Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Retail Inflation in October 2025 : जीएसटी कपातीने केली कमाल! भाज्या-फळांचे दर कोसळले, तेल मात्र महागले

2025 मधील ऑक्टोबर महिन्याचा किरकोळ महागाईची माहिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये किरकोळ महागाई अनेक वर्षानंतर सर्वात कमी आहे. यामुळे अन्नधान्याच्या किमती घसरल्या असून तेल महागले आहे. जाणून घेऊया सविस्तर.. 

  • By Priti Hingane
Updated On: Nov 13, 2025 | 10:50 AM
Retail Inflation in October 2025

Retail Inflation in October 2025

Follow Us
Close
Follow Us:
  • जीएसटी कपातीचा जबरदस्त परिणाम
  • ऑक्टोबर 2025 मध्ये महागाई फक्त 0.25%
  • भाज्या, फळे, अंडी स्वस्त; सोनं आणि तेल महाग

Retail Inflation in October 2025 : 2025 मधील ऑक्टोबर महिन्याचा किरकोळ महागाईची माहिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये किरकोळ महागाई अनेक वर्षानंतर सर्वात कमी आहे. यामुळे अन्नधान्याच्या किमती घसरल्या असून तेल महागले आहे. 10 वर्षांत पहिल्यांदाच असे घडले असून यामुळे सोने आणि पर्सनल केअर वस्तु महागल्या आहेत. यामुळे मध्यम वर्गीय लोकांना दिलासा मिळाला असून ‘जीएसटी’ कमी केल्याचा परिणाम सकारात्मक दिसून आला आहे.

वस्तू आणि सेवा कराचा अभ्यास करून किरकोळ वस्तूंवरील जीएसटी कमी केल्याने त्याचा फायदा मध्यम वर्गीय लोकांना अधिक झाल्याचे दिसून येत आहे. किरकोळ चलनवाढ अर्थात रिटेल इन्फ्लेशनने ऑक्टोबर महिन्यात विक्रमी नीचांकी पातळी गाठली असून 0.25 टक्क्यांची नोंद करण्यात आली आहे. तब्बल 380 वस्तूंवरील जीएसटी कमी केल्याने आणि त्याचवेळी भाजीपाल्याचे दर उतरल्याने किरकोळ चलनवाढ खाली आला. बुधवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ही आकडेवारी जाहीर केली.

हेही वाचा : GST रद्द केल्यावरही Health Insurance महाग, ग्राहकांना का मिळत नाही फायदा?

ग्राहक किंमत निर्देशांकावर वर्ष 2012 हे आधारभूत वर्ष धरून ऑक्टोबर महिन्याची किरकोळ चलनवाढ मोजली गेली. यामध्ये सप्टेंबर महिन्याची 1.44 टक्के किरकोळ चलनवाढीची नोंद करण्यात आली होती. तर, ऑक्टोबर 2024  मध्ये किरकोळ चलनवाढ तब्बल 6.21 टक्के नोंदवण्यात आली होती. तेल, भाजीपाला, पादत्राणे, फळे असा अनेक उत्पादनेसह वाहतूक व दूरसंचार सेवांचेही दरात घसरण झाल्याने  ऑक्टोबर महिन्यातील चलनवाढीत घट झाली. तसेच, 22 सप्टेंबरपासून केंद्र सरकारने जीएसटी मध्ये बदल केल्याने त्याचाही फायदा झाला. यासंबधित माहिती काढताना केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने देशातील 1,181 गावांसह 1,114 शहरांचा आढावा घेऊन किरकोळ चलनवाढीची टक्केवारी काढली.

 हेही वाचा : भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या जोरावर; कोणाच्याही दबावाने अडणार नाही मार्गावर

भारत देशातील काही भागात किरकोळ चलनवाढ घसरली असली तरी, काही राज्यात अजूनही परिस्थिती तशीच आहे. देशात केरळमध्ये सर्वाधिक किरकोळ चलनवाढ सुमारे 8.56 टक्के असून त्यालागोलाग किरकोळ चलनवाढ 2.95 टक्के जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे. कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू अनुक्रमे 2.34 टक्के, 1.81 टक्के, 1.29 टक्के इतकी चलनवाढ आहे. तर, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, आसाम, दिल्ली आणि बिहार या राज्यात स्थिर चलनवाढ नोंदवण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँक संपूर्ण चालू आर्थिक वर्षासाठी 2.6 टक्क्यांवरून चलनवाढ कमी करण्याची शक्यता असल्याचे ‘इक्रा’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे, डिसेंबर महिन्यात जाहीर करण्यात येणाऱ्या पतधोरण आढाव्यात चलनवाढीच्या सध्याच्या आकडेवारीमुळे रेपो दरात पाव टक्के कपात होऊ शकते. अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Gst cut made it big vegetable and fruit prices fell but oil became more expensive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • GST
  • maharashtra
  • RBI
  • Reserve Bank Of India
  • Retail Inflation

संबंधित बातम्या

Lawyer Protection Act: वकिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदा येणार, हिवाळी अधिवेशनात चर्चेला येणार विधेयक
1

Lawyer Protection Act: वकिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदा येणार, हिवाळी अधिवेशनात चर्चेला येणार विधेयक

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो सावधान…! दोन दिवस पाणीपुरवठा बंद , जाणून घ्या तुमच्या भागातील परिस्थिती
2

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो सावधान…! दोन दिवस पाणीपुरवठा बंद , जाणून घ्या तुमच्या भागातील परिस्थिती

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना मिळणाऱ्या 1500 रुपयांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ महिलांसाठी बदल…
3

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना मिळणाऱ्या 1500 रुपयांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ महिलांसाठी बदल…

महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने EMBED कार्यक्रमाचे दशकपूर्ती यश; आरोग्यव्यवस्थेत आमूलाग्र बदल!
4

महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने EMBED कार्यक्रमाचे दशकपूर्ती यश; आरोग्यव्यवस्थेत आमूलाग्र बदल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.