Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! विद्यार्थ्यांना आता अपघात विमा संरक्षण मिळणार; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी लागू असलेल्या स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 25, 2026 | 02:49 PM
मोठी बातमी ! विद्यार्थ्यांना आता अपघात विमा संरक्षण मिळणार; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मोठी बातमी ! विद्यार्थ्यांना आता अपघात विमा संरक्षण मिळणार; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us
Follow Us:

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी लागू असलेल्या स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार विद्यार्थी वैयक्तिक अपघात विमा अनिवार्य करण्यात आला असून, पुढील तीन वर्षांसाठी इन्शुरन्स ब्रोकर्स नोडल एजन्सीची निवड करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. हा निर्णय उप सचिव प्रताप पां. लुबाळ यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार जारी केला आहे.

शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठे आणि त्यांच्या संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक अपघात विमा योजना आता अनिवार्य करण्यात आली आहे. याआधी ही योजना ऐच्छिक स्वरूपाची होती. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने हा महत्त्वाचा बदल केला आहे. तथापि, ज्या विद्यापीठांकडे कमी हप्त्यात अधिक संरक्षण देणारी स्वतंत्र विमा योजना आधीपासून कार्यरत असेल, त्या विद्यापीठांना ती योजना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, यासाठी संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांची पूर्वसंमती आवश्यक राहणार आहे.

हेदेखील वाचा : Nanded News : ‘महाज्योती’चे प्रशिक्षणच झाले ठप्प; इंटरनेटची अस्थिरता, वारंवार खंडित होणारी वीजपुरवठा व्यवस्था

वैद्यकीय विमा पूर्वीप्रमाणे ऐच्छिकच

या योजनेअंतर्गत असलेला विद्यार्थी वैद्यकीय विमा मात्र पूर्वीप्रमाणेच पूर्णपणे ऐच्छिक ठेवण्यात आला आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना तो घ्यायचा की नाही, याचा निर्णय स्वतंत्रपणे घेता येणार आहे.

तीन वर्षांसाठी नोडल एजन्सी निवडणार

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून पुढील तीन वर्षांसाठी इन्शुरन्स ब्रोकर्स नोडल एजन्सीची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या संदर्भातील पुढील कार्यवाही संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडून करण्यात येणार असून, त्यांचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे सादर केला जाणार आहे.

हेदेखील वाचा : महाज्योतीचे कोणतेही प्रशिक्षण बंद नाही! विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ऑनलाईन प्रशिक्षणाचा निर्णय

Web Title: Students will now get accident insurance coverage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Education Department
  • Insurance Claim

संबंधित बातम्या

अकरावी विशेष प्रवेश फेरीसाठी मुदतवाढ; सुधारित वेळापत्रकही जाहीर, आता नवीन तारीख…
1

अकरावी विशेष प्रवेश फेरीसाठी मुदतवाढ; सुधारित वेळापत्रकही जाहीर, आता नवीन तारीख…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.