Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI नंतर आता HDFC Bank? ग्राहकांची चिंता वाढली… डेटा लीकच्या बातम्यांनंतर चौकशीचे आदेश

HDFC Bank Confidential Data Leak : देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेची गोपनीय माहिती लीक झाल्याचा दावा समोर आल्यानंतर बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बँकेने तात्काळ अंतर्गत चौकशी आणि सायबर सुरक्षा ऑडिट सुरू केले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 21, 2026 | 06:24 PM
SBI नंतर आता HDFC Bank? ( सौजन्य - सोशल मीडिया )

SBI नंतर आता HDFC Bank? ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • SBI नंतर आता HDFC Bank?
  • ग्राहकांची चिंता वाढली…
  • Data Leak च्या बातम्यांनंतर चौकशीचे आदेश
HDFC Bank Confidential Data Leak : SBI बँकच्या डेटा लीकचं प्रकरण ताजं असताना आता आणखी एका बँकचा डेटा लीक झाला असल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. एसबीआय बँकेच्या प्रकरणानंतर, आणखी एका बँकेची गोपनीय माहिती लीक झाल्याचे वृत्त समोर येत आहे. वृत्तानुसार, खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसीची काही गोपनीय माहिती लीक झाली आहे. या प्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. बँकेची अंतर्गत पुनरावलोकन समिती या लीकची चौकशी करत असून, कोणती आणि किती माहिती लीक झाली आहे, तसेच हे कोणी केले असावे, हे अजून स्पष्ट झालं नाही. नेमका काय आहे हा प्रकार? ( HDFC Bank Confidential Data Leak ) 

Global Sugar Shortage : जगभरात साखरेचा मोठा दुष्काळ! तब्बल 6.28 दशलक्ष टनांची तूट; आता दर आणखी गगनाला भिडणार?

बँकेच्या प्रवक्त्याने या प्रकरणी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या धोरणांनुसार, सर्व संबंधित तथ्ये गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

संपूर्ण प्रकरण काय?

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, एचडीएफसी बँकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँकेची व्यवसाय धोरणे आणि संवेदनशील माहिती बाहेरील लोकांना दिली आहे. ज्यामुळे शेअर बाजारावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. हे दोन अधिकारी बँकेच्या काही प्रमुख व्यवसाय आणि विभागांसारख्या मोठ्या जबाबदार सांभाळत होते. जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना संशय आला, तेव्हा त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली, ज्यामुळे या दोन अधिकाऱ्यांची ओळख पटली.

बँक या प्रकरणाची चौकशी करतेय

एचडीएफसी बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले की, अंतर्गत चौकशी सुरू आहे. बँक या प्रकरणाशी संबंधित सर्व तथ्ये आणि माहिती गोळा करून तिची तपासणी करत आहे. बँकेने असेही म्हटले आहे की, तपास पूर्ण झाल्यावर निष्कर्षांच्या आधारे योग्य कारवाई केली जाईल. मात्र, बँकेने तपासाच्या निकालांविषयी किंवा त्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांविषयी तपशील देण्यास नकार दिला. शेअर केलेल्या गोपनीय माहितीचा गैरवापर झाला आहे का, याचा तपास बँक सध्या करत आहे.

एसबीआयचा डेटाही लीक झाला

हे ​​लक्षात घ्यावे की, यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया SBI मधून डेटा लीक झाल्याचे वृत्त समोर आले होते. बँकेच्या अंदाजे ३,८९७ ग्राहकांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर आढळली होती. यामध्ये ग्राहकांची नावे, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, ईमेल पत्ते आणि कर्जाशी संबंधित माहितीचा समावेश होता.

SBI Account Safety Tips : SBI मध्ये खाते आहे? तुमची माहिती तर चोरीला गेली नाही ना? बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘ही’ कामे

💡

Frequently Asked Questions

  • Que: HDFC Bank च्या डेटा लीक प्रकरणात काय घडले?

    Ans: बँकेची काही गोपनीय माहिती लीक झाल्याच्या वृत्तांनंतर बँकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने सखोल चौकशी व सायबर सुरक्षा मूल्यांकन सुरू केले.

  • Que: या डेटा लीकमुळे ग्राहकांच्या खात्यांवर किंवा ऑनलाईन बँकिंगवर काही परिणाम झाला आहे का?

    Ans: बँकेकडून तपास सुरू असून सर्व मुख्य सेवा व सिस्टीम्स पूर्णपणे सुरक्षित आणि सुरळीत कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • Que: अशा परिस्थितीत एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

    Ans: ग्राहकांनी आपल्या नेट बँकिंग व मोबाईल ॲपचा पासवर्ड वेळोवेळी बदलावा, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरणे चालू ठेवावे आणि कोणताही OTP किंवा पिन कोणासोबतही शेअर करू नये.

Web Title: Hdfc bank confidential data leak investigation started marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • HDFC Bank
  • safety tips
  • SBI

संबंधित बातम्या

SBI Account Safety Tips : SBI मध्ये खाते आहे? तुमची माहिती तर चोरीला गेली नाही ना? बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘ही’ कामे
1

SBI Account Safety Tips : SBI मध्ये खाते आहे? तुमची माहिती तर चोरीला गेली नाही ना? बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘ही’ कामे

SBI Data Leak Confirmed : SBI ने अखेर डेटा चोरी स्वीकारली! ग्राहकांची माहिती डार्क वेबवर लीक झाल्याची बँकेकडून पुष्टी
2

SBI Data Leak Confirmed : SBI ने अखेर डेटा चोरी स्वीकारली! ग्राहकांची माहिती डार्क वेबवर लीक झाल्याची बँकेकडून पुष्टी

मोठी खळबळ… SBI Bank खातेदारांसाठी धोक्याची घंटा! 3.75 लाख ग्राहकांचा Data Leak; हॅकर्सच्या दाव्याने चिंता वाढली
3

मोठी खळबळ… SBI Bank खातेदारांसाठी धोक्याची घंटा! 3.75 लाख ग्राहकांचा Data Leak; हॅकर्सच्या दाव्याने चिंता वाढली

State Bank Of India Mclr Interest Rate: देशातील सर्वात मोठ्या बँकेचा मोठा निर्णय! कर्ज महागणार, EMI वाढणार की काय?
4

State Bank Of India Mclr Interest Rate: देशातील सर्वात मोठ्या बँकेचा मोठा निर्णय! कर्ज महागणार, EMI वाढणार की काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.