,530 |
बंगळुरु | ₹92,310 | ₹1,00,760 | ₹75,530 |
पुणे | ₹92,310 | ₹1,00,760 | ₹75,530 |
केरळ | ₹92,310 | ₹1,00,760 | ₹75,530 |
कोलकाता | ₹92,310 | ₹1,00,760 | ₹75,530 |
मुंबई | ₹92,310 | ₹1,00,760 | ₹75,530 |
नागपूर | ₹92,310 | ₹1,00,760 | ₹75,530 |
हैद्राबाद | ₹92,310 | ₹1,00,760 | ₹75,530 |
दिल्ली | ₹92,460 | ₹1,00,910 | ₹75,660 |
चंदीगड | ₹92,460 | ₹1,00,910 | ₹75,660 |
लखनौ | ₹92,460 | ₹1,00,910 | ₹75,660 |
जयपूर | ₹92,460 | ₹1,00,910 | ₹75,660 |
नाशिक | ₹92,340 | ₹1,00,790 | ₹75,120 |
सुरत | ₹92,360 | ₹1,00,810 | ₹75,570 |