Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
Google 2025: टेक जायंट कंपनी उद्या म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी या वर्षातील सर्वात मोठा ईव्हेंट आयोजित करणार आहे. या ईव्हेंटमध्ये अनेक डिव्हाईस लाँच केले जाणार आहेत. ज्यामध्ये आगामी गुगल पिक्सेल सिरीजचा देखील समावेश असणार आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, वार्षिक हार्डवेयर इवेंट Made By Google 20 ऑगस्ट रोजी आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये केवळ पिक्सेल सिरीजच नाही तर इतरही अनेक डिव्हाईस लाँच केले जाऊ शकतात. या डिव्हाईसबाबत माहिती समोर आली आहे. हा ईव्हेंट यासाठी खास असेल कारण गुगल पहिल्यांदाच चार्जिंग तंत्रज्ञानात मोठा बदल करणार आहे.
गुगलची नवीन Pixel 10 लाइनअप आगामी ईव्हेंटमध्ये लाँच केली जाणार आहे. या सिरीजमध्ये Pixel 10, Pixel 10 Pro, Pixel 10 Pro XL आणि Pixel 10 Pro Fold यांचा समावेश असणार आहे. फोनमध्ये कंपनीचा नवीन Google Tensor G5 प्रोसेसर (3nm प्रोसेस आधारित) दिला जाण्याची शक्यता आहे. हे डिव्हाईस Android 16 OS वर चालणार आहे. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यामध्ये मोठा अपग्रेड केला जाणार आहे. Pixel 10 Pro आणि Pro XL मध्ये 50MP प्रायमरी, 48MP अल्ट्रा-वाइड आणि 12MP अल्ट्रा-वाइड लेंस असणार आहे. Pixel 10 Pro Fold मध्ये 48MP मेन लेंस, 10.8MP टेलीफोटो आणि 10.5MP अल्ट्रा-वाइड असणार आहे. सभी मॉडल्समध्ये FHD+ डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट दिला जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
या ईव्हेंटमधील सर्वात मोठं सरप्राईज म्हणजे Pixelsnap चार्जिंग टेक्नोलॉजी. हे फीचर Apple च्या MagSafe सारखे असणार आहे, ज्यामध्ये चार्जर मॅग्नेटिक पद्धतीने जोडला जाणार आहे. हे अपग्रेड पिक्सेल सीरीजसाठी गेम-चेंजर ठरणार आहे.
नवीन Pixel Watch 4 मध्ये यावेळी काही मोठे बदल केले जाणार आहेत. घड्याळाचा चार्जिंग पॉइंट मागच्या ऐवजी बाजूला हलवता येतो. चार्जिंगचा वेग 25% पर्यंत वाढेल. डिस्प्लेमध्ये 3000 निट्स ब्राइटनेस आणि 3D कर्व्ड डिझाइन असण्याची अपेक्षा आहे. मूनस्टोन हा एक नवीन रंग पर्याय देखील समाविष्ट केला जाऊ शकतो.
Pixel Buds 2a हे कंपनीचे पहिले A-सीरीज TWS असणार आहे, ज्यामध्ये Active Noise Cancellation (ANC) मिळणार आहे. ANC ऑन राहिल्यावर हे ईयरबड्स 20 तासांपर्यंत बॅकअप देणार आहेत. फॉग लाईट, हॅझेल, स्ट्रॉबेरी आणि इरिस या पर्यायांमध्ये हे गॅझेट लाँच केले जाणार आहे.
हा कार्यक्रम 20 ऑगस्ट रोजी न्यू यॉर्कमध्ये दुपारी 1:00 वाजता ET वाजता सुरू होईल. भारतात, हा ईव्हेंट रात्री 10:30 वाजता पाहता येईल. लाइव्हस्ट्रीम गुगलच्या अधिकृत वेबसाइट आणि यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल.