Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

3.3 कोटींची नोकरी सोडून घेतला मोठा निर्णय! Googleचा माजी कर्मचारी आता नेमकं काय करतोय?

Google: गुगलमध्ये सुमारे ३.३ कोटी रुपयांचे पॅकेज मिळत असतानाही माजी सॉफ्टवेअर इंजिनिअर केविन नॉटन ज्युनिअर यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. गुगलमधील कामाचे वातावरण आणि नोकरी आवडत असूनही स्वतःचा व्यवसाय उभारण्याची इच्छा त्यांच्या मनात होती.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 20, 2026 | 01:30 PM
3.3 कोटींची नोकरी सोडून घेतला मोठा निर्णय! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

3.3 कोटींची नोकरी सोडून घेतला मोठा निर्णय! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 3.3 कोटींचे पॅकेज असूनही गुगलची नोकरी सोडली
  • स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी घेतला मोठा निर्णय
  • वडिलांच्या निधनानंतर आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला
 

Kevin Naughton Jr’s Inspiring Career Journey: गुगलमध्ये काम करण्याची प्रत्येक व्यक्तींचे स्वप्न असते. कित्येक जण या कंपनीमध्ये काम करायला मिळावे म्हणून खूप प्रयत्न करतात. चांगली नोकरी, कामांच्या ठिकाणी मनमोकळे वातावरण अशातच कोणी नोकरी सोडण्याचा विचार करु शकेल, असा विचारही मनात येणार नाही. मात्र स्वप्न माणासांला असा विचार करण्यासाठी भाग पाडू शकतात याचे खरे उदाहरण आहेत, गुगलचे माजी सॉफ्टवेअर इंजिनिअर केविन नॉटन ज्युनिअर आहेत.

कोण आहेत केविन नॉटन ज्युनिअर?

केविन हे गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होते.त्यांना जवळपास 3.5 लाख डॉलर पगार होता, भारतीय रुपयांनुसार 3 कोटी 30 लाख रुपयांचे पॅकजे मिळत होते. एवढा चांगला पगार असताना त्यांनी नोकरी सोडली. कारण त्यांना स्वत:चा व्यवसाय करायचा होता. त्यामुळे त्यांनी नोकरीला रामराम केला. त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगाबद्दल त्यांनी सांगितले.

त्यावेळी ते म्हणाले की, गूगलमध्ये काम करण्याचा अनुभव चांगला होता. कंपनीचे वातावरण आणि काम दोन्ही त्यांना आवडत होते. तरीही त्यांच्या मनात स्वतः काहीतरी उभे करण्याची इच्छा कायम होती. दुसऱ्याने तयार केलेल्या प्रोजेक्टवर काम करण्यापेक्षा स्वतःची कल्पना प्रत्यक्षात आणावी, असे त्यांना वाटायचे. मात्र, चांगली नोकरी, मोठा पगार आणि सुरक्षित भविष्य यामुळे हा निर्णय पुढे ढकलला जात होता. 2022 हे वर्ष त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घेऊन आले. त्यांच्या वडिलांचे निधन झाले. जवळच्या व्यक्तीला गमावल्यामुळे आयुष्य किती अनिश्चित आहे, याची त्यांना तीव्र जाणीव झाली. पुढे कधीतरी स्वतःचे काम सुरू करू, असा विचार करत राहण्यापेक्षा आजपासूनच प्रयत्न करायला हवा, असे त्यांना वाटू लागले. पैसा कमावण्याबरोबरच आपल्या कामातून समाधान मिळणेही महत्त्वाचे आहे, हे त्यांना जाणवले.

