Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HDFC बँकेचा मोठा दणका! 12 बड्या अधिकाऱ्यांचं Increment रोखलं, Employee Stock Option ही रद्द; नेमकं प्रकरण काय?

जागतिक स्तरावर मोठ्या उलाढाली होत असताना बँक क्षेत्रात HDFC बँक पुन्हा एकदा चर्चेत आली. बँकेचे माजी अध्यक्ष अतानू चक्रवर्ती यांनी दिलेला अचानक राजीनामा आणि आता बँकेने आपल्या १२ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 03, 2026 | 03:54 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बँक क्षेत्रात HDFC बँक पुन्हा एकदा चर्चेत
  • बँकेचे माजी अध्यक्ष अतानू चक्रवर्ती यांचा अचानक राजीनामा
  • १२ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली
HDFC Bank: जागतिक स्तरावर मोठ्या उलाढाली होत असताना बँक क्षेत्रात HDFC बँक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बँकेचे माजी अध्यक्ष अतानू चक्रवर्ती यांनी दिलेला अचानक राजीनामा. विशेषतः, बँकेने आपल्या १२ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे. पण ही मोठी कारवाई का करण्यात आली ? काय आहे नेमकं प्रकरण ?

Diesel Price Hike : बाप रे! डिझेल थेट 28 रुपयांनी महागलं; आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार मोठी कात्री

12 बड्या अधिकाऱ्यांचं Increment रोखलं

Credit Suisse च्या ‘अतिरिक्त टियर-१’ (AT1) बाँड्सची चुकीच्या पद्धतीने विक्री केल्याप्रकरणी या अधिकाऱ्यांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. याचाच परिणाम म्हणून, बँकेने किमान १२ वरिष्ठ आणि मध्यम-स्तरीय अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत, त्यांचे वार्षिक increments रोखण्यात आली आहे. त्यांचे ‘कर्मचारी समभाग पर्याय’ म्हणजेच ESOPs रद्द करण्यात आले आहेत. ज्या अधिकाऱ्यांवर ही कारवाई झाली आहे, त्यामध्ये ‘ब्रांच बँकिंग, पेमेंट्स, ट्रेझरी, लायबिलिटी प्रॉडक्ट्स आणि मार्केटिंग’ या विभागांचे Group Head असलेल्या आशिष पार्थसारथी यांचाही समावेश आहे. AT1 बाँड्सशी संबंधित वादामुळे बँकेने हाती घेतलेल्या accountability measures चाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

HDFC बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी मिळून, एका परदेशी बँकेने म्हणजेच ‘क्रेडिट सुईस’ने जारी केलेले AT1 बाँड्स, दुबई आणि बहरीन येथील बँकेच्या शाखांकडून निवासी भारतीयांना (NRIs) विकले होते. ही घटना २०२३ मध्ये घडली होती. या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना अशी खात्री दिली होती की, हे बाँड्स अत्यंत सुरक्षित गुंतवणूक आहेत आणि ‘मुदत ठेवींप्रमाणेच’ म्हणजेच FDs, त्यांची मूळ गुंतवणूक रक्कम एका निश्चित मुदतपूर्ती तारखेला परत केली जाईल. मात्र, वस्तुस्थिती यापेक्षा पूर्णपणे वेगळी होती.

गुंतवणुकीचा धोका खूप जास्त

वास्तविक या बाँड्समध्ये गुंतवणुकीचा धोका खूप जास्त असतो; जर बाँड्स जारी करणारी बँक कोणत्याही कारणास्तव आर्थिक संकटात सापडली तर या बाँड्सचे मूल्य झपाट्याने घसरून शून्यावर येतं आणि परिणामी, गुंतवणूकदारांचे संपूर्ण भांडवल बुडतं. नेमके हेच या प्रकरणात घडलं. मार्च २०२३ मध्ये, ‘UBS’ बँकेकडून ‘क्रेडिट सुईस’चे emergency acquisition करण्यात आलं. या प्रक्रियेचाच एक भाग म्हणून, स्विस प्रशासनाने ‘क्रेडिट सुईस’च्या AT1 बाँड्सचे मूल्य शून्यावर आणले म्हणजेच write down करण्यात आलं. यामुळे, ग्राहकांनी या बाँड्समध्ये गुंतवलेले कोट्यवधी रुपये बुडाले. यानंतर, नुकसान झालेल्या संतप्त ग्राहकांनी बँकेच्या अधिकाऱ्यांवर असा आरोप केला की, त्यांनी दिशाभूल करणारी माहिती देऊन ग्राहकांना एका अत्यंत जोखीमपूर्ण गुंतवणूक उत्पादनाची खरेदी करण्यास भाग पाडलं. आणि त्यामुळेच हे प्रकरण उलटलं.

बँकेच यावर म्हणणं काय?

या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) शशीधरन जगदीशन यांनी स्पष्ट केले की, हे प्रकरण कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीचं नाही. नियामक नियमांच्या चुकीच्या अर्थबोधामुळे झालेली एक ‘तांत्रिक चूक’ आहे. पण या कारवाईवरुन बँकेला एक स्पष्ट संदेश द्यायला आहे की जर तुम्ही ग्राहकांना गुंतवणुकीची उत्पादने विकताना दिशाभूल करणारी माहिती दिलीत, तर बँक तुम्हाला कदापि माफ करणार नाही. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, बँकेने आपल्या दुबई शाखेत नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळेच १२ अधिकाऱ्यांच्या वेतनवाढी रोखून धरण्यात आल्या असून, त्यांचे ‘स्टॉक ऑप्शन्स’ देखील रद्द करण्यात आले आहेत.

Price Rise : युद्धानं मोडलं सर्वसामान्यांचं कंबरडं! सोफ्यापासून गाद्यांपर्यंत सर्व काही महागलं

Web Title: Hdfc taken action against 12 officials over allegations of the mis selling of credit suisse additional tier 1 bonds marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 03:54 PM

Topics:  

  • Bank
  • HDFC
  • HDFC Bank
  • HDFC Bank Share

संबंधित बातम्या

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धा, सोनाली – घुफ्रान सारस्वत चषकाचे मानकरी
1

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धा, सोनाली – घुफ्रान सारस्वत चषकाचे मानकरी

Share Market Crash : भारतीय शेअर बाजार पुन्हा कोसळला! HDFC Bank चा शेअर धडाम; Nifty 22400 च्या खाली
2

Share Market Crash : भारतीय शेअर बाजार पुन्हा कोसळला! HDFC Bank चा शेअर धडाम; Nifty 22400 च्या खाली

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!
3

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!

FD वर जास्त नफा हवा? SBI, HDFC नाही तर ‘या’ स्मॉल फायनान्स बँका देताहेत High Interest; 5 लाखांचे होतील तब्बल इतके
4

FD वर जास्त नफा हवा? SBI, HDFC नाही तर ‘या’ स्मॉल फायनान्स बँका देताहेत High Interest; 5 लाखांचे होतील तब्बल इतके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.