Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indonesia News : यूट्यूबची १९ हजारांहून अधिक चॅनेल्स हटवली; गुगलला इंडोनेशिया सरकारचा जाब

Indonesia News : इंडोनेशियाशी संबंधित १९ हजार ३७२ यूट्यूब चॅनेल्स गुगलने तीन महिन्यांत बंद केली आहेत. या कारवाईनंतर इंडोनेशिया सरकारने गुगलकडे स्पष्टीकरण मागितले असून, चॅनेल्स बंद करण्याचे निकष, तपासणी प्रक्रिया आणि कारवाईमागील पुरावे सादर करण्याची मागणी केली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 20, 2026 | 07:46 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • तीन महिन्यांत १९ हजारांहून अधिक चॅनेल्सवर कारवाई
  • इंडोनेशिया सरकारने गुगलला मागितले स्पष्टीकरण
  • ऑनलाईन जुगार आणि अश्लील कंटेन्टवरही कारवाईची मागणी
Indonesia News : जगातील लोकप्रिय व्हिडीओ प्लॅटफॉर्म युट्युबवर गुगलने केलेल्या मोठ्या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे . जुलै ते सप्टेंबर २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत गुगलने इंडोनेशियाशी संबंधित तब्बल १९ हजार ३७२ युट्युब चॅनेल्स बंद केली आहेत .

म्हणजे यातील अनेक चॅनेल्स इंडोनेशियातील सरकारच्या समर्थनार्थ व्हिडीओ प्रसारित करत असल्याचे गुगलच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे . या कारवाईनंतर इंडोनेशियातील सरकारने गुगलकडे स्पष्टीकरण मागितले असून , असून चॅनेल्स बंद करण्यामागील नेमके निकष आणि पुरावे सादर करण्याची मागणी केली आहे .

तीन महिन्यांत १९ हजारांहून अधिक चॅनेल्सवर कारवाई

गुगलने आपल्या तिसऱ्या तिमाहीतील सुरक्षा अहवालात युट्युबवरील मोठ्या कारवाईची माहिती दिली आहे . जुलै महिन्यात ६ हजार ८८८, ऑगस्टमध्ये १० हजार १३४ आणि सप्टेंबरमध्ये २ हजार ३५० चॅनेल्स बंद करण्यात आली . या चॅनेल्सचा वापर संघटित पद्धतीने ऑनलाईन जनमतावर प्रभाव टाकण्यासाठी केला जात असल्याचा गुगलचा दावा आहे .

काही चॅनेल्सवर इंडोनेशिया सरकारच्या समर्थनार्थ व्हिडीओ प्रसारित केले जात होते , तर काहींकडून सरकारच्या टीकाकारांना लक्ष करणारा मजकूर प्रसारित केला जात होता . गुगलने या प्रकाराला Co Ordinated Influence Operations असे संबोधले आहे . म्हणजेच अनेक अकाउंटसच्या माध्यमातून एकाच उद्देशाने नियोजनबद्द पद्धतीने ऑनलाइन वातावरणावर प्रभाव टाकण्याचा प्रयतन आहे .

World News : ट्रम्प, जिनपिंग आणि पुतीन एकाच मंचावर; तीन महासत्तांच्या नेत्यांची ऐतिहासिक बैठक

इंडोनेशिया सरकारने गुगलला मागितले स्पष्टीकरण

मोठ्या प्रमाणावर चॅनेल्स बंद करण्याच्या निर्णयावर इंडोनेशियाच्या कम्युनिकेशन आणि डिजिटल मंत्रालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत . सरकारने गुगलकडे कारवाईची पद्धत , चॅनेल्सची तपासणी कशी करण्यात आली , कोणत्या नियमांचे उल्लंघन झाले आणि चॅनेल्सच्या इंडोनेशियाशी संबंध कसा निश्चित करण्यात आला ,याची माहिती मागितली आहे .

खास म्हणजे या प्रक्रियेत स्वयंचलित यंत्रणा आणि मानवी तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भूमिका काय होती , याचेही स्पष्टीकरण मागण्यात आले आहे . चुकीच्या निष्कर्षामुळे कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येऊ नये . अशी सरकारची भूमिका आहे . मोठ्या प्रमाणावरील डिजिटल कारवाई पारदर्शक आणि निष्पक्ष असणे आवश्यक असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे .

Myanmar News : म्यानमारला मोठा दणका; रोहिंग्या मुस्लिमांच्या नरसंहारासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ठरवले जबाबदार

ऑनलाईन जुगार आणि अश्लील कंटेन्टवरही कारवाईची मागणी

या प्रकरणात इंडोनेशिया सरकारने केवळ बंद करण्यात आलेल्या चॅनेल्सपुरते स्पष्टीकरण मागितले नाही . तर युट्युबच्या कारवाईच्या क्षमतेवर वापर इतर गैरप्रकार रोखण्यासाठीही करण्याची मागणी केली आहे . ऑनलाईन जुगाराचा प्रचार करणारी अकाउंटस आणि अश्लील सामग्री प्रसारित करणाऱ्या संघटित नेटवर्कवरही अशाच पद्धतीने कारवाई करावी , असे मंत्रालयाने म्हंटले आहे .

दरम्यान , गुगलच्या प्रतिनिधींनी या प्रकरणातील सविस्तर माहिती देण्यासाठी जागतिक स्तरावरील आपल्या संबंधित टीमशी चर्चा करावी लागेल , असे स्पष्ट केले आहे . गुगलच्या मते , प्लॅटफॉर्म वरील स्पॅम आणि संघटित प्रभाव मोहिमांविरोधात जगभरात नियमितपणे कारवाई केली जाते . इंडोनेशियातील एवढ्या मोठ्या संख्येने चॅनेल्स बंद करण्यामागील नेमके काय होते , याबाबत आता कंपनीच्या सविस्तर स्पष्टीकरणाकडे लक्ष लागले आहे .

 

Web Title: Indonesia google removes 19000 youtube channels cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 07:46 PM

Topics:  

  • Google news
  • Indonesia
  • Marathi News

संबंधित बातम्या

MakeMyTrip Travel Sale: Year-End Holiday चं प्लॅनिंग स्वस्तात! MakeMyTrip घेऊन आलं खास ऑफर्सचं पॅकेज
1

MakeMyTrip Travel Sale: Year-End Holiday चं प्लॅनिंग स्वस्तात! MakeMyTrip घेऊन आलं खास ऑफर्सचं पॅकेज

World News : ट्रम्प, जिनपिंग आणि पुतीन एकाच मंचावर; तीन महासत्तांच्या नेत्यांची ऐतिहासिक बैठक
2

World News : ट्रम्प, जिनपिंग आणि पुतीन एकाच मंचावर; तीन महासत्तांच्या नेत्यांची ऐतिहासिक बैठक

Jalgaon News: यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट! अवैध सावकारी, दारू, सट्टा अन् वाळू वाहतुकीने नागरिक त्रस्त
3

Jalgaon News: यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट! अवैध सावकारी, दारू, सट्टा अन् वाळू वाहतुकीने नागरिक त्रस्त

Myanmar News : म्यानमारला मोठा दणका; रोहिंग्या मुस्लिमांच्या नरसंहारासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ठरवले जबाबदार
4

Myanmar News : म्यानमारला मोठा दणका; रोहिंग्या मुस्लिमांच्या नरसंहारासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ठरवले जबाबदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.