
अनिश्चित व्याजदरात निश्चित 6.9% रिटर्न..; GRP का ठरतायत गुंतवणूकदारांची पहिली पसंती?
Guaranteed Return Plans: FD पेक्षा करमुक्त हमी परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांना आता जीआरपीने नवा पर्याय उपलब्ध करून दिला असून यामुळे गुंतवणूकदारांना सुरक्षित आणि विश्वासार्हता गुंतवणूक पर्याय मिळाला आहे. जीआरपीच्या या सुरक्षित पर्यायामुळे गुंतवणूकदारांना ६.९% पर्यंत करमुक्त परतावा मिळेल. याबद्दल सविस्तर जाणूया..
बाजारपेठातील व्याजदरभोवती असलेल्या अनिश्चिततेच्या दरम्यान, गॅरंटीड रिटर्न प्लॅन्स अर्थात जीआरपी गुंतवणूकदारांसाठी एक सुरक्षित पर्याय म्हणून उदयास घेऊन आली आहे.यामुळे जीआरपी ६.९% पर्यंत करमुक्त परतावा देणार असून एफडी व्याजदर कमी होणार आहे. यामध्ये कर बचत, स्थिर परतावा आणि जीवन विमा संरक्षण यांचा समावेश आहे.
आर्थिक वातावरण सतत बदलत असते. व्याजदर कधी वाढतात, कधी अचानक घसरतात. शेअर बाजार देखील अस्थिर आहे आणि या अनिश्चिततेमुळे लोक पूर्वी, जास्त विचार न करता एफडी, आवर्ती ठेवी किंवा बाजाराशी संबंधित योजनांमध्ये गुंतवणूक करायचे, परंतु आता ते स्थिरता देणारे, जोखीम कमी करणारे आणि येणाऱ्या वर्षांसाठी त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करणारे पर्याय शोधत आहेत. अशा काळात, गॅरंटीड रिटर्न प्लॅन्स म्हणजेच GRP अनेक गुंतवणूकदारांसाठी दिलासा आणि आत्मविश्वासाचा एक नवीन स्रोत म्हणून उदयास आले आहेत.
हेही वाचा : India-Canada Uranium Deal: कॅनडा-भारत मेगा युरेनियम डील! तब्बल २.८ अब्ज डॉलरचा करार अंतिम टप्प्यात
सुरुवातीच्या तारखेपासून 6.9% पर्यंत गॅरंटीड कर-मुक्त परतावा देतात हे या गॅरंटीड रिटर्न प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. भविष्यातील व्याजदर किंवा बाजारातील घसरणीचा या योजनांवर परिणाम होत नाही, म्हणून आज बरेच गुंतवणूकदार त्यांना एक सुरक्षित आणि स्थिर पर्याय मानतात. या योजना दररोज बचत करणाऱ्यांपासून ते दीर्घकालीन गुंतवणूक योजना असलेल्यांपर्यंत सर्वांनाच आकर्षित करण्यासाठी यशस्वी ठरल्याचे आपण म्हणू शकतो.
यामध्ये गुंतवणूक हे कितीही वयोमर्यादा असलेल्या व्यक्ती करू शकतात.अगदी 20 किंवा 47 वर्षांचे दीर्घकालीन उद्दिष्टे सहजपणे साध्य करू शकतात. आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे गॅरंटीड रिटर्न प्लॅन त्यांच्या पेमेंट स्ट्रक्चरमध्ये लवचिकता देत असल्याने गुंतवणूकदार याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आहेत. ज्यांना मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम मिळवायची आहे ते असे करू शकतात.