कॅनडा-भारत मेगा युरेनियम डील! तब्बल २.८ अब्ज डॉलरचा करार अंतिम टप्प्यात (फोटो-सोशल मिडिया)
India-Canada Uranium Deal: दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे नुकत्याच पार पडललेल्या जी२० शिखर परिषदेदरम्यान कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. या भेटी दरम्यान दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये व्यापार आणि धोरणात्मक सहकार्यावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान भारताला कॅनडा युरेनियम पुरवणार असल्याची माहिती समोर आली. या करारमध्ये अंदाजे २.८ अब्ज अमेरिकन डॉलर्स गुंतवण्यात येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि कॅनडा हे दोन्ही देश लवकरच एक मोठा आणि महत्त्वाचा युरेनियम करार करू शकतात. हा युरेनियम पुरवठा करार अंदाजे २.८ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा असू शकतो. दोन्ही देश या कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या अगदी जवळ पोहोचले असून जर हा करार झाला तर कॅनेडियन कंपनी कॅमेको पुढील दहा वर्षांसाठी भारताला युरेनियम पुरवेल. तथापि, भारत आणि कॅनडाने या युरेनियम कराराबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितले नाही.
हेही वाचा : DMart Discounts: DMart मध्ये खरेदी करायची आहे? त्यापूर्वी वाचा ‘बिग सेव्हिंग डे’ आणि वाचवा तुमचे हजारो रुपये
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे नुकताच जी२० शिखर परिषद पार पडली. या दरम्यान कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. तेव्हा दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि धोरणात्मक सहकार्यावर चर्चा केल्यानंतर भारत सरकारने रविवारी जाहीर केले, सध्या दोन्ही देश दोन वर्षांपासून रखडलेल्या व्यापार वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवत असून यामुळे दोन्ही देशांना फायदा होईल. दोन्ही देश उच्चस्तरीय व्यापक आर्थिक भागीदारी करार (CEPA) वर वाटाघाटी करतील, ज्याचा उद्देश २०३० पर्यंत दोन्ही देशांमधील व्यापार ५० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवणे असल्याचा मुख्य हेतु आहे.
हेही वाचा : ई-कॉमर्स लॉजिस्टिक्सवर जीएसटीचे संकट; अर्थ मंत्रालयाकडून ‘स्थानिक वितरण’ची व्याख्या मागितली!
ही संभाव्य भागीदारी युरेनियम-आधारित असून दोन्ही देशांमधील व्यापक अणु सहकार्याच्या दिशेने एक नवीन पण महत्वाचे पाऊल मानले जात आहे. यासंबधित भारत सरकार, भारतीय वाणिज्य मंत्रालय, कॅनेडियन सरकार आणि कॅनेडियन व्यापार मंत्रालयाने या अहवालावर अद्याप अधिकृतपणे भाष्य केलेले नसून याबद्दल कोणीही पुष्टी करू शकले नाहीत.
मार्च २०२२ मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार वाटाघाटी सुरू झाल्या होत्या. मात्र, २०२३ मध्ये कॅनडाने भारतावर शीख फुटीरतावादीच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप केला होता तेव्हा दोन्ही देशांतील संबंध पूर्णपणे बिघडले होते, त्यानंतर हा दावा भारताने नाकारला होता. त्यानंतर मात्र संबंध बिघडल्याने व्यापार वाटाघाटी थांबवण्यात आल्या. परंतु, आता कार्नी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून भारत आणि कॅनडामधील संबंध सुधारू लागले आहेत.






