(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
HSD – High-Speed Diesel प्रति लिटर ₹२८.२२ ने वाढवण्यात आली आहे. परिणामी, याची किंमत प्रति लिटर ₹१०९.५९ वरून वाढून ₹१३७.८१ इतकी झाली आहे. यापूर्वी, २० मार्च रोजी इंडस्ट्रियल डिझेलच्या किमतीत ₹२२ ची वाढ झाली होती; त्यावेळी दिल्लीत याची किंमत ₹८७.६७ वरून वाढून ₹१०९.५९ झाली होती. तेल कंपन्यांनी FO ची किंमत देखील प्रति लिटर ₹२३.७७ ने वाढवली आहे.
इंडस्ट्रियल डिझेल, किंवा HSD, कमर्शियल संस्थाना मोठ्या प्रमाणात विकलं जातं. याच्या खरेदीदारांमध्ये मोठ्या कारखाने आणि उत्पादन युनिट्स यांचा समावेश होतो, जे त्यांचे जनरेटर चालवण्यासाठी डिझेलचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. याव्यतिरिक्त, प्रमुख बांधकाम संस्थांकडून आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्येही याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. खाजगी बस चालक आणि मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक करणाऱ्या कंपन्या देखील या कंपन्यांकडून डिझेल घाऊक दरात खरेदी करतात. त्यामुळे यासगळ्यावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे डिझेलच्या किमती वाढल्यामुळे इतर अत्यावश्यक गोष्टींच्या किमती वाढणार आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी, पंपावरील किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. याचा अर्थ किरकोळ इंधन पंपांवर विकल्या जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तथापि, Nayara Energy आणि Shell सारख्या खाजगी इंधन विक्रेत्यांनी, त्यांच्या कंपन्यांना होणारी आर्थिक हानी भरून काढण्यासाठी, त्यांच्या किमतींमध्ये ₹३ ते ₹२५ पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
हे एक प्रकारचे फ्यूल ऑयल आहे, ज्याची डिझेलपेक्षा थोडी जास्त जाड प्रमाणात असतं. अवजड यंत्रसामग्री चालवण्यासाठी याचा वापर केला जातो. डिझेलपेक्षा हे स्वस्त असल्याने, विविध उद्योगांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. प्रति लिटर ₹२३.७७ च्या या दरवाढीमुळे पोलाद आणि सिमेंट उद्योगांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. कारखान्यांमध्ये भट्ट्या पेटवण्यासाठी, वीज निर्मिती केंद्रांमध्ये वीज तयार करण्यासाठी, कारखान्यांमधील बॉयलरमध्ये वाफ निर्माण करण्यासाठी आणि मोठ्या जहाजांच्या इंजिनमध्ये इंधन म्हणून याचा वापर केला जातो. त्यामुळे या सगळ्या इंधनांच्या किमती वाढल्यामुळे आता सगळ्याच उद्योगांवर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे सामान्यांपर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक गोष्टींच्या किमती कडाडणार आहेत एवढं मात्र नक्की!