मित्राच्या एका प्रश्नाने धाडस वाढले

त्यावेळी केविन यांच्या मित्राने त्यांना एक प्रश्न विचारला. नोकरी सोडण्याचा निर्णय घेताना आर्थिक चिंता स्वाभाविक होती. केविन यांनी आधीच काही बचत करून ठेवली होती. त्याच काळात एका मित्राने त्यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. “तुझ्याकडे असलेली बचत जर काही वर्षे आरामात जगण्यासाठी पुरेशी असेल, तर मग स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न का करू नये? या साध्या विचाराने केविन यांना मोठे धैर्य मिळाले. अखेर त्यांनी गूगलमधील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. Google

Gold Silver Price Today: आज चमकलं सोनं-चांदी, 2% चांदीच्या दरात वाढ, एका रात्रीत कसे वाढले दर

नोकरी सोडली आणि नवा प्रवास सुरू झाला

गूगल सोडल्यानंतर केविन यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील आपला अनुभव वापरून The Daily Byte नावाचा शिक्षणविषयक प्लॅटफॉर्म तयार केला. कोडिंग आणि टेक कंपन्यांच्या मुलाखतींची तयारी करणाऱ्या तरुणांना यामधून मदत केली जाते. विशेषतः मोठ्या टेक कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रोग्रामिंग आणि कोडिंग कौशल्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. हळूहळू त्यांचे काम अधिक लोकांपर्यंत पोहोचले. फक्त एका वेबसाइटपुरते ते थांबले नाहीत. YouTube, न्यूजलेटर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी डेव्हलपर्सना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. The Sweekly आणि Devlaunch यांसारखे उपक्रमही त्यांच्या प्रवासाचा भाग बनले.

एक वर्षानंतरही निर्णयावर ठाम

स्वतःचा व्यवसाय सुरू करणे कागदावर जितके सोपे दिसते, तितके प्रत्यक्षात नसते. नोकरीमध्ये ठरलेला पगार असतो, तर व्यवसायात प्रत्येक दिवस नवा असतो. केविन यांनाही या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, नोकरी सोडल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांनी या निर्णयाबद्दल कोणतीही खंत नसल्याचे स्पष्ट केले. प्रयत्न करून अपयश आले तरी ते स्वीकारता येते; पण प्रयत्नच केला नाही, तर नंतरची खंत अधिक मोठी असू शकते, हा त्यांचा विचार होता.

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत आर्थिक विकासाला मिळणार गती, ‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाचा भव्य शुभारंभ

या गोष्टीचा खरा अर्थ काय?

केविन नॉटन यांची गोष्ट म्हणजे प्रत्येकाने नोकरी सोडून व्यवसाय सुरू करावा, असा संदेश नाही. उलट, स्वप्न पाहण्यासोबत त्यासाठी तयारी करणे किती गरजेचे आहे हे यातून दिसते.मोठा पगार मिळत असला तरी मन दुसऱ्या दिशेने धावत असेल, तर त्या इच्छेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येत नाही. मात्र, असा निर्णय घेण्यापूर्वी बचत, आर्थिक जबाबदाऱ्या आणि पुढचा मार्ग यांचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Web Title: Google engineer quit 33 crore job kevin naughton jrs inspiring career journey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Business News
  • Google news
  • inspiration

संबंधित बातम्या

IIT & BITS Pilani Rejected: ज्या संस्थेने प्रवेश नाकारला, त्याच ‘बिट्स पिलानी’ने केला गौरव खेत्रपाल यांचा सन्मान!
1

IIT & BITS Pilani Rejected: ज्या संस्थेने प्रवेश नाकारला, त्याच ‘बिट्स पिलानी’ने केला गौरव खेत्रपाल यांचा सन्मान!

12 लाखांहून अधिक रुग्णांना मिळणार लाभ! भारतातील सर्वात मोठे ‘पेशंट सपोर्ट प्लॅटफॉर्म’!  HCAH अन् QMS चा मोठा निर्णय
2

12 लाखांहून अधिक रुग्णांना मिळणार लाभ! भारतातील सर्वात मोठे ‘पेशंट सपोर्ट प्लॅटफॉर्म’! HCAH अन् QMS चा मोठा निर्णय

Lilavati Hospital Robotic O-Arm: लीलावती हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जरीचा नवा अध्याय! AI-सक्षम रोबोटिक O-Arm तंत्रज्ञानाची एन्ट्री
3

Lilavati Hospital Robotic O-Arm: लीलावती हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जरीचा नवा अध्याय! AI-सक्षम रोबोटिक O-Arm तंत्रज्ञानाची एन्ट्री

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू
4

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.